सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्न्मेंट, नवी दिल्ली द्वारा पर्यावरण संरक्षणविषयक अशा एन्व्हायर्न्मेंटल इम्पॅक्ट अ‍ॅण्ड अ‍ॅसेसमेंट (ईआयए) विषयक विशेष अभ्यासक्रमाचे खालीलप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.
अभ्यासक्रमाचे स्वरूप- या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट विषयांमध्ये प्रामुख्याने प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षणविषयक संबंधित आकडेवारी व तपशिलाचे संकलन- विश्लेषण, पर्यावरण विषयाशी संबंधित प्रस्तावित प्रकल्पांचे परिणाम व त्यावरील नियंत्रण, प्रदूषण नियंत्रण विषयातील प्रयत्न, सातत्य व त्याचे अध्ययन, प्रदूषण नियंत्रणविषयक उपाययोजना, प्रदूषण नियंत्रण- पर्यावरण संरक्षण व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षणाचे सामाजिक लाभ, प्रदूषण नियंत्रणाच्या संदर्भातील जनसुनावणी व त्यावर कार्यवाही इ.चा समावेश करण्यात आला आहे.
आवश्यक पात्रता- या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रतेच्या जोडीलाच अर्जदारांना प्रकल्प व्यवस्थापन, उत्पादन, पर्यावरण नियंत्रणाच्या संदर्भात काम करणाऱ्या सरकारी संस्था, समाजसेवी संस्था, विषयाशी संबंधित विद्यार्थी, अभ्यास संशोधन अशा प्रकारचा अनुभव असायला हवा.
अभ्यासक्रमाचे शुल्क- अभ्यासक्रमाचे शुल्क म्हणून अनुभवी व कार्यरत असणाऱ्यांसाठी १५ हजार, संशोधक वा स्वयंसेवी संस्था क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी १० हजार व विद्यार्थी अर्जदारांनी ७.५ हजार रु. शुल्क भरणे आवश्यक.
निवास व्यवस्था- निवड झालेल्या उमेदवारांपैकी गरजूंना निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्न्मेंट, नवी दिल्लीच्या दूरध्वनी क्र. ०११- २९९५५१२४ वर संपर्क साधावा अथवा सेंटरच्या http://www.cseindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज सीनिअर रिसर्च असोसिएट, इंडस्ट्री अ‍ॅण्ड एन्व्हायर्न्मेंट युनिट, सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्न्मेंट, ४१, तुघलकाबाद इन्स्टिटय़ूशनल एरिया, नवी दिल्ली- ११००६२ या पत्त्यावर २६ जून २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

engineers doctors applications for police recruitment
पोलीस भरतीसाठी अभियंते, डॉक्टरांसह उच्चशिक्षितांचेही अर्ज
scolarship, mahadbt Scholarship, Deadline Extended for Government Scholarship, Deadline Extended for mahadbt Government Scholarship, Government Scholarship, maharashtra government Scholarship, Scholarship for students,
शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याकरीता १५ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ
covid, covid vaccine side effects
“कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात”, अ‍ॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात प्रथमच दिली कबुली
Achinthya Sivalingam
भारतीय विद्यार्थिनीला अमेरिकेत अटक, पॅलेस्टाईन समर्थनार्थ विद्यापिठात निदर्शने केल्याने कारवाई!