केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे केंद्र सरकारचे विविध विभाग आणि आस्थापनांमध्ये अभियंत्यांची नेमणूक करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘इंजीनिअरिंग सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन-२०१४’ या राष्ट्रीय स्तरावरील निवड पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने सिव्हिल, मेकॅनिकल अथवा इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : उमेदवार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांचे वय ३० वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर २० जून २०१४ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क : अर्जासह भरायचे शुल्क म्हणून उमेदवारांनी २०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया वा स्टेट बँकेच्या सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ मार्च २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट देण्याची शेवटची तारीख  २१ एप्रिल २०१४.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineering exams of the union public service commission
First published on: 14-04-2014 at 01:04 IST