जागतिक स्तरावरील आणि देशपातळीवरील ‘करिअर ट्रेण्ड’ विषयक विविध पाहणी अहवालांमध्ये नमूद केलेले आढळते की, नजीकच्या भविष्यकाळात सर्वात महत्त्वाची ठरेल ती सर्जनशीलता आणि कौशल्य. लेखन, डिझायनिंग, संशोधन, विपणन, संगीत, अभिनय यांसारख्या क्षेत्रांत आवश्यक ठरते ती सर्जनशीलता तर डॉक्टर,  तंत्रज्ञ, हेअर स्टायलिंग यासारख्या क्षेत्रांत तुमचे कौशल्य आणि प्रत्यक्ष उपस्थिती महत्त्वाची ठरते.शिक्षक, वकील, अभियंता, डॉक्टर, अकाऊंटंट, कायद्याची अंमलबजावणी करणारी क्षेत्रे, अन्ननिर्मिती करणारी व वितरण करणारी क्षेत्रे यांना आजही मागणी आहे आणि भविष्यातही असेल. इलेक्ट्रिशियन, वेल्डर, सुतार, मेकॅनिक यांसारख्या कुशल कामगारांनाही चांगला उठाव असेल.तंत्रज्ञानाशी संबंधित नोकऱ्यांना कधीच मरण नाही. ऑटोमेशनमधील नवे पर्याय आणि रोबोटिक्स या क्षेत्रांत नवी प्रणाली विकसित करण्यासाठी आणि त्याची देखभाल करण्यासाठी सतत नव्या अभियंत्यांची आणि तंत्रज्ञांची आवश्यकता भासते. स्पर्धात्मक वातावरण वाढल्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादने आणि सेवा यांच्या विक्रीकरता अफलातून धोरणे आखावी लागणार असून विपणन क्षेत्राला सुगीचे दिवस येतील. पेटंट, बौद्धिक संपदा, कर नियोजन ही स्पेशलायझेशन्स प्राप्त केलेल्या वकिलांच्या मागणीत आगामी काळात वाढ होईल. त्याचबरोबर जैवतंत्रज्ञानविषयीचा कायदा, कर कायदा, कॉपीराइट कायदा आदी क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मागणीत आगामी काळात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.मनोरंजन तसेच आशयनिर्मिती (कंटेन्ट जनरेशन) या करिअर पर्यायांना चांगले दिवस येतील. पुस्तकलेखन, चित्रपटलेखन यांसारख्या करिअरमध्ये योग्य मनुष्यबळाची गरज भासेल.  होम शॉिपग आणि इंटरनेट शॉिपगची वाढती मागणी लक्षात घेता उत्तरोत्तर रिटेल क्षेत्रातील कामांची तसेच सेल्फ सíव्हस स्कॅनर, चेकआऊटसारख्या तंत्रज्ञानामुळे कॅशिअरसारख्या पदांची संख्या कमी होईल.
संभाव्य संधींची क्षेत्रे
हेल्थकेअर
– व्यक्तीची आयुर्मर्यादा वाढल्याने वैद्यक व्यवसायात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांना चांगली मागणी येणार आहे. केवळ डॉक्टरच नव्हे तर परिचारिका, हेल्थकेअर व्यवस्थापक, तंत्रज्ञ, औषधविक्रेते, आरोग्य सेवा पुरवणारे, वयोवृद्धांची काळजी घेणारे समन्वयक आदींना भरपूर कामे उपलब्ध होतील.
व्यापार आणि वित्त – ग्राहकवर्ग आकर्षित करण्यासाठी आणि बाजारपेठीय कल जाणून घेण्यासाठी नव्या पद्धतींचे व्यापार करणे आवश्यक असते. सांख्यिकी माहिती विश्लेषक, बाजारपेठ संशोधक, वित्तीय सल्लागार, वित्तीय सेवा अशी कामे करणाऱ्या व्यक्तींना आगामी काळात चांगली मागणी राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Future trends and opportunities
First published on: 07-09-2015 at 00:05 IST