वन व्यवस्थापन अभ्यासक्रम

एकूण उपलब्ध जागांची संख्या १२० असून यांपैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.

भोपाळ येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट या संस्थेत उपलब्ध असणाऱ्या वन व्यवस्थापन विषयाच्या दोन वर्षे कालावधीच्या आणि निवासी स्वरूपाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू
झाली आहे.

जागांचा तपशील
अभ्यासक्रमासाठी एकूण उपलब्ध जागांची संख्या १२० असून यांपैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
शैक्षणिक अर्हता
अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा किमान ५० टक्के (राखीव गटातील उमेदवारांसाठी ४५ टक्के) गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत. त्याखेरीज त्यांनी सीएटी २०१५, एक्सएटी २०१६ यांसारखी व्यवस्थापन प्रवेशपरीक्षा दिलेली असावी.

प्रवेश पद्धती
अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना त्यांच्या पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी आणि संबंधित व्यवस्थापन अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेतील गुणांकाच्या आधारे समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल आणि त्याआधारे त्यांचा अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित होईल.
वसतिगृह- अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध असेल.

करिअर संधी
अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना वन विकास, वन व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, कृषी विकास व विस्तार इत्यादी क्षेत्रांत काम करणाऱ्या सरकारी-सहकारी ग्रामविकास संस्था, आदिवासी विकास आदी ठिकाणी नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात.

अर्ज व माहितीपत्रक
प्रवेश अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास एक हजार रुपयांचा (राखीव गटातील विद्यार्थ्यांनी ५०० रुपयांचा) डिमांड ड्राफ्ट विनंतीअर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.

अधिक माहिती
अभ्यासक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळच्या http://www.iifm.ac.in/ pgdfm अथवा http://www.uponline.gov.in/ portal/ services/ IIFM/ FRMHome page.aspx या संकेतस्थळांना भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ती कागदपत्रे आणि तपशिलासह असणारे प्रवेश अर्ज इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, पोस्ट बॉक्स क्र. ३५७, नेहरूनगर, भोपाळ- ४६२००३ या पत्त्यावर २३ डिसेंबर २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

शिष्यवृत्ती
निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २० टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार त्यांच्या अभ्यासक्रम कालावधीसाठी दरमहा रु. ५०० शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Information about forest management courses

ताज्या बातम्या