सुहास पाटील suhassitaram@yahoo.com
सोसायटी फॉर अ‍ॅप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनाअरिंग अँड रिसर्च (SAMEER) मुंबई. (भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी यांची एक प्रमुख रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) आयआयटी कॅम्पस, पवई, मुंबई – ४०० ०७६. (Vacancy Circular No. ०२/२०२१) सन २०२१-२२ करिता आयटीआय अ‍ॅप्रेंटिस ट्रेनीजची भरती.

एकूण रिक्त पदे – ४२.

SAMEER च्या पवई व खारघर येथील युनिट्समधील रिक्त पदांचा ट्रेडनुसार तपशील –

(१) फिटर – पवई – २, खारघर – ३

(२) टर्नर – पवई – १, खारघर – १

(३) मशिनिस्ट – पवई – २, खारघर – २

(४) इलेक्ट्रिशियन – पवई – १

(५) इलेक्ट्रो प्लेटर – खारघर – १

(६) ड्राफ्ट्समन मेकॅनिकल – पवई – १

(७) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – पवई – १०, खारघर – ६

(८) PASAA – पवई – ८, खारघर – १

(९) IT & ESM  – पवई – १, खारघर – १

(१०) मेकॅनिक (रेफ्रि. अँड एअर कंडिशिनग) – पवई – १

पात्रता – आयटीआयच्या अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. PASAA  ट्रेडकरिता १२ वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

इतर पदांसाठी १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

स्टायपेंड – PASAA आणि वेल्डर ट्रेडसाठी दरमहा रु. ७,००२/- स्टायपेंड दिले जाईल. इतर ट्रेड्ससाठी दरमहा रु. ७,८७७/- स्टायपेंड दिले जाईल.

निवड पद्धती – आयटीआयच्या सर्व सेमिस्टर्समधील गुणवत्तेनुसार उमेदवार निवडले जातील.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी आपले नाव  https://apprenticeshipindia.org/login या संकेतस्थळावर रजिस्टर करावे. त्यानंतर  https://sameer.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दि. १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत करावेत.

CSIR- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशिओनॉग्राफी, डोना पावला – ४०३ ००४, गोवा (Advt. No. REC-०१/२०२१) CSIR-NIO HQ गोवा आणि मुंबई, कोची व विशाखापट्टणम् येथील रिजनल सेंटर्समधील एकूण १५ रिक्त पदांची भरती.

(१) ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (जनरल) – ७ पदे (अज – १, इमाव – २, खुला – ४).

(२) ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (स्टोअर्स अँड पच्रेस) – ५ पदे (इमाव – २, खुला – ३).

पद क्र. १ व २ साठी पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि टाइप रायटिंग टेस्ट इंग्रजी – ३५ श.प्र.मि. किंवा िहदी ३० श.प्र.मि.

(३) ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (फिनान्स अँड अकाऊंट्स) – ३ पदे (इमाव – १, खुला – २).

पात्रता – १२ वी (अकाउंटन्सी विषयासह) उत्तीर्ण आणि टायिपग स्पीड ३५ श.प्र.मि. इंग्रजी किंवा ३० श.प्र.मि. हिंदी.

इष्ट पात्रता – MS-Office मधील कौशल्य व मान्यताप्राप्त इन्स्टिटय़ूशनकडील कॉम्प्युटर ऑपरेशन्स सर्टििफकेट.

वयोमर्यादा – दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी २८ वर्षे. विधवा/परित्यक्ता महिला उमेदवार – ३५ वर्षे. (वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे)

वेतन – पे-लेव्हल – २ (१९,९००/- – ६३,२००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ३१,०००/-.

निवड पद्धती – लेखी परीक्षा (जी फक्त गोवा येथे घेतली जाईल.) – २ पेपर्स.

पेपर-१ – मेंटल अ‍ॅबिलिटी टेस्ट – १०० प्रश्न प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण २०० गुण, वेळ ९० मिनिटे. (चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.)

पेपर-२ – जनरल अवेअरनेस ५० प्रश्न आणि इंग्रजी भाषा – ५० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास ३ गुण, एकूण ३०० गुण, वेळ १ तास. (प्रत्येक चुकीच्या उत्तरास १ गुण वजा केला जाईल.)

लेखी परीक्षेत किमान पात्रतेचे गुण मिळविलेल्या उमेदवारांना कॉम्प्युटरवरील टायिपग टेस्टसाठी बोलाविले जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. १००/-. (अजा/अज/दिव्यांग/महिला यांना शुल्क माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज दि. १३ सप्टेंबर २०२१ (१७.३० वाजे) पर्यंत https://www.nio.org  या संके तस्थळावर करावेत.

ऑनलाइन अर्जाची पिंट्रआउट योग्य जागी सही करून आवश्यक त्या प्रमाणपत्रांसह आणि शुल्काच्या पावतीसह वरील पत्त्यावर दि. २७ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.