||सुहास पाटील suhassitaram@yahoo.com भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) (संरक्षण मंत्रालयांतर्गत नवरत्न कंपनी) (Advt. No ०१ / २०२१-२२, dt. २१.७.२०२१) BEL हैद्राबाद युनिटसाठी प्रोजेक्ट इंजिनीअर पदांची करार पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे - ४९. सुरुवातीला उमेदवार २ वर्षांच्या कराराने नियुक्त केले जातील. त्यानंतर करार आणखी २ वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो. (१) प्रोजेक्ट इंजिनीअर-क (इलेक्ट्रॉनिक्स) - ३६ पदे. (२) प्रोजेक्ट इंजिनीअर-क (मेकॅनिकल) - ८ पदे. (३) प्रोजेक्ट इंजिनीअर-क (कॉम्प्युटर सायन्स) - ४ पदे. (४) प्रोजेक्ट ऑफिसर-क (ह्युमन रिसोर्सेस) - १ पद (खुला). प्रोजेक्ट इंजिनीअर-क पदांसाठी पात्रता - संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी प्रथम वर्गासह उत्तीर्ण. (अजा / अज / दिव्यांग उमेदवारांना गुणांची अट नाही.) प्रोजेक्ट ऑफिसर पदासाठी पात्रता - एमबीए / एमएसडब्ल्यू / एमएचआरएम / एमए (ह्युमन रिसोर्सेस स्पेशलायझेशनसह) प्रथम वर्गासह उत्तीर्ण. (अजा / अज / दिव्यांग - गुणांची अट नाही.) अनुभव - प्रोजेक्ट इंजिनीअर पदांसाठी किमान २ वर्षांचा इंडस्ट्रीमधील कामाचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा - सर्व पदांसाठी २८ वर्षेपर्यंत. (वयोमर्यादेत सूट इमाव - ३ वर्षे, अजा / अज - ५ वर्षे, दिव्यांग - १० / १३ / १५ वर्षे. एकत्रित मानधन - सर्व पदांसाठी दरमहा एकत्रित वेतन रु. ३५,००० / - १ वर्षानंतर पुढील ३ वर्षांसाठी प्रत्येक वर्षी रु. ५,००० / - ची वाढ दिली जाईल. शिवाय इतर खर्चासाठी दरवर्षी रु. १०,००० / - दिले जातील. सर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज www.bel-india.i या संकेतस्थळावर दि. ४ ऑगस्ट २०२१ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत. ((Careers > Recruitment > Advertisement Link) किंवा https: / / register.cbtexams.in / BEL / HyderabadUnit / / या URL ला लॉगइन करा. अर्जाचे शुल्क - सर्व पदांसाठी रु. ५०० / -. (अजा / अज / दिव्यांग उमेदवारांना शुल्क माफ आहे.) निवड पद्धती - रिक्त पदांच्या १: ५ प्रमाणात पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार मुलाखतीसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील. सर्व पदांसाठी शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची निवड पुढील प्रकारे पदवी परीक्षेतील गुण (७५% वेटेज) अनुभव (१०% वेटेज) आणि मुलाखत (१५% वेटेज) मधील गुणांना वेटेज देऊन केली जाईल. शंकासमाधानासाठी hydhrgen@bel.co.in या ई-मेलवर संपर्क साधावा.