भारतीय नौदलात शॉर्ट सíव्हस कमिशन - ‘ऑफिसर (पायलट/ऑब्र्झवर/एअर ट्रफिक कंट्रोलर)’ (जानेवारी २०१९ पासून सुरू होणाऱ्या) कोर्ससाठी इंजिनिअर पदवीधरांना प्रवेश. (i) एअर ट्रफिक कंट्रोलर (एटीसी) - ७ पदे, (ii) ऑब्र्झवर - ४ पदे, (iii) पायलट (एमआर) - ३ पदे, (iv) पायलट (पायलट एमआर वगळता) - ५ पदे. पात्रता - कोणत्याही शाखेतील इंजिनिअरींग पदवी (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र) दहावी बारावीला इंग्रजी विषयात/पदवीला किमान ६०% गुण आवश्यक. वयोमर्यादा - एटीएससाठी उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९४ ते १ जानेवारी १९९८ दरम्यानचा असावा. इतर पदांसाठी उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९५ ते १ जानेवारी २००० दरम्यानचा असावा. पायलट (एमआर वगळता) पदासाठी फक्त अविवाहीत पुरुष पात्र आहेत. इतर पदांसाठी अविवाहीत पुरुष/ महिला पात्र. शारीरिक मापदंड - पायलट/ऑब्र्झवर पदांसाठी उंची १६२.५ सें.मी. एटीसीसाठी उंची - पुरुष - १५७ सें.मी., महिला - १५२ सें.मी. ट्रेनिंग - निवडलेल्या उमेदवारांना आयएनए इझिमाला, केरळ येथे ऑफिसर म्हणून सब-लेफ्टनंट रँकवर (पे-मॅटिक्स १० मूळ वेतन रु. ५६,१००/- एमएसपी रु. १५,५००/- इतर भत्ते). नेव्हल ओरिएंटेशन कोर्स (२२ आठवडे) साठी तनात केले जाईल. निवड पद्धती - पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांना एसएसबी टेस्टसाठी मे २०१८ ते जुल २०१८ दरम्यान बंगलोर (पायलट/ऑब्र्झवरसाठी) आणि एटीसीसाठी बंगलोर/भोपाळ/कोईम्बतूर/विशाखापट्टणम् येथे बोलाविले जाईल. (एसएमएस किंवा ई-मेलद्वारे सूचित केले जाईल.) ऑनलाईन अर्ज www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. ४ मार्च २०१८पर्यंत करावेत. - सुहास पाटील suhassitaram@yahoo.com