नॅशनल अकादमी ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च (एनएएआरएम) हैद्राबाद आणि युनिव्हर्सिटी ऑफ हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या टेक्नोलॉजी मॅनेजमेन्ट इन अॅग्रिकल्चर म्हणजेच कृषी तंत्रज्ञानविषयक पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी कृषी विज्ञान, समाज विज्ञान, भौतिक विज्ञान, व्यवस्थापन, लाइफ सायन्सेस, अभियांत्रिकी, विधी यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
विशेष सूचना – वरील विषयांमधील पदवीधर व संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षांचा अनुभव असणारे उमेदवारसुद्धा या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
निवडपद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांमधून त्यांची योग्यता व शैक्षणिक आलेखाच्या आधारे त्यांची या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक – अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास १२ – १० इंच आकाराचा स्वत:चे नाव व पत्ता लिहिलेला लिफाफा व २५० रु.चा आयसीएआर युनिट एनएएआरएम अकाऊंट यांच्या नावे असणारा व हैद्राबाद येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी व तपशिलासाठी नॅशनल अकादमी ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेन्ट, हैद्राबादच्या दूरध्वनी क्र. ०४०-२४५८१४५३ वर संपर्क साधावा अथवा अकादमीच्या http://www.naamezunet.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि शेवटची तारीख – विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जॉइंट डायरेक्टर (अॅडमिन) अॅण्ड रजिस्ट्रार, नॅशनल अकादमी ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेन्ट, राजेंद्रनगर, हैद्राबाद ५०००३० या पत्त्यावर ३१ जानेवारी २०१३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविकेसह कृषी तंत्रज्ञानविषयक क्षेत्रात पुढील करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा जरूर विचार करावा.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2012 रोजी प्रकाशित
कृषी तंत्रज्ञानविषयक पदव्युत्तर अभ्यासक्रम
नॅशनल अकादमी ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च (एनएएआरएम) हैद्राबाद आणि युनिव्हर्सिटी ऑफ हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या टेक्नोलॉजी मॅनेजमेन्ट इन अॅग्रिकल्चर म्हणजेच कृषी तंत्रज्ञानविषयक पदव्युत्तर पदविका

First published on: 17-12-2012 at 03:09 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Management in agriculture technology education