सुनील तु. शेळगावकर

महाराष्ट्र गट – क सेवा (पूर्व) परीक्षा  या वेळेस खासच ठरणार आहे. या प्रस्तावित परीक्षेच्या माध्यमातून या वेळेस ९०० उमेदवारांची विविध पदासाठी निवड होणार आहे. यंदा पहिल्यांदाच इतर पदांसह  उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक या नवीन पदाची भरती होणार आहे. अर्थात; या वेळी उपलब्ध नोकरीच्या संधी म्हणजे पर्वणीच आहे.

State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
MPSC Announces General Merit List, Police Sub Inspector Cadre , Relief to Candidates, mpsc announced merit list, mpsc, maharashtra news, government exam, police, police officer, marathi news, students, MPSC
एमपीएससीकडून २०२१च्या ‘पीएसआय’ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर

या परीक्षेची पूर्वपरीक्षा ही संयुक्त स्वरूपाची असून यातील अभ्यासाचा घटक अर्थव्यवस्था याची येथे चर्चा करणार आहोत.  अर्थव्यवस्था हा घटक अभ्यासासाठी किचकट आहे.  या घटकावर विचारले जाणारे प्रश्न अभ्यासक्रमाला धरून नसतात. बरीच आकडेवारी लक्षात ठेवावी लागते. याचा अभ्यास कधीही न संपणारा असतो. अभ्यास साहित्य अपुरे असते असे बरेच प्रश्न उमेदवारास अभ्यास करताना भेडसावतात. या घटकाबाबतीत बोलावयाचे झाल्यास कोणतीही स्पर्धा परीक्षा आणि परीक्षेशिवायचे  वैयक्तिक आर्थिक नियोजन दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास करावा असे मला वैयक्तिक पातळीवर जाणवते. आपण या परीक्षेसाठीच्या अर्थव्यवस्था घटकाची अभ्यास दशा आणि दिशा ठरवूया. याचा अभ्यासक्रम दोन मुख्य गटात विभागलेला आढळतो.  तो पुढीलप्रमाणे:

१) भारतीय अर्थव्यवस्था:

राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य  व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.

२) शासकीय अर्थव्यवस्था:

अर्थसंकल्प लेखा  व लेखापरीक्षण इत्यादी.

  • अभ्यासक्रमाचे विश्लेषण:

अभ्यासक्रमाचे अवलोकन केले असता यात आयोगाने एकूण अकरा उपघटकांचा समावेश केला आहे असे दिसून येते. मात्र; दोन्ही गटात शेवटी त्यांनी इत्यादी या शब्दाचा वापर केला आहे. याचा अर्थ असा की; उपरोक्त घटकाखेरीज इतरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. याअंतर्गत येणारे घटक कोणते हे समजावून घेण्यासाठी दोन प्रमुख बाबी लक्षात घ्यावा लागतात.

  • जुन्या प्रश्नपत्रिका:

आयोगाने सांगितलेल्या अभ्यासाखेरीज इतर अभ्यासक्रमाचे पैलू कोणते असावेत हे वैयक्तिक पातळीवर समजून घेण्यासाठी समान काठिण्यपातळी व अभ्यासक्रम असणाऱ्या इतर स्पर्धा  परीक्षेच्या  जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा.

२) अर्थशास्त्र विषयाची अभ्यासरचना:

अर्थशास्त्र हा विषय सूक्ष्म अर्थशास्त्र (Micro Economics) आणि स्थूल अर्थशास्त्र (Micro Economics) या दोन उप-अभ्यास शाखाद्वारे अभ्यासला जातो. यापैकी स्थूल अर्थव्यवस्था हा घटक आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त स्थूल अर्थशास्त्रातील इतर कोणकोणते घटक समाविष्ट होतात याचाही विचार करावा लागेल.

  •   अभ्यासाची दिशा:

अर्थव्यवस्था या विषयाचा अभ्यास करताना आपणास पुढील कालखंड लक्षात घ्यावे लागतील- स्वातंत्रपूर्व ते नियोजनापूर्वीचा कालखंड, पहिल्या तीन पंचवार्षिक योजना ते नियोजनाच्या सुट्टीचा कालखंड, नियोजनाची सुट्टी ते राव – मनमोहनसिंग प्रतिमान, पुढे  मनमोहनसिंग सरकार ते  मोदी सरकार आणि नीती आयोगामुळे झालेले बदल. या सबंध कार्यकाळात झालेले बदल किंवा चढ-उतार लक्षात घ्यावेत. यादरम्यानची आकडेवारी पूर्णाकाने लक्षात ठेवावी. झालेला बदल नेमका का झाला याची कारणमीमांसा लक्षात घ्यावी. या आकडेवारीचा जास्त बाऊ करू नये !

  •   संकल्पनांचे महत्त्व:

अभ्यासक्रमातील कोणताही घटक पूर्ण समजून घेण्याआधी संदर्भीय संकल्पना व परिभाषिक शब्दांचे अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. संकल्पना व पारिभाषिक  शब्द समजल्याशिवाय पूर्ण विषय आणि आकडेवारी समजणार नाही हेच अंतिम सत्य आहे.

  •   स्वत:ची टिपणे आवश्यक:

बाजारातील पुस्तके या घटकाशी संबंधित माहिती व आकडेवारीचा भडिमार निर्माण करणारी आहेत.किंबहुना; महाराष्ट्र गट – क सेवा पूर्वपरीक्षेची काठिण्यपातळी लक्षात घेऊन लिहिलेली पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. या परीक्षेसाठी या विषयाचा अभ्यास करताना परीक्षेचा आत्मा हरवण्याची भीती असते. म्हणून; परीक्षाभिमुख पद्धतीने स्वत: स्वत:ची टिपणे तयार करणे आवश्यक असते. असे केल्यास बहुतांश प्रश्न हे आपल्या टिपणातीलच आहेत असा आपणास अनुभव येईल.

  •   तक्ते, आलेख, परिभाषिक शब्द स्वतंत्रपणे मांडणी:

स्वत:ची टिपणे तयार करण्यासाठी काही ठिकाणी तुलनात्मक अभ्यास करावा लागतो तिथे तक्त्यांची निर्मिती करावी.घडून आलेला बदल व आकडेवारी लक्षात ठेवण्यासाठी आलेखांची  मदत घ्यावी. प्रत्येक घटकानुसार पारिभाषिक शब्दसाठा वाढवावा.

  •    विशेषत: महाराष्ट्र:

 सबंध अभ्यासक्रमात विशेषत: महाराष्ट्र या शब्दाचा  वापर करण्यात आला नाही.  असे असले तरी आपणास प्रत्येक घटकांच्या  अभ्यासा वेळी  महाराष्ट्रातील परिस्थिती किंबहुना; आकडेवारी, योजना यांसारख्या बाबींची  माहिती असणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ :  भारतातील स्त्री-पुरुष साक्षरतेचे प्रमाण लक्षात घेताना महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष साक्षरतेचे प्रमाण माहिती असणे अपेक्षित आहे.

  •   अचूकतेवर भर:

विविध योजनांची सुरुवात, उद्दिष्टे, साध्य, लक्ष इत्यादीसारखी माहिती बऱ्याचदा वेगवेगळय़ा अभ्यास साहित्यात वेगवेगळी आढळते यात अचूकता निर्माण करण्यासाठी शासनाच्या आकडेवारीवर भर द्यावा.

  •   अभ्यास साहित्य:

संकल्पना व पारिभाषिक शब्द समजून घेण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन पुस्तके यांचा वापर करा. आकडेवारी,चालू योजना व तत्सम बाबींसाठी भारताचा व महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल परीक्षाभिमुख पद्धतीने अभ्यासा. आयोगाचा अभ्यासक्रमामध्ये नमूद इत्यादी अंतर्गत येणारे उपघटक समजून घेण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा. बाजारातील सर्व पुस्तके चांगलीच असतात पुस्तकाची निवड करताना ते अद्ययावत आहे का हे पहावे. अशा पद्धतीने अभ्यास केल्यास परीक्षेतील प्रश्न सोडवण्यासाठी मदत तर होतेच शिवाय वैयक्तिक पातळीवर स्वत:चे स्वतंत्र आर्थिकदृष्टय़ा नियोजन कसे करावे हे समजते. आपली व देशाची आर्थिक वाटचाल लक्षात येते. म्हणूनच असे अनेक अर्थ लक्षात घेण्यासाठी हा एकच अभ्यास नेटाने करावा. यश नक्कीच मिळेल.