राज्य सेवा पूर्वपरीक्षा काल पार पडली. परीक्षेनंतर दोन दिवसांचा आराम करण्याची सर्वच तज्ज्ञ शिफारस करतात. पुढच्या तयारीला सज्ज होण्यापूर्वी परीक्षेचा ताण कमी व्हावा यासाठी दोन दिवसांचा आराम नक्कीच मदत करतो. त्यामुळे पूर्वपरीक्षेनंतर.. मुख्य परीक्षेपूर्वी अभ्यासाला थोडा विराम देण्यास काहीच हरकत नाही.

कालचा पेपर काहींना बरा गेला असेल, काहींना अवघड तर काहींना बऱ्यापकी चांगला. पेपर संपला तरी सहसा तो उमेदवारांची पाठ सोडत नाही. येथून पुढचे काही दिवस उत्तरतालिकेची वाट पाहण्यात, बरोबर किंवा चूक उत्तरांची संख्या शोधण्यात उमेदवारांचा वेळ जाईल. पूर्वपरीक्षेनंतरचा काही काळ गुणांबाबत पास किंवा नापास होण्याबाबतचे अंदाज बांधण्यात जाणे स्वाभाविक असते.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
lokmanas
लोकमानस: सहकाराखालोखाल राजकारणाचा अड्डा
loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल

चूक-बरोबर उत्तरे शोधण्यात वेळ घालवू नका, असे लिहिले, वाचले आणि ते पटले तरी आपण स्वत:ला त्यापासून रोखू शकत नाही. निकालाची चिंता आणि उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. पण एकदा पेपर संपला की आपल्या हाती फक्त पुढच्या अभ्यासाचे नियोजन आणि प्रत्यक्ष अभ्यास करणे एवढेच असते. पूर्वपरीक्षा आपण नक्की पास होऊ  असा काहींना अंदाज असेल. काहींना नक्की नापास होण्याची खात्री असेल तर काही त्रिधा मन:स्थितीत, संभ्रमात असतील. पण या सर्व उमेदवारांसाठी एकच एक योजना असायला हवी. सर्वानी आपण मुख्य परीक्षा देणार आहोत असे गृहीत धरून एकाही मिनिटाचा वेळ न दवडता अभ्यासाचे नियोजन करून अभ्यास सुरू करायला हवा.

राज्य सेवेची मुख्य परीक्षा २४, २५ व २६ सप्टेंबर  २०१६ या तारखांना प्रस्तावित आहे. पूर्वपरीक्षेनंतर पाच महिन्यांचा अवधी मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी मिळतो. खरे तर पूर्वपरीक्षा अणि मुख्य परीक्षा यामधील अवधी हा अभ्यासासाठी नसून मुख्य परीक्षा अभ्यासाच्या उजळणीसाठी असतो. पूर्वपरीक्षेपूर्वीच मुख्य परीक्षेचा अभ्यास संपलेला असणे अपेक्षित असते. म्हणूनच या पूर्वपरीक्षेच्या निकालाची जास्त चिंता न करता सर्व उमेदवारांनी अभ्यासाला लागायला हवे. मुख्य परीक्षेच्या अभ्यासाशिवाय काही उमेदवारांना ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेची तयारी करायची असेल. काही उमेदवार सहायक, पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षांच्याही तयारीत असतील. आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक खाली दिले आहे. सदर परीक्षांच्या तारखा पाहून अभ्यासाचे नियोजन करावे लागेल.

राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी एकूण सहा पेपर ८०० गुणांसाठी असतात. हे सर्व पेपर अनिवार्य स्वरूपाचे असतात. मराठी आणि इंग्रजी या भाषा विषयांचे पेपर यापूर्वी वर्णनात्मक पद्धतीचे होते. मात्र या वर्षीपासून या दोन्ही भाषा विषयांचेही पेपर बहुपर्यायी प्रश्नपद्धतीचे असणार आहेत. सामान्य अध्ययनाचे ४ पेपर प्रत्येकी १५० गुणांसाठी व भाषाविषय प्रत्येकी १०० गुणांसाठी असतात. या पेपर्सना निगेटिव्ह माìकग (३ : १) लागू आहे. मुख्य परीक्षेच्या गुणपद्धतीत पर्सेटाइल पद्धत लागू आहे. पर्सेटाइलप्रमाणे मेरिट निश्चित होऊन मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातात. सामान्य अध्ययन विषयाचे ४ पेपर खालीलप्रमाणे –

१.     सामान्य अध्ययन पेपर १ :  इतिहास, भूगोल व कृषी.

२.     सामान्य अध्ययन पेपर २ : भारतीय राज्यघटना व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित) आणि विधी.

३.     सामान्य अध्ययन पेपर ३ : मानवी साधनसंपत्ती व मानवी हक्क.

४.     सामान्य अध्ययन पेपर ४ : अर्थव्यवस्था व नियोजन, विकासाचे व कृषी अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान विकास.

लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला एक टीप छापली आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल, उमेदवारांच्या विविध विषयांतील सर्वसामान्य ज्ञानाची/ आकलनाची चाचणी घेणे हा आयोगाचा उद्देश आहे. याचा अर्थ सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरे विषयाच्या विशेष प्रावीण्याशिवाय देता येणे अपेक्षित आहे. अर्थात अभ्यासक्रमात नमूद केलेल्या अभ्यास घटकातील सर्व संकल्पना ठाऊक असणे आवश्यक आहे. म्हणजे मुख्य परीक्षेसाठी पायाभूत अभ्यास आणि चालू घडामोडींचे आकलन या दोन्हीचा मेळ आवश्यक आहे.

राज्य लोकसेवा आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षेचे प्रारूप बदलल्यापासून मागील तीन-चार वर्षांतील परीक्षांचे निकाल, गुणांचे कटऑफ, यशस्वी झालेल्या उमेदवारांची यादी पाहता लक्षात येते की, या परीक्षेची काठिण्यपातळी वाढली आहे. अभ्यासक्रमाची लांबी-रुंदी पाहता अभ्यासाची खोली वाढवावी लागणार आहे. यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नप्रत्रिकांच्या विश्लेषणाशिवाय दुसरा पर्याय नाही. परीक्षेचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण याविषयी पुढील लेखांमध्ये चर्चा करण्यात येईलच. त्याचबरोबर पेपरनिहाय अभ्यासपद्धत कशी असावी याविषयी सविस्तर चर्चाही करण्यात येईल.
Untitled-2sub