कर्मचारी निवड आयोगातर्फे बारावी उत्तीर्ण उमेदवारांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कम्बाइन्ड हायर सेकंडरी लेव्हल (१०+२) निवड परीक्षा- २०१३ साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत  बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय २७ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट अनुसूचित जाती-जमातींच्या उमेदवारांसाठी पाच वर्षांनी तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी तीन वर्षांनी शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर १० नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर २०१३ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक व अमरावती या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
निवड प्रक्रियेत लेखी निवड परीक्षा, डाटा एन्ट्री कौशल्य परीक्षा व टंकलेखन परीक्षेचा समावेश असेल. निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
निवड आणि नेमणूक : निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध आस्थापना आणि कार्यालयांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर अथवा कनिष्ठ श्रेणी कारकून म्हणून निर्धारित वेतनश्रेणीत इतर भत्ते व फायद्यांसह नेमण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून  १०० रु.ची निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणारी केंद्र सरकारची रिक्रूटमेंट तिकिटे लावणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती, तपशील व अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ जुलै २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : महाराष्ट्रातील उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि परीक्षा शुल्कासह असणारे अर्ज रिजनल डायरेक्टर (वेस्टर्न रिजन), स्टाफ सिलेक्शन कमिशन, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिका भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई ४०००२० या पत्त्यावर १६ ऑगस्ट २०१३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.