SBI PO Prelims 2022 Result Declared: स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) कडुन एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदासाठी घेण्यात आलेल्या प्रीलिम्सचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार sbi.co.in. या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

एसबीआय पीओ प्रिलीम्सचा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना रेजिस्ट्रेशन नंबर/रोल नंबर आणि पासवर्ड/ जन्मतारीख सबमिट करणे आवश्यक असेल. डिसेंबर २०२२ मध्ये १,६७३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. ज्यामध्ये १६०० रेग्युलर वेकन्सी आणि ७३ बॅकलॉग वेकन्सीचा समावेश होता. निकाल कसा तपासायचा जाणून घ्या.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

निकाल तपासण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा

  • sbi.co.in. या अधिकृत वेबसाईटवर जा
  • ‘करिअर’ पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘रिझल्ट लिंक फॉर प्रोबेशनरी ऑफिसर प्रिलीम्स एक्झाम’ या पर्यायावर क्लिक करा.
  • विचारण्यात आलेले डिटेल्स सबमिट करा.
  • त्यानंतर स्क्रीनवर निकाल दिसेल.

जे उमेदवार प्रीलिम्स परीक्षा उत्तीर्ण करतील ते मेन परीक्षेसाठी पात्र ठरतील. मेन परीक्षा ३० जानेवारी, २०२३ ला घेण्यात येणार आहे. प्रीलिम्स परीक्षेची उत्तर पत्रिका आणि मेन परीक्षेचे हॉल तिकीट लवकरच उपलब्ध करण्यात येईल.

Story img Loader