ब्रिटन सरकार व कॉमनवेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नेतृत्वविषयक क्षेत्रात काम करण्यासाठी इंग्लंडमधील विविध विद्यापीठांमध्ये शेव्हेंनिंग शिष्यवृत्ती देण्यात येते.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी ‘टोफेल’सारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व संबंधित पात्रता परीक्षेतील गुणांकांच्या आधारे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षे कालावधीच्या विशेष अभ्यासक्रमासाठी शेव्हेंनिंग शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क
योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी शेव्हेंनिंग शिष्यवृत्ती योजनेच्या http://www.chevening.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज वरील संकेतस्थळावर १३ डिसेंबर २०१३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
ज्या विद्यार्थ्यांना शिष्यृत्तीसह विदेशी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम वा विशेष शिक्षण घ्यायचे असेल त्यांनी या शिष्यवृत्तीचा जरूर विचार करावा.