scorecardresearch

Premium

भारत आणि शेजारील देश

भारताच्या शेजारील देशांमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांग्लादेश, म्यानमार, श्रीलंका व मालदीव यांचा समावेश होतो.

भारत आणि शेजारील देश

यूपीएससीची तयारी : प्रवीण चौगले

सामान्य अध्ययन पेपर-२ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासघटकांतर्गत भारत व शेजारील राष्ट्रे यामधील संबंधाचा आढावा घेऊन भारत आणि शेजारील देशातील द्विपक्षीय संबंधांचे चालू घडामोडींच्या अनुषंगाने कसे अध्ययन करावे, तसेच या घटकाच्या तयारीकरिता कोणते संदर्भसाहित्य वापरावे, याबाबत चर्चा करूया. प्रत्येक देश आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य देत असतो. कारण शेजारील राष्ट्रांशी असणारे संबंध देशाच्या सामरिक सुरक्षेला प्रभावित करत असतात. २०१५ साली भारताचे शेजारील देशांशी असणाऱ्या संबंधावर ‘मौसम‘ प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रश्न विचारला होता.

abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
farah khan reacts to troll who criticised her
“गणपतीसमोर चपला घालू नकोस…”, ट्रोलरच्या कमेंटला उत्तर देत फराह खान म्हणाली…

भारताच्या शेजारील देशांमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांग्लादेश, म्यानमार, श्रीलंका व मालदीव यांचा समावेश होतो. भारताचे या देशांशी असणारे संबंध ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून म्हणजेच स्वातंत्र्यापासून कसे उत्क्रांत होत गेले हे जाणून घ्यावे लागेल. तसेच समकालीन परिप्रेक्ष्यामध्ये विचार करता आर्थिक व व्यूहात्मक बाबींच्या पार्श्वभूमीवर अभ्यासावे लागतील. भारतासमोरील क्षेत्रीय आव्हानांचा विचार करून नरेंद्र मोदी सरकारने शेजारील देशांना समान वागणूक देण्याचे धोरण अवलंबले आहे. परराष्ट्र मंत्र्यांची भूतान भेट आणि मोदींच्या मे २०१९ मधील शपथ विधीकरिता ‘बिमस्टेक’ राष्ट्रांच्या प्रतिनिधींना दिलेल्या निमंत्रणावरून भारताचा कल ‘नेबरहूड फस्र्ट’ कडे असल्याचे अधोरेखित होतो. तरीही भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या

संबंधांच्या संदर्भामध्ये आधीच्या यूपीएप्रणीत सरकारच्या धोरणांचे सातत्य दिसून येते. भारताचे शेजारील देशांशी संबंध सुरुवातीपासूनच समानता व परस्परांचा आदर या मूलभूत तत्त्वावर आधारित आहेत. सर्वप्रथम आपण भारत व शेजारील देशांच्या संबंधाचा समकालीन परिप्रेक्ष्यामध्ये आढावा घेऊयात.

भारत-पाकिस्तान  संबंध :

’ भारत-पाकिस्तान संबंध नेहमीच संदिग्धतेमध्ये अडकलेले दिसतात. सीमावाद, दहशतवाद व काश्मीर प्रश्न हे ज्वलंत मुद्दे नेहमीच प्रभावी ठरलेले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरक्षाविषयक विविध चिंता आणि बदलते संबंध लक्षात घेता या देशातील द्विपक्षीय संबंधांमध्ये संपूर्ण परिवर्तन घडून येण्यासाठी बराच काळ जावा लागेल. दहशतवादी कारवाया आणि परस्पर अविश्वास यांनी भारत-पाकिस्तान संबंधांना व्यापून टाकले. भारत- पाकिस्तान संबंधावर २०१५ व २०१६ च्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता.

 

भारत- अफगाणिस्तान  संबंध :

’ भारत व अफगाणिस्तानमधील संबंध सलोख्याचे राहिले आहेत. अफगाणिस्तान भारतासाठी ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्य आशिया व पश्चिम आशियाचे प्रवेशद्वार असल्याने सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. भारताने या प्रदेशात शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आधारभूत संरचना आणि संस्थात्मक बांधणीसाठी २ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी रक्कम खर्च केली.

 

भारत- चीन  संबंध :

’भारत व चीनमधील द्विपक्षीय संबंधामध्ये स्पर्धा व सहकार्य या दोन्ही पैलूंचा समावेश होतो. या संबंधामध्ये धोरणात्मक अविश्वास (Strategic Mistrust) हे आव्हान दिसून येते. सीमापार नद्यांच्या पाण्याचा वापर, व्यापार असमतोल, सीमा प्रश्न, व्यापार व गुंतवणुकीसाठी संपर्क प्रस्थापना यासारखे द्विपक्षीय मुद्दे दिसून येतात. तसेच भारत व लगतच्या प्रांतावर गंभीर परिणाम करू शकणाऱ्या कठीण (HARD) विं मृदू (Soft Power) सत्ता वाढवण्याचे प्रयत्न चीनकडून केले जात आहेत. चीन हा देश आर्थिक व लष्करी महासत्ता म्हणून उदयास आलेला आहे. चीन आपल्या आर्थिक सामथ्र्याच्या साहाय्याने दक्षिण आशियायी राष्ट्रांवर आपला प्रभाव स्थापित करताना दिसतो. चीनचे ‘वन बेल्ट वन रोड’ व ‘मॅरीटाइम सिल्क रोड’ यासारखे उपक्रम प्रत्यक्षदर्शी आर्थिक स्वरूपाचे असले तरी त्यामध्ये सामरिक दृष्टिकोन अंतर्निहित आहे. चीनच्या या दृष्टिकोनाचा भारतावर परिणाम दिसून येतो. उदा. चीन व पाकिस्तान यांच्यामध्ये असणाऱ्या आर्थिक सहकार्याचा एक भाग म्हणजे चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरीडॉर (सीपीईसी) आहे. हा भारताकरिता धोका असू शकतो. या मुद्यावर बरेचदा प्रश्न आले आहेत (२०१३, २०१४, २०१७).  सध्या भारताचे चीन व पाकिस्तान यांच्याशी असणारे संबंध तणावपूर्ण असल्याने या दोन देशांशी असणाऱ्या  संबंधांचा मागोवा घेत राहणे श्रेयस्कर ठरते.

 

भारत- नेपाळ संबंध :

’ भारत व नेपाळचे संबंध सध्या ताणलेले दिसतात. नेपाळमधील प्रस्थापित व्यवस्थेतील काही घटकांमध्ये भारताबाबत दीर्घकाळापासून असलेला संशय याला कारणीभूत आहेत. एप्रिल २०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपाच्या आपत्तीत भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून प्रतिसाद दिला. पण या मदत कार्याला भारतीय प्रसार माध्यमांनी ज्याप्रकारे प्रसिद्धी दिली त्यावर टीका झाली. नेपाळच्या राज्यघटनेबाबत भारताच्या प्रतिसादाला नेपाळच्या अंतर्गत बाबींमध्ये भारताने केलेल्या अवाजवी हस्तक्षेपाच्या दृष्टिकोनातून पाहिले गेले.

भारत- बांग्लादेश संबंध :

’ भारत-बांग्लादेशातील संबंधांमध्ये मागील काही वर्षांपासून सुधारणा होत आहेत. या संदर्भात नुकताच झालेला सीमेवरील जमीन देवाण-घेवाण करार महत्त्वपूर्ण आहे. या करारामुळे ४१ वर्षे जुना सीमाविषयक वाद संपुष्टात आला. तसेच सीमापार बेकायदेशीर कारवाया नियंत्रित करणे आणि सीमापार दहशतवादाचा धोका कमी करण्यामध्ये हा करार उपयुक्त ठरेल.

 

भारत- श्रीलंका  संबंध :

’ भारत श्रीलंकेतील संबंध मित्रत्वाचे राहिले आहेत. अलीकडे झालेल्या निवडणुकांचा निकाल लक्षात घेता भारत-श्रीलंका संबंधांना निश्चितच चालना मिळू शकेल. भारत आणि भूतानमधील संबंध परिपक्व बनलेले आहेत. भारत हा भूतानचा व्यापार व विकासातील मोठा भागीदार आहे. भारत भूतानकडून वीज आयात करतो. बहुतांश जलवीज प्रकल्प भारताच्या साहाय्याने उभारलेले आहेत.

 

भारत – म्यानमार  संबंध :

’ भारत व म्यानमारमधील संबंध १९९० च्या दशकापासून सुरळीत झाले. दोन्ही देश व्यापार व गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहेत. तसेच सीमेवरील कारवाया, अमली पदार्थांची तस्करी रोखणे याबाबत दोन्ही देश संयुक्तपणे प्रयत्न करतात.

 

भारत- मालदीव  संबंध :

’ भारत व मालदीवचे संबंध सर्वसाधारणपणे सौहार्दपूर्ण राहिलेले आहेत. मालदीवमध्ये सत्तांतर झाल्यानंतर उभय राष्ट्रांच्या संबंधामध्ये चढ-उतार आहेत. मालदीव सध्या चीनकडे झुकल्याचे दिसते. भारत- श्रीलंका, भारत- बांगलादेश व भारत- मालदीव संबंध  यावर २०१३ मध्ये प्रश्न विचारला गेला.

हा अभ्यासघटक गतिशील (Dynamic) असल्याने या घटकांशी संबंधित चालू घडामोडींचा मागोवा घेणे अपरिहार्य आहे. याकरिता  इंडियन एक्स्प्रेसमधील सी. राजामोहन यांचे लेख, वर्ल्ड फोकस नियतकालिक उपयोगी पडेल. तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संके तस्थळ व वार्षिक अहवाल पाहणे श्रेयस्कर ठरेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-07-2021 at 01:27 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×