श्रीकांत जाधव

यूपीएससी मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये  १८व्या शतकातील घटना उदा. औद्योगिक क्रांती, जागतिक महायुद्धे, राष्ट्रांच्या सीमारेषांची पुनर्रचना, वसाहतीकरण व निर्वसाहतीकरण, साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद यांसारखे राजकीय विचारप्रवाह/ तत्त्वज्ञान व त्याचे प्रकार आणि त्याचा समाजावरील प्रभाव अशापद्धतीने आधुनिक जगाचा अभ्यासक्रम नमूद केलेला आहे.

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

प्रस्तुत लेखामध्ये १८व्या आणि  १९व्या शतकातील घटनांची माहिती घेणार आहोत आणि त्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊन याची तयारी कशी करावी, याबाबत थोडक्यात चर्चा करणार आहोत. या विषयाची तयारी करताना आपल्याला साधारणत: युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडातील देशांमध्ये १८व्या शतकापासून घडलेल्या महत्त्वाच्या घटना व त्यांचे परिणाम आणि यामुळे घडून आलेले बदल यासारख्या विविधांगी पैलूंची माहिती अभ्यासणे महत्त्वाचे ठरते.

२०१३ ते २१ या गतवर्षीय परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले कांही प्रश्न-

‘‘उशिराने सुरू झालेल्या जपानमधील औद्योगिक क्रांतीमध्ये निश्चित काही असे घटक होते जे पश्चिमेतील देशांच्या अनुभवापेक्षा खूपच भिन्न होते.’’ विश्लेषण करा.

‘‘आफ्रिकेचे युरोपीय प्रतिस्पर्धीयांच्या आकस्मातामुळे छोटय़ा छोटय़ा कृत्रिमरीत्या निर्मित राज्यामध्ये तुकडे करण्यात आले.’’ विश्लेषण करा.

‘‘अमेरिकन क्रांती वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव होता.’’ सिद्ध करा.

सर्वप्रथम औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्येच का झाली? औद्योगिकीकरणाच्या काळामधील तेथील लोकांच्या जीवनाच्या गुणवत्तेची चर्चा करा. भारताच्या सद्य:स्थितीमधील जीवन गुणवत्तेशी ती कशी तुलनात्मक आहे? स्पष्ट करा की, कशाप्रकारे अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांत्यांनी आधुनिक जगाचा पाया रचला. २०२० आणि २०२१ मध्ये या घटकावर थेट प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत.

उपरोक्त प्रश्न हे औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद आणि वसाहतवाद या दोन महत्त्वाच्या घटनांशी  संबंधित आहेत. या प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी साम्राज्यवाद आणि वसाहतवाद हे नेमके काय होते आणि याची सुरुवात कशी झाली व यासाठी नेमके कोणते घटक कारणीभूत होते आणि औद्योगिक क्रांतीला वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यामुळे कसा फायदा झाला याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. आपणाला प्रबोधन युग आणि या युगाचे परिणाम, स्वरूप, युरोपमधील समाजजीवनामध्ये घडून आलेले बदल याचा अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय वसाहतवाद आणि साम्राज्यवाद ही युरोपमधील देशांनी सुरू केलेली प्रक्रिया आणि याअंतर्गत त्यांनी आशिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडामध्ये कशाप्रकारे वसाहती स्थापन करून साम्राज्यवाद निर्माण केला याचे योग्य आकलन करता येत नाही. अमेरिकन क्रांतीसंबंधीचा प्रश्न समजून घेण्यासाठी सर्वप्रथम वाणिज्यवाद काय होता आणि इंग्लंड या देशाने वाणिज्यवादाद्वारे अमेरिकन वसाहतीची आर्थिक नाकेबंदी कशी केलेली होती याबाबत माहिती असणे गरजेचे आहे आणि या माहितीचा वापर करून अमेरिकन क्रांती ही वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव होता हे आपणाला सोदाहरण स्पष्ट करता येते. अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतींनी आधुनिक जगाचा पाया निर्माण करण्यात कोणते योगदान दिलेले आहे, हे मुद्देनिहाय अधोरखित करून स्पष्ट करावे लागते. हे सर्व प्रश्न विषयाची सखोल माहिती गृहीत धरून विचारण्यात आले आहेत.   

आधुनिक जगाचा इतिहास – पार्श्वभूमी

आधुनिक जगाच्या इतिहासाची सुरुवात साधारणत: १५व्या शतकापासून झाली असे मानले जाते. युरोपमधील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये प्रबोधन युगामुळे एक मूलभूत बदल होण्यास प्रारंभ झालेला होता. तर्कशक्ती, बुद्धिप्रमाण्यावाद यासारख्या तत्त्वांना अनुसरून विचारप्रक्रियेला सुरुवात झालेली होती. शतकानुशतके अस्तिवात असणाऱ्या परंपरांना चिकित्सक पद्धतीने स्वीकारणे सुरू झालेले होते ज्यामुळे वैज्ञानिक विचारप्रक्रियेला अधिक चालना मिळालेली होती आणि याच्या परिणामस्वरूप अनेक वैज्ञानिक शोध लावण्यात आलेले होते. अनेक भौगोलिक शोध लावले गेले आणि या शोधांमुळे वसाहतवाद आणि साम्राज्यवाद याची सुरुवात झालेली दिसते.

युरोपमध्ये १८व्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सरुवात झाली आणि यामुळे जगाच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात झालेली होती. अनेक राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञान उदयाला आलेले होते आणि या राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञानामध्ये भांडवलवाद, समाजवाद आणि साम्यवाद हे महत्त्वपूर्ण मानले जातात व यांचा सद्य:स्थितीमध्येही प्रभाव दिसून येतो. अशापद्धतीने एक व्यापक समज आपणाला करून घ्यावी लागते.

१८व्या शतकातील महत्त्वाच्या घटना उदा. राजकीय क्रांत्या- अमेरिकन व फ्रेंच क्रांती, औद्योगिक क्रांती, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद, आशिया, आफ्रिका आणि अमेरिकन खंडामधील युरोपियन साम्राज्यवाद; राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञान – भांडवलवाद, साम्यवाद आणि समाजवाद इत्यादी, तसेच १९व्या शतकातील युरोपातील राज्यक्रांती व राष्ट्रवादाचा उदय आणि जर्मनीचे व इटलीचे एकीकरण, आधुनिक जपानचा उदय, अमेरिकेतील गृहयुद्ध इत्यादी महत्त्वाच्या घटना या काळाशी संबंधित आहेत व सर्वाधिक प्रश्न या घटनांसंबंधी विचारले जातात.

या घटकाची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या इयत्ता  ९वी ते १२वीच्या क्रमिक  पुस्तकांमधून मूलभूत माहिती अभ्यासावी आणि या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘अ हिस्ट्री ऑफ दी मॉडर्न वल्र्ड’ हा राजन चक्रवर्ती लिखित संदर्भ ग्रंथ वाचवा. तसेच बाजारामध्ये या विषयावर अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत, तीदेखील पाहावीत.