BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. बीएमसीअंतर्गत रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. “कनिष्ठ वकील” या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती असणार आहे. तसेच अर्ज थेट ऑफलाइन सबमिट करायचे आहेत. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२४ आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज पाठवण्याचा पत्ता याची माहिती सविस्तर पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BMC Bharti 2024: पदाचे नाव – कनिष्ठ वकील

BMC Bharti 2024: शैक्षणिक पात्रता
अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून L. L. B. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि बार कौन्सिलची सनद असणे आवश्यक आहे.

हेही वाचा..NCL Recruitment 2024: नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत ‘या’ पदाच्या जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

BMC Bharti 2024: नोकरीचे ठिकाण – मुंबई</p>

BMC Bharti 2024: अर्ज पाठविण्याचा पत्ता – कायदा अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१.

अर्ज ऑफलाइन पद्धतीने नमूद केलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे. तसेच सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध असतील. तसेच बीएमसी भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी http://www.MahaBharti.in किंवा अधिकृत वेबसाईटला https://www.mcgm.gov.in/ भेट द्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc bharti 2024 vacant posts of junior lawyers there are total of various vacancies are available asp
First published on: 28-01-2024 at 19:33 IST