डॉ. श्रीराम गीत

सध्या मी पुणे विद्यापीठात एमए राज्यशास्त्रसाठी शिकत आहे. त्याच वेळी यूपीएससीसाठी पाठपुरावा करत आहे. मला माहीत आहे की जागा, कंपनी किंवा संसाधने काही फरक पडत नाहीत परंतु या परीक्षेत जाण्यासाठी वचनबद्धता, सातत्य आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. मला हे देखील माहीत  आहे की जिंकणे किंवा पराभूत होण्यापेक्षा ते महत्त्वाचे आहे. मी फक्त गोंधळात पडलो आहे की माझ्या कॉलेजमध्ये माझी तयारी सुरू  ठेवायची की एक गॅप घ्यायचे. दोन्ही हाताळणे हे मोठे काम आहे. आणि मी एकाच वेळी दोघांना न्याय देऊ शकत नाही. तर कृपया निर्णय घेण्यास मला मदत करा. मला माहीत आहे की शेवटी तुमची मदत मागण्यापेक्षा मी निर्णय घेईन आणि त्याची अंमलबजावणी करेन.- हर्षल कृष्णा खैरनार

AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून
The University Grants Commission UGC has decided to allow universities to conduct postgraduate degree courses online remotely pune news
एकीकडे मोकळीक, दुसरीकडे नियमांचे बंधन… शिक्षण संस्थांचे म्हणणे काय?
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

मित्रा तू खूप तात्त्विक चर्चा करणारे प्रश्न तुझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न केला आहेस. त्याच वेळेला गॅप घेण्याचा विचारही माझे समोर ठेवला आहे. गॅप घेण्याचा फायदा काय? त्यातून यूपीएससी तयारीला कोणताही महत्त्वाचा फायदा मला तरी दिसत नाही. चांगल्या गुणांनी राज्यशास्त्रात एमए पूर्ण केले तर निदान प्लॅन बी साठी तुझ्या हाती काहीतरी छानसे पाठबळ राहील. मी किती वेळा प्रयत्न करणार, त्याचे आर्थिक पाठबळ कुठून आणणार, यासाठी मी घरच्यांशी मोकळेपणे किती चर्चा केली आहे या तिनातून कोणत्याही स्पर्धा परीक्षेची सुरुवात होत असते. एम ए करत असताना फक्त सी सॅट वर लक्ष दे. यथावकाश बाकीच्या गोष्टी होत जातील यावर विश्वास ठेव.

 सर, मी २०२१ मध्ये कृषी शाखेची पदवी ७३ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो. कृषी शाखेची पदवी मी आईच्या आग्रहास्तव घेतली आहे. माझे वय २४ वर्षे आहे. मी एमबीए (Operation and Supply Chain Management) मध्ये ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालो आहे. मी तो अभ्यासक्रम कृषी क्षेत्राशी संबंधित सप्लाय चेन कंपनीमध्ये काम करत पूर्ण केला. आत्ता नोकरी सुरू आहे. नोकरीसाठी देत असलेला वेळ आणि मिळणारा पगार यामध्ये दिसणारी तफावत पाहता आणि स्वत:मध्ये असणारी अंगभूत कौशल्ये व गुणांना आणि वेळेला न्याय देण्यासाठी व्यवसायाकडे वळण्याचा विचार मनात येतो. परंतु आत्तापर्यंतच्या प्रवासातून स्वत:मध्ये जाणवलेले अंगभूत गुण आणि कलाकौशल्य यातून मला मी लॉ करून वकिली व्यवसायामध्ये जावे असे मनोमन वाटते. सध्या माझ्यावर स्वत:चे करिअर योग्य मार्गावर घेऊन जाणे याव्यतिरिक्त कोणतीही जबाबदारी नाही. कृपया योग्य व जवळचा मार्ग सांगावा ही विनंती.—चंद्रकांत राऊत.

तुझे वय २४ आहे. दोन उपयुक्त पदव्या हाती असताना आता लॉ च्या पदवीसाठी प्रवेश घेऊ  इच्छितोस व तीन वर्षांचा पूर्णत: अनोळखी अभ्यासक्रम शिकायची इच्छा व्यक्त करतोस. ते करायला हरकत काहीच नाही. पण सध्या मिळणारी नोकरी व उत्पन्न सोडून कायद्याची पदवी हातात घेतल्यावर अनिश्चित स्वरूपाच्या विविध वाटा-वळणे असलेल्या रस्त्याला तू लागणार आहेस. हे वातावरण किती खडतर असते या संदर्भात २२ वर्षांच्या एखाद्या कायदा पदवीधराला भेटून माहीती घेणे हे तुझे पहिले काम राहील. सहजगत्या एखाद्या मोठय़ा जिल्हा व शहरी भागातील न्यायालयात तीन दिवस निरीक्षण करून तेथील वातावरणाचाही तुला अंदाज लागू शकतो. तू घेऊ  इच्छित असलेल्या कायद्याच्या पदवीनंतर कोणत्याही स्वरूपाची चांगली नोकरी उपलब्ध नाही. तेव्हा त्यातील वकिली व्यवसायाची नीट माहिती घेऊन मग हा निर्णय घ्यावा एवढेच मी सुचवत आहे. शेवटची एक नोंद. आईच्या इच्छेनुसार अ‍ॅग्रि.ची पदवी घेतलीस. पण पुढची मॅनेजमेंटची पदवी तर तुझ्या इच्छेनेच घेतली ना? मग त्याचा खर्च व आयुष्याची दोन वर्षे का वाया घालवली? याचेही उत्तर स्वत:पुरते का होईना तुला तुझ्या मनाशी द्यायचे आहे.

 सर, मी बी ए च्या तिसऱ्या वर्षांत शिकत आहे मला दहावीमध्ये ८० टक्के गुण मिळाले असून बारावी मध्ये ६७ टक्के गुण मिळाले आहेत, तर मी स्पर्धा परीक्षांची तयारी चालू केली आहे. सुरवातीला मी एनसीईआरटी वाचत आहे. तर मी अभ्यासाची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन करावे.  — अनुराधा कोळी

तुझे बीएचे तिसरे वर्ष चालू आहे पण बीएसाठी विषय कोणते घेतले होतेस हे कळवलेले नाही. एमपीएससी असो किंवा यूपीएससी या दोन्हीसाठी प्राथमिक परीक्षेची तयारीकरिता पाचवी ते बारावीचे सर्व विषयांचे सामान्यज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे ठरते. तुझी बारावी व बीए हे संपूर्णपणे शास्त्र, गणित या विषयांना संबंधित नसल्यामुळे त्याविषयीचे वाचन या वर्षी चालू ठेवावे. जोडीला वृत्तपत्र वाचनावर आधारित स्वत:ची टिपणे काढणे, छोटे छोटे विविध विषय निवडून त्यावर निबंध लिहिणे, हे पण उपयुक्त ठरेल. बीए उत्तम मार्कानी पूर्ण करणे हे पहिले ध्येय ठेव. त्यानंतर कम्बाईन्ड २०२५ ची राज्यसेवा स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार तू करू शकशील.आत्ता अन्य विचार नको.