DFSL Maharashtra Bharti 2024 : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, (DFSL) मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण १२५ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीने ही अर्ज प्रक्रिया सुरू आहे. २७ फेब्रुवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक अशा सात पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिकृत अधिसूचना DFSL कडून जारी करण्यात आली आहे. या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी स्थान आणि अर्ज कुठे व कसा करायचा याबाबत तपशीलवार माहिती जाणून घेऊ….

रिक्त पदाचे नाव आणि तपशील :

१) वैज्ञानिक सहायक (गट क)- ५४ रिक्त जागा
२) वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क)- १५ रिक्त जागा
३) वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र) (गट क)- ०२ रिक्त जागा
४) वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (गट क)- ३० रिक्त जागा
५) वरिष्ठ लिपीक (भांडार) (गट क)- ०५ रिक्त जागा
६) कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक (गट क)- १८ रिक्त जागा
७) व्यवस्थापक (उपाहारगृह) (गट क)- ०१ रिक्त जागा

Defence Institute of Advanced Technology pune jobs
DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर होणार भरती; जाणून घ्या….
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली

शैक्षणिक पात्रता

१) वैज्ञानिक सहायक (गट क)– विज्ञान शाखेतील रसायनशास्त्राची पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.

२) वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण) (गट क) – विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा इंजिनियरिंग पदवी (Computer/Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law)

३) वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र) (गट क)- मानसशास्त्र विषयातली द्वितीय श्रेणीतील पदवी

४) वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (गट क)– विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परीक्षा उत्तीर्ण

५) वरिष्ठ लिपीक (भांडार) (गट क)- विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परीक्षा उत्तीर्ण

६) कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक (गट क)- माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण (विज्ञान)

७) व्यवस्थापक (उपाहारगृह) (गट क)- माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण असण्याबरोबर कॅटरिंग क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट

अराखीव १८ वर्ष – ३८ वर्ष
मागासवर्गीय १८ वर्ष – ४३ वर्ष
खेळाडू १८ वर्ष – ४३ वर्ष
दिव्यांग १८ वर्ष – ४५ वर्ष
प्रकल्पगस्त १८ वर्ष – ४५ वर्ष
पदवीधर अंशकालीन उमेदवार- १८ वर्ष – ५५ वर्ष

[मागासवर्गीय/अनाथ/आर्थिक दुर्बल घटक – ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क (फी)

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु. १०००/-
मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु. ९००/-

महत्त्वाच्या लिंक्स ( इथे लिंक्स पेस्ट करणार आहे)

DFSL च्या अधिकृत वेबसाईटच्या लिंकसाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification) साठी इथे क्लिक करा.

DFSL Bharti 2024 साठी ऑनलाइन अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.