scorecardresearch

Premium

FACT Recruitment 2023: फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी होतेय भरती; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या पात्रता आणि निकष

FACT Recruitment 2023:फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडमध्ये होणाऱ्या या भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

FACT Recruitment 2023:
:फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडमध्ये भरती ( फोटो क्रेडिट- https://fact.co.in/home वेबसाईट)

FACT Recruitment : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडतर्फे भरतीची घोषणा करण्यात आली आहे. संस्थेने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, या संस्थेमध्ये ७४ रिक्त पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या संबंधित सविस्तर माहिती https://fact.co.in/या महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. नोकरीसाठी उच्छुक उमेदवार १६ मे २०२३ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड म्हणजेच फॅक्टद्वारे होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण ७४ जागा रिक्त आहेत. सिनियर मॅनेजर पदासाठी (AE) ०३ जागा, ऑफिसर पदासाठी ०६ जागा, मॅनेजमेंट ट्रेनी २७ जागा, टेक्निशियन २१ जागा, सॉनिटरी इंस्पेक्टर ०२ जागा, क्राफ्ट्समन ११ जागा, रिगर असिस्टंट ०४ जागा उपलब्ध आहेत. भरतीस इच्छुक उमेदवारांना या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

Potholes and large holes in pavement slabs before paverblocks are installed
पेव्हरब्लॉक बसवण्यापूर्वीच खड्डे, पदपथाच्या स्लॅबला मोठी छिद्रे; कोपरखैरणे सेक्टर १५-१६ मधील प्रकार
Bharat Electronics Limited invited application for Trainee Engineer I 47 vacancies The job location is Mumbai
इंजिनीयर उमेदवारांनो ही संधी सोडू नका! भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ‘या’ पदासाठी भरती; ४० हजारांपर्यंत मिळणार वेतन
metro 3, Trial Run, Delayed, colaba, bandra, seepz, ashwini bhide
मुंबई : मेट्रो ३ ची चाचणी रखडली
online video calling scam
व्हिडीओ कॉल, पोलीस असल्याची बतावणी; ऑनलाइन फसवणुकीसाठी नवी पद्धत; काय काळजी घ्याल? वाचा….

रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता

१) सिनियर मॅनेजर

या जागांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ HR किंवा समतुल्य PG पदवी /PG डिप्लोमा, ०९ वर्षे कामाचा अनुभव असावा.

२) ऑफिसर

६० टक्के गुणांसह B.Sc (कृषी) पदवी.

३) मॅनेजमेंट ट्रेनी

या जागांसाठी ६० टक्के गुणांसह केमिकल/इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा ६० गुणांसह मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा किंवा CA पर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे.

४) टेक्निशियन

B.Sc.(केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री) / संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि दोन वर्षे कामाचा अनुभव असावा.

५) सॅनिटरी इंस्पेक्टर

१० वी उत्तीर्णसह सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स केलेला असावा, आणि किमान ०६ वर्षे अनुभव असावा.

६) क्राफ्ट्समन

या जगांसाठी १० वी उत्तीर्ण असण्यासह ITI (फिटर/मेकॅनिक/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन) पर्यंतचे शिक्षण आणि किमान ०२ वर्षे अनुभव असावा.

७) रिगर असिस्टंट

१० वी उत्तीर्ण असण्यासह ०५ व वर्षे या कामाचा अनुभव असावा.

वयाची अट

SC/ST:०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट
पद क्र.१: ४५ वर्षांपर्यंत
पद क्र.२: २६ वर्षांपर्यंत
पद क्र.३: २६ वर्षांपर्यंत
पद क्र.४ ते ७: ३५ वर्षांपर्यंत

निवड झालेल्या उमेदवारांची संपूर्ण भारतभर कोणत्याही राज्यात नियुक्ती करण्यात येईल. त्यांना १९ हजारांपासून ते २ लाख रुपयांपर्यंतचे वेतन देण्यात येईल.

उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी क्लिक करा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fact recruitment 2023 apply for 74 post 16 may 2023 last date to apply sjr

First published on: 29-04-2023 at 12:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×