सुहास पाटील

१) भारतीय नौसेना ( Indian Navy) (संरक्षण मंत्रालय, भारत सरकार) वेस्टर्न नेव्हल कमांड ( WNC) मुंबई, ईस्टर्न नेव्हल कमांड ( ENC) विशाखापट्टणम, सदर्न नेव्हल कमांड ( SNC) कोची, अंदमान-निकोबार कमांड ( anc) पोर्ट ब्लेअर या नेव्हल कमांड मुख्यालयांतर्गत जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप-बी (नॉन-गॅझेटेड नॉन-मिनिस्ट्रीयल) चार्जमन सिनियर ड्राफ्ट्समन आणि जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप-सी (नॉन-गॅझेटेड इंडस्ट्रियल) ट्रेड्समन मेट पदांच्या भरतीकरिता इंडियन नेव्ही सिव्हिलियन एन्ट्रन्स टेस्ट INCET – ०१/२०२३ घेणार आहे. ( I) ग्रुप-बी मधील रिक्त पदांचा तपशील –

Watch Rohit Sharma wins hearts after MI video captures him meeting wheelchair-bound fan
“हेच रोहितने कमावले !” व्हिलचेअरवर बसलेला चाहता रोहित शर्माला भेटला, हृदयस्पर्शी व्हिडीओने जिंकले नेटकऱ्यांचे मन
Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती

(१) चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप) – २२ पदे (अजा – ३, अज – २, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – १२) (१ पद दिव्यांग कॅटेगरी Others साठी राखीव).

पात्रता – B. Sc. (फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथेमॅटिक्स) विषयांसह उत्तीर्ण किंवा केमिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा.

(२) चार्जमन (फॅक्टरी) – २० पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ९) (१ पद दिव्यांग कॅटेगरी OH साठी राखीव).

पात्रता – बी.एस्सी. (फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथेमॅटिक्स) विषयांसह उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग डिप्लोमा.

(३) सिनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) – १४२ पदे (अजा – २१, अज – ११, इमाव – ३८, ईडब्ल्यूएस – १४, खुला – ५८) (प्रत्येकी १ पद दिव्यांग कॅटेगरी VH/ OH साठी राखीव).

(४) सिनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – २६ पदे (अजा – ४, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी OH साठी राखीव).

पद क्र. ३ व ४ साठी पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) आयटीआयमधील २ वर्षं कालावधीचा ड्राफ्ट्समन सर्टिफिकेट, ( iii) ३ वर्षांचा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल ड्रॉईंग डिझाईनचा अनुभव.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : पायाभूत सुविधा म्हणजे काय? या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या का असतात?

इष्ट पात्रता – AutoCAD कोर्स.

(५) सिनियर ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) – २९ पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – २, खुला – १४) (१ पद दिव्यांग कॅटेगरी OH साठी राखीव).

पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) २ वर्षं कालावधीचा आयटीआयकरिता ड्राफ्ट्समनशिप सर्टिफिकेट/ डिप्लोमा, (iii) मेकॅनिकल किंवा नेव्हल आर्किटेक्चर इंजिनीअरिंग कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

इष्ट पात्रता – AutoCAD कोर्स.

(६) सिनियर ड्राफ्ट्समन (कारटोग्राफिक) – ११ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७).

पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) आयटीआयकडील ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट, ( iii) कारटोग्राफीमधील ड्रॉईंग किंवा डिझाईनिंग कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

इष्ट पात्रता – AutoCAD कोर्स.

(७) सिनियर ड्राफ्ट्समन (आर्मामेंट) – ५० पदे (अजा – ८, अज – ४, इमाव – १३, ईडब्ल्यूएस- ७, खुला – १८) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी OH साठी राखीव).

पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) आयटीआयकडील ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा/सर्टिफिकेट, ( iii) मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील ड्रॉईंग/ डिझाईन कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

इष्ट पात्रता – AutoCAD कोर्स.

(II) ग्रुप-सी मधील रिक्त पदांचा तपशिल – पे-लेव्हल – १ (रु. १८,००० – ५६,९००).

(८) ट्रेड्समन – ६१० पदे (ईस्टर्न नेव्हल कमांड – ९ पदे, सदर्न नेव्हल कमांड – ३६ पदे, वेस्टर्न नेव्हल कमांड – ५६५ पदे) (अजा – ९६, अज – ६०, इमाव – ११७, ईडब्ल्यूएस – ५७, खुला – २३५) (५६ पदे माजी सैनिकांसाठी राखीव) (३० पदे दिव्यांग कॅटेगरी VH – ५, HH – ८, OH – ६, Others – ११ साठी राखीव).

हेही वाचा >>> UPSC-MPSC : चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी भारत सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना कोणत्या?

पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट. पात्र आयटीआय ट्रेडची यादी जाहिरातीमधील Annexure- I मध्ये दिलेली आहे. जसे की, कारपेंटर, COPA, सिव्हील इंजिनिअर असिस्टंट, सेंट्रल एअर कंडिशन प्लांट मेकॅनिक, कॉम्प्युटर हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क मेंटेनन्स, डोमॅस्टिक पेंटर, ड्राफ्ट्समन सिव्हील, कटींग अॅण्ड Sewing, ड्रेस मेकींग, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर, फिटर, फाऊंड्रीमॅन, इंडस्ट्रियल पेंटर, ICTSM, IT, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, लिफ्ट अॅण्ड एस्कलेटर मेकॅनिक, लेदर गुड्स मेकर, मशिनिस्ट, मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट), मरिन इंजिन फिटर, मरिन फिटर, मेसॉन (बिल्डींग कस्न्ट्रक्टर), मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक डिझेल, MMTM, मेकॅनिक मोटर वेहिकल, मेकॅनिक ट्रक्टर, पेंटर (जनरल), प्लंबर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनर टेक्निशियन, शीट मेटल वर्कर, सर्व्हेअर, टूल अॅण्ड डाय मेकर, टर्नर, वेल्डर, वायरमन इ. (एकूण ६४ ट्रेड्स)

वयोमर्यादा – (दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी) चार्जमन/ ट्रेड्समन मेट पदांसाठी १८ ते २५ वर्षे, सिनियर ड्राफ्ट्समन पदांसाठी १८ ते २७ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – खुला – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा/अज – १५ वर्षे).

सर्व पदांसाठी उच्च पात्रताधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. जर त्यांनी किमान शैक्षणिक अर्हता धारण केलेली असेल.

वेतन – चार्जमन/ सिनियर ड्राफ्ट्समन पदांसाठी पे-लेव्हल – ६ रु. ३५,४००/- मूळ वेतन रु. १६,२८४/- डीए इतर भत्ते.

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी (कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशन) बोलाविले जाईल. ज्यात १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यासी प्रश्न असतील. परीक्षेचा अभ्यासक्रम इंडियन नेव्हीच्या ऑफिशियल http://www.indiannavy.gov.in या वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये दिलेला आहे. (सेक्शन-ए – जनरल इंटेलिजन्स – २५ प्रश्न; सेक्शन-बी – जनरल अवेअरनेस – २५ प्रश्न, सेक्शन-सी – क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – २५ प्रश्न, सेक्शन-डी – इंग्लिश लँग्वेज – २५ प्रश्न. एकूण १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ९० मिनिटे.

गुणवत्ता यादी इंडियन नेव्हीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. २९५/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.)

परीक्षा केंद्र – मुंबई, हैदराबाद, भोपाळ, अहमदाबाद इ. देशभरातील १३ केंद्र. उमेदवारांनी ३ परीक्षा केंद्रांसाठी पसंतीक्रम ऑनलाइन अर्जात नोंदविणे आवश्यक.

अॅडमिट कार्ड http://www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल.

शंकासमाधानासाठी ई-मेल – recruitmenthelpdeskndsqst@gmail.com हेल्पडेस्क नं. ०८०-४३४३६०९०/९५.

ऑनलाइन अर्ज www. joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. ३१ डिसेंबर २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत. ( Join Navy & gt; Ways to join & gt; civilian & gt; INCET-०१/२०२३) पुढील अपडेट्ससाठी उमेदवारांनी http://www.joinindiannavy.gov.in किंवा http://www.joinindiannavy.nic.in ही संकेतस्थळे फॉलो करावीत.