VSSC Online Application 2024 : विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत (ISRO) ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. “संशोधन शास्त्रज्ञ, प्रोजेक्ट असोसिएट-I” पदाच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहिम आयोजित करण्यात आली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ६ मे आहे. ऑनलाईन अर्ज करणअयासाठी उमेदवाना ISRO VSSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
ISRO –Vikram Sarabhai Space Center Vacancy 2024 : वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे अधिकृत वय ४० वर्ष असले पाहिजे.
अधिकृत वेबसाईट – https://www.vssc.gov.in/
ISRO –Vikram Sarabhai Space Center Vacancy 2024 : पदसंख्या
संशोधन शास्त्रज्ञ ०२
प्रोजेक्ट असोसिएट-I ०१
हेही वाचा – परीक्षा न देता भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये मिळवा नोकरीची संधी! ५४ हजार पर्यंत मिळू शकतो पगार
ISRO – Vikram Sarabhai Space Center Recruitment 2024 – शैक्षणिक पात्रता
संशोधन शास्त्रज्ञ पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराकडे एकूण किमान ६५ % गुणांसह एम.एस्सी. (सर्व सेमिस्टरची सरासरी) हवामानशास्त्र(Meteorology) / वायुमंडलीय विज्ञानातील (Atmospheric Science) पदवी किंवा १० स्केल किंवा समतुल्य किमान ६..८४ ची CGPA/CPI ग्रेड असणे आवश्यक आहे.
प्रोजेक्ट असोसिएट-I पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराकडे किमान ६५ % गुणांसह (सर्व सेमिस्टरची सरासरी) भौतिकशास्त्र (Physics)/वातावरण विज्ञान (Atmospheric Science)/हवामानशास्त्रातील (Meteorology) M.Sc पदवी किंवा १० स्केल किंवा समतुल्य ६.८४ च्या किमान CGPA/CPI ग्रेड असले पाहिजे.
अधिकृत नोटिफिकेशन – https://www.vssc.gov.in/VSSC/advt330.htm
हेही वाचा – IIIT Nagpur recruitment 2024 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे नोकरीची संधी! माहिती पाहा
संशोधन शास्त्रज्ञ – लेव्हल १० रुपये ५६,१०० + भत्ता
प्रोजेक्ट असोसिएट- रुपये ३१,०००/- + एचआरए प्रत्येक महिना