सुहास पाटील
भारतीय नौसेना ( Indian Navy) भारत सरकारच्या अग्निपथ स्कीम अंतर्गत अविवाहित पुरुष/ अविवाहित महिला उमेदवारांची ‘अग्निवीर ( SSR) आणि अग्निवीर ( MR)’ पदांवर भरती. रिक्त पदांची संख्या जाहीर झालेली नाही. यापुढे सेलर ( SSR) आणि सेलर ( MR) पदांची थेट भरती होणार नाही. रिक्त पदांची राज्यनिहाय विभागणी केलेली असते.

(१) अग्निवीर ( SSR) – Agniveer ( SSR) ०२/२०२४ Batch

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
indian forest service exam 2023 results announced
भारतीय वनसेवा परीक्षेत मराठी टक्का वाढला; महाराष्ट्राच्या प्रतीक्षा काळे देशात दुसऱ्या स्थानी

पात्रता – १२ वी (फिजिक्स, मॅथेमॅटिक्स या विषयासह) किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ इन्स्ट्रूमेंटेशन टेक्नॉलॉजी/ आयटी/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

किंवा फिजिक्स/ मॅथेमॅटिक्स या नॉन-व्होकेशनल विषयांसह २ वर्षांचा व्होकेशन कोर्स किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. १२ वी परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना १२ वीचा निकाल निवड प्रक्रियेच्या दुसऱ्या स्टेजच्यावेळी सादर करावा लागेल.

(२) अग्निवीर ( MR) – Agniveer ( MR) ०२/२०२४ Batch

पात्रता – १० वी उत्तीर्ण. (१० वी परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.) त्यांना १० वीचा निकाल निवड प्रक्रियेच्या स्टेज-२ च्या वेळी सादर करावा लागेल. १० वीला किमान ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक.

अग्निवीर ( SSR) आणि अग्निवीर ( MR) पदांसाठी

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. १ नोव्हेंबर २००३ ते ३० एप्रिल २००७ दरम्यानचा असावा.

शारीरिक/वैद्याकीय मापदंड – उंची – पुरुष/महिला – किमान १५७ सें.मी.; वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात;

दृष्टी – चष्म्याशिवाय – चांगला डोळा – ६/१२, खराब डोळा – ६/१२; Corrected Vision – चांगला डोळा – ६/६, खराब डोळा – ६/६. वैद्याकीय तपासणी कठर चिल्का, ओरिसा येथे घेतली जाईल.

बॉडी टॅटू – कायम स्वरूपी बॉडी टॅटू चालणार नाहीत. परंतु हाताच्या आतल्या बाजूस (हाताचे कोपर ( elbow) ते मनगट ( wrist) असलेले टॅटू चालू शकतात. हाताच्या पंजाच्या मागच्या बाजूस ( dorsal part of hand)) असलेले टॅटू चालू शकतात.

भारतीय नौसेनेत अग्निवीर (SSR)/अग्निवीर ( MR) आता अस्तित्वास असलेल्या रँकपेक्षा एक नवीन वेगळी रँक असून यात उमेदवारांस फक्त ४ वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय नौसेनेमध्ये नेमणूक दिली जाईल. ४ वर्षांची कारकीर्द संपल्यानंतर त्यांची ४ वर्षांची कामगिरी पाहून त्या बॅचमधील २५ टक्के ‘अग्निवीर ( SSR)/अग्निवीर ( MR)’ यांना भारतीय नौसेनेच्या रेग्युलर कॅडरमध्ये भरती केले जाईल.

ट्रेनिंग – भरती केलेल्या ‘अग्निवीर ( SSR)/अग्निवीर ( MR)’ यांना मिलिटरी ट्रेनिंग INS चिल्का, ओरिसा येथे नोव्हेंबर २०२४ पासून दिले जाईल.

रजा – वार्षिक रजा – ३० दिवस, सिक लिव्ह – वैद्याकिय शिफारशीनुसार. या रजा भारतीय नौसेनेच्याच्या अत्यावश्यकता ( exigencies) पाहून दिल्या जातील. अग्निवीर ( SSR)/अग्निवीर ( MR) उमेदवार सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये वैद्याकीय सुविधा आणि कँटीन स्टोअर्स डिपार्टमेंटच्या सुविधा त्यांच्या नेमणुकीच्या कालावधीमध्ये मिळविण्यास पात्र असतील.

वेतन व इतर भत्ते – अग्निवीर (SSR)/अग्निवीर ( MR) पदांसाठी दरमहा एकत्रित वेतन – पहिल्या वर्षी रु. ३०,०००/-

(रु. २१,०००/-), दुसऱ्या वर्षी रु. ३३,०००/- (रु. २३,१००/-), तिसऱ्या वर्षी रु. ३६,५००/- (रु. २५,५५०/-) आणि चौथ्या वर्षे रु. ४०,०००/- (रु. २८,०००/-). यातून दरमहा ३० टक्के रक्कम सेवा निधी पॅकेजसाठी कापली जाईल. दरमहा हातात मिळणारे एकत्रित वेतन कंसामध्ये दर्शविले आहे. याशिवाय अग्निवीर ( SSR)/अग्निवीर ( MR) यांना रिस्क अँड हार्डशिप अलाऊन्स (लागू असल्यास) ड्रेस आणि ट्रव्हल अलाऊन्स दिला जाईल.

टर्मिनल फायदे – सेवा निधी पॅकेज – जेवढी रक्कम दरमहा अग्निवीर कॉर्प्स फंडाकरिता कापली जाईल. तेवढीच रक्कम दरमहा भारत सरकारकडून जमा केली जाईल. चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीर ( SSR) यांच्या सेवा निधीमध्ये एकूण रु. १०.०४ लाख जमा होतील. (अग्निवीर ( SSR) यांचे रु. ५.०२ लाख आणि सरकारचे रु. ५.०२ लाख) या रकमेवर नियमानुसार व्याज जमा होईल. अग्निवीर ( SSR) यांना कोणताही प्रॉव्हिडंट फंड भरावा लागणार नाही. तसेच त्यांना ग्रॅच्युईटी आणि कोणत्याही प्रकारचे पेन्शन मिळणार नाही.

इन्श्युरन्स – अग्निवीर ( SSR) यांना नॉन-काँट्रीब्युटरी रु. ४८ लाखांचे विम्याचे संरक्षण दिले जाईल. याशिवाय सेवेमध्ये तैनात असताना मृत्यु आल्यास रु. ४४ लाख दिले जातील.

अग्निवीर ( SSR) माजी सैनिक Ex- servicemen status साठी पात्र नाहीत.

निवड पद्धती – स्टेज-१ – ऑल इंडिया कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन इंडियन नेव्ही एन्ट्रन्स टेस्ट (l INETl) (जून/जुलै २०२४ मध्ये)घेवून राज्यनिहाय उमेदवार पुढील भरती प्रक्रियेसाठी (स्टेज-२) निवडले जातील.

(१) अग्निवीर ( SSR) पदांसाठी INET मध्ये १०० ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न (१० २ स्तरावरील इंग्लिश, सायन्स, गणित आणि जनरल अवेअरनेस यावर आधारित) प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण १०० गुण, वेळ १ तास. (२) अग्निवीर ( MR) पदांसाठी INET मध्ये ५० ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न प्रत्येक प्रश्नास १ गुण, वेळ ३० मिनिटे. (२ विभाग – (१) विज्ञान आणि गणित (२) जनरल अवेअरनेस यावर आधारित). प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनचा निकाल परीक्षेनंतर ३० दिवसांत जाहीर केला जाईल.

परीक्षा शुल्क – रु. ५५०/- १८ जीएसटी ऑनलाइन मोडने भरावयाचे आहेत.

स्टेज-२ – INET मधून निवडलेल्या उमेदवारांना स्टेज-२ निवड प्रक्रियेसाठी (शारीरिक क्षमता चाचणी ( PFT), लेखी परीक्षा आणि रिक्रूटमेंट मेडिकल परीक्षा) कॉलअप लेटर जारी केले जातील. INET आणि लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम www. joinindiannavy. gov. in आणि https:// agniveernavy. cdac. in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

शारीरिक क्षमता चाचणी ( PFT) – ऑनलाइन टेस्ट उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून PFT साठी निवडलेल्या उमेदवारांची यादी https:// agniveernavy. cdac. in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. नेमून दिलेल्या दिवशी उमेदवारांना ढाळ साठी नियुक्त केलेल्या सेंटरवर हजर रहावे. पुरुषांसाठी PFT मध्ये १.६ कि.मी. अंतर पुरुषांनी ६ मिनिटे ३० सेकंदांत धावणे आणि महिलांनी ८ मिनिटांत धावणे आणि पुरुषांसाठी – १५ पुशअप्स व २० स्क्वॅट्स (उठक बैठक) तसेच १५ Bent Knee sit- ups आणि महिलांसाठी १५ स्क्वॅट्स (उठक बैठक आणि १० ( Bent Knee Situps) व १० पुशअप्स ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक.

PFT मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची रिक्रूटमेंट मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाईल. यात अपात्र ठरलेले उमेदवार ५ दिवसांच्या आत नेमून दिलेल्या इंडियन नेव्हीच्या हॉस्पिटलकडे अपिल करू शकतील. प्रोव्हिजनली निवडलेल्या उमेदवारांची फायनल रिक्रूटमेंट मेडिकल एक्झामिनेशन INS, Chilka येथे होईल. अंतिम निकाल ऑक्टोबर २०२४ मध्ये जाहीर केला जाईल.

अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो (जो एप्रिल २०२४ पूर्वी घेतलेला नसावा.) ( size १०-५० KB) आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. उमेदवारांनी काळ्या पाटीवर पांढऱ्या खडूने आपले नाव ( Capital letters मध्ये) आणि फोटो काढल्याचा दिनांक लिहून पाटी छातीजवळ धरून फोटो काढावा.

ऑनलाइन अर्ज https:// agniveernavy. cdac. in या संकेतस्थळावर दि. १३ मे ते २७ मे २०२४ दरम्यान करावेत. उमेदवारांना देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटर्स ( CSC) मधून अर्ज रु. ६०/- जीएसटी भरून अपलोड करता येतील.