सुहास पाटील
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ( CBSE) (शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एक स्वायत्त संस्था) ( Advt. No. CBSE/ Rectt. Cell/ Advt/ FA/०१/२०२४ dt. ८.३.२०२४) अखिल भारतीय स्पर्धा परीक्षेतून पुढील पदांची थेट भरती.

(१) ज्युनियर अकाऊंटंट (ग्रुप-सी) – २० पदे (अजा – ३, अज – २, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ८) (१ पद दिव्यांगांसाठी राखीव).

RITES Recruitment 2024:
RITES Recruitment: परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार निवड; केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी
The Institute of Banking Personnel Selection Recruitment Apply for Various post Vacancies Check Details
IBPS Recruitment 2024: बँकेत काम करायचंय? आयबीपीएस अंतर्गत ‘या’ विविध पदांवर भरती सुरू; असा करा अर्ज
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…

पात्रता – १२ वी (अकाऊंटन्सी/ बिझनेस स्टडीज/ इकॉनॉमिक्स/ कॉमर्स/ आंतरप्रुनरशिप/ फिनान्स/ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन/ टॅक्सेशन/ कॉस्ट अकाऊंटिंग यापैकी एका विषयासह) उत्तीर्ण आणि कॉम्प्युटरवर टायपिंग स्पीड इंग्लिश ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि.

(२) अकाऊंटंट (ग्रुप-सी) – ७ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ५) (१ पद दिव्यांगांसाठी राखीव).

पात्रता – पदवी (इकॉनॉमिक्स/ कॉमर्स/ अकाऊंट्स/ फिनान्स/ बिझनेस स्टडीज/ कॉस्ट अकाऊंटन्सी यापैकी एका विषयासह) उत्तीर्ण आणि कॉम्प्युटरवर टायपिंग स्पीड इंग्लिश ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि.

(३) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (ग्रुप-बी) – ७ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).

पात्रता – पदव्युत्तर पदवी (हिंदी/ इंग्रजी विषय किंवा इंग्रजी/ हिंदी माध्यमातून) उत्तीर्ण आणि हिंदीतून इंग्रजी/इंग्रजीतून हिंदी भाषांतर डिप्लोमा/ सर्टिफिकेट कोर्स किंवा केंद्र/ राज्य/ केंद्रीय सार्वजनिक उपक्रमात भाषांतराचा ३ वर्षांचा अनुभव.

(४) ज्युनियर इंजिनिअर (ग्रुप-बी) – १७ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८) (१ पद दिव्यांगांसाठी राखीव).

पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी.

(५) अकाऊंट्स ऑफिसर (ग्रुप-ए) – ३ पदे (खुला).

पात्रता – इकॉनॉमिक्स/ कॉमर्स/ अकाऊंट्स/ फिनान्स/ बिझनेस स्टडीज/ कॉस्ट अकाऊंटिंग यापैकी एका विषयासह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.

किंवा पदवी आणि SAS/ JAO ( C) परीक्षा उत्तीर्ण किंवा एम.बी.ए. (फिनान्स)/ CA/ ICWA.

इष्ट पात्रता ( Desirable) – अकाऊंट्स कम्प्लिशन, बजेट, इंटर्नल ऑडिट, कमर्शियल अकाऊंटिंग, इन्व्हेस्टमेंट्स, फंड्स मॅनेजमेंट संबंधित कामाचा अनुभव.

(६) असिस्टंट सेक्रेटरी (ट्रेनिंग) (एज्युकेशन, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, कॉमर्स, आयटी ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स, मल्टिमीडिया अॅण्ड मास कम्युनिकेशन, डिझाईन, इंग्लिश, हिंदी – प्रत्येकी २ पदे) (ग्रुप-ए) – २२ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ११) (१ पद दिव्यांगांसाठी राखीव).

पात्रता – (१) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, (२) बी.एड., (३) NET/ SLET किंवा समतूल्य किंवा डॉक्टरेट पदवी.

(७) असिस्टंट सेक्रेटरी (स्किल एज्युकेशन) (ॲग्रिकल्चर, फूड न्यूट्रिशन ॲण्ड फूड प्रोडक्शन, टूरिझम, ब्युटी ॲण्ड वेलनेस – प्रत्येकी १ पद, आयटी ॲण्ड एआय, BFSI ॲण्ड मार्केटिंग – प्रत्येकी २ पदे) (ग्रुप-ए) – ८ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – ५).

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

इष्ट पात्रता – (१) इंजिनीअरिंग पदवी, (२) पीएच.डी. (शैक्षणिक काम/ व्होकेशनल एज्युकेशन), (३) इंडस्ट्रीसोबत प्रोग्राम बनवून आणि चालविण्याचा अनुभव इ.

(८) असिस्टंट सेक्रेटरी (ॲकॅडेमिक्स) (हिंदी, इंग्लिश, फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, एज्युकेशन, सायकॉलॉजी, फिजिकल एज्युकेशन, मॅथेमॅटिक्स, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जीओग्राफी, आयटी, स्टॅटिस्टिक्स – प्रत्येकी १ पद) (ग्रुप-ए) – १६ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७) (१ पद दिव्यांगांसाठी राखीव).

पात्रता – (१) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, (२) बी.एड. पदवी, (३) NET/ SLET किंवा समतूल्य किंवा डॉक्टरेट पदवी.

इष्ट पात्रता – एम.एड./ एम.फिल.

(९) असिस्टंट सेक्रेटरी (ॲडमिनिस्ट्रेशन) (ग्रुप-ए) – १८ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – १०).

पात्रता – पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – (दि. ११ एप्रिल २०२४ रोजी) पद क्र. १ ते ३, ६ ते ८ साठी ३० वर्षे; पद क्र. ४ साठी ३२ वर्षे; पद क्र. ५ व ९ साठी ३५ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे, महिला – १० वर्षे)

वेतन श्रेणी – पद क्र. १ – पे-लेव्हल – २ अंदाजे वेतन रु. ३६,०००/-; पद क्र. २ – पे-लेव्हल – ४ अंदाजे वेतन रु. ४९,०००/-; पद क्र. ३ व ४ – पे-लेव्हल – ६ अंदाजे वेतन रु. ६६,०००/-; पद क्र. ५ ते ९ – पे-लेव्हल – १० अंदाजे वेतन रु. १,०७,०००/- दरमहा.

परीक्षा शुल्क – ग्रुप-ए पदांसाठी रु. १,५००/-; ग्रुप-बी व सी साठी रु. ८००/-. (अजा/अज/दिव्यांग/माजी सैनिक/महिला यांना फी माफ आहे.)

परीक्षा शुल्क यशस्वीरित्या भरल्यावर ई-रिसिप्ट जनरेट होईल. त्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याची माहिती ऑनलाइन अर्जात भरावयाची आहे.

निवड पद्धती – पद क्र. १ ज्युनियर अकाऊंटंट – MCQ टाईप ऑब्जेक्टिव्ह ( OMR) बेस्ड टेस्ट १२० प्रश्न, २४० गुण, वेळ २ तास.

पद क्र. २, ३ व ४ साठी – MCQ टाईप ऑब्जेक्टिव्ह ( OMR) बेस्ड् टेस्ट – १५० प्रश्न, ३०० गुण, वेळ तास.

पद क्र. १ व २ साठी स्किल टेस्ट (टायपिंग) फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

पद क्र. ५ ते ९ (ग्रुप-ए) – ( a) टियर-१ – MCQ टाईप ऑब्जेक्टिव्ह ( OMR) बेस्ड टेस्ट – १५० प्रश्न, ३०० गुण, वेळ तास.

( b) टियर-२ – लेखी परीक्षा ३२० गुणांसाठी वेळ ३ तास.

( c) इंटरह्यू – ८० गुणांसाठी.

विषयनिहाय परीक्षेचा अभ्यासक्रम www. cbse. nic. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

MCQ टाईप ऑब्जेक्टिव्ह ( OMR) बेस्ड् टेस्टमधील प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.५० गुण वजा केले जातील.

परीक्षा केंद्र  पुणे (महाराष्ट्र), विजयवाडा (आंध्र प्रदेश), बेंगलुरू (कर्नाटक), भोपाळ (मध्य प्रदेश) इ.

शंकासमाधानासाठी हेल्प लाईन नंबर – ०११-२२२४०११२ (०९.०० ते १७.३० वाजे दरम्यान) संपर्क साधावा किंवा srdsu @cbseshiksha. in वर ई-मेल करा.

ऑनलाइन अर्ज www. cbse. gov. in या संकेतस्थळावर दि. ११ एप्रिल २०२४ पर्यंत करावेत.