सुहास पाटील

एडसिल इंडिया लिमिटेड (EdCIL) (शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ( CPSE) मार्फत रॉयल गव्हर्न्मेंट ऑफ भूतानच्या हायर सेकंडरी स्कूल्समध्ये भारतीय पोस्ट ग्रॅज्युएट टिचर्सची ‘ STEM TEACHER’ पदांवर करार पद्धतीने भरती. निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला २ वर्षांकरिता नेमणूक दिली जाईल. त्यानंतर भूतान सरकार आणि उमेदवार यांच्या सहमतीने नेमणुकीचा कालावधी वाढविला जाईल.

Professor Dhirendra Pal Singh, Dhirendra Pal Singh Appointed as Chancellor of tis, Tata Institute of Social Sciences, tis Mumbai, tis new Chancellor, tis news, Mumbai news,
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या कुलपतीपदी धीरेंद्र पाल सिंग
job opportunities
नोकरीची संधी: भारतीय लष्करातील संधी
Indian Institute of Management Mumbai hiring post
IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये नोकरीची संधी! पाहा माहिती
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती

एकूण रिक्त पदे – १००.

विषयनिहाय रिक्त पदांचा तपशील –

(१) PGT कॉम्प्युटर सायन्स/ आयसीटी/ आयटी – २८ पदे.

(२) PGT फिजिक्स – १८ पदे.

(३) PGT केमिस्ट्री – १९ पदे.

(४) PGT मॅथेमॅटिक्स – ३५ पदे.

पात्रता – (दि. १६ जानेवारी २०२४ रोजी) ( i) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

( ii) PGT फिजिक्स, PGT केमिस्ट्री, PGT मॅथेमॅटिक्स बॅचलर ऑफ एज्युकेशन ( B. Ed.) पदवी अनिवार्य आहे. PGT कॉम्प्युटर सायन्स/आय्सीटी पदांकरिता B. Ed. उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल.

( iii) इंग्रजी भाषेत शिकविण्याचे कौशल्य अवगत असावे.

( iv) ११ वी/१२ वीला संबंधित विषय शिकविण्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.

( v) शिक्षण क्षेत्रातील उच्च दर्जाचे तंत्रज्ञान अवगत असावे.

( vi) वयोमर्यादा ५५ वर्षेपर्यंत.

वेतन – उमेदवारांना हजर झाल्या दिनांकापासून दरमहा रु. १,४०,०००/- वेतन दिले जाईल. उमेदवारांना वर्क परमिट मिळविण्यासाठी लागणारे सर्व सहाय्य भूतान गव्हर्न्मेंट देणार आहे.

रजा, वैद्याकीय सुविधा, प्रवासाचा खर्च ( Travel Passage) आणि इतर अटी करारात नमूद केल्याप्रमाणे असतील.

सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना NOC/ VIGILANCE/ SERVICE Certificate कागदपत्र पडताळणी/इंटरह्यूच्या वेळी सादर करावे लागेल.

निवड पद्धती – शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. पाहून शॉर्ट लिस्टेड उमेदवारांचा ऑनलाइन इंटरह्यू घेवून निवडलेल्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत फिजिकल (इंटरह्यू) घेतली जाईल.

शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना इंटरह्यूची तारीख, ठिकाण, प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख इ. त्यांच्या ई-मेलवर कळविण्यात येतील. प्रत्यक्ष मुलाखत नवी दिल्ली येथे आयोजित केल्या जातील.

शंकासमाधानासाठी हेल्प डेस्क नंबर ( ९१) ८१३००१३२६५ वर सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा किंवा helpsecondment@edcil. co. in वर ई-मेल करावा.

ज्या उमेदवारांनी EdCIL/ Bhutan Secondment – STEM Teachers/०३-२०२३/०१ या EdCIL ने जारी केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेले उमेदवार सदरच्या भरतीसाठी पात्र नाहीत.

ऑनलाइन अर्ज http:// edcilteacherrecruitment. com या संकेतस्थळावर दि. १५ फेब्रुवारी २०२४ (२३.०० वाजे)पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जासोबत फोटोग्राफ आणि सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करावेत. ऑनलाइन अर्जाची प्रिंटआऊट त्यावर अलिकडच्या काळात ३ आठवड्यांपर्यंत काढलेला फोटोग्राफ चिकटवून कागदपत्र पडताळणीच्या वेळी इतर मूळ कागदपत्रांसह सादर करणे अनिवार्य आहे.