१२ वी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण उमेदवारांना आपले सध्याचे शिक्षण चालू ठेवून आयआयटी, मद्रासमध्ये पुढील ऑनलाइन इंजिनीअरिंग डिग्री कोर्सेसच्या मे २०२४ बॅचकरिता जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा न देतासुद्धा प्रवेश.

(१) बी.एस. डिग्री इन डेटा सायन्स अँड ॲप्लिकेशन्स

Admission, Center for Nano Science,
नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी केंद्राच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात, मुंबई विद्यापीठातर्फे १६ जून रोजी प्रवेश परीक्षा
Mumbai university Online Enrollment
महाविद्यालयाच्या प्रवेश अर्जासह मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन नावनोंदणीही बंधनकारक, पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत आवाहन
Admission , 12th DL. ed,
बारावीनंतरच्या डीएल.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जाहीर, पहिली गुणवत्ता यादी कधी?
Mumbai university ba result marathi news
मुंबई: ‘बी.ए.’च्या ६ व्या सत्र परीक्षेमध्ये ४९.३१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, ५०.६९ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण
way to choose right educational institution for career in design
डिझाइन रंग-अंतरंग : ‘डिझाइन’ करिअरसाठी योग्य शिक्षणसंस्थेची निवड कशी करावी?
Technical education diploma course admission process from tomorrow
तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून… किती जागा उपलब्ध?
Education Opportunities at Bhabha Atomic Research Centre mrj 95
शिक्षणाची संधी : बी.ए.आर.सी.मधील संधी
Admission, postgraduate,
पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू, मुंबई विद्यापीठातर्फे वेळापत्रक जाहीर

(२) बी.एस. डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम

बी.एस. डिग्री इन डेटा सायन्स अँड ॲप्लिकेशन्स –

पात्रता – १२ वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण (जसे की AICTE किंवा स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मान्यताप्राप्त ३ वर्षं कालावधीचा डिप्लोमा).

कोर्स करण्यासाठी फाऊंडेशन लेव्हलला रेग्युलर एन्ट्रीकरिता उमेदवारांना Qualifier प्रोसेसला सामोरे जावे लागेल.

Qualifier Preparation – क्वालिफायर प्रोसेसमध्ये ४ आठवड्यांच्या व्हिडीओद्वारा प्रसारित कोर्स वर्क, असाईन्मेंट्स आणि ४ फाऊंडेशन लेव्हल कोर्सेस यांचा समावेश असेल. (इंग्लिश – १, मॅथेमॅटिक्स फॉर डेटा सायन्स – १, स्टॅटिस्टिक्स फॉर डेटा सायन्स – १ आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग) प्रत्येक कोर्सच्या ग्रेडिंगकरिता दर आठवड्याला असाईन्मेंट्स प्रस्तुत (सबमिट) करणे आवश्यक.

हेही वाचा >>> TISS recruitment 2024: मुंबई येथील ‘टीआयएसएस’मध्ये नोकरी करण्याची संधी; ७५ हजार रुपयांपर्यंत मिळणार वेतन, आजच करा अर्ज

Qualifier Exam – ४ आठवड्यांच्या अभ्यासावर आधारित ४ आठवड्यांच्या शेवटास पात्रता परीक्षा (Qualifier Exam) घेतली जाईल.

पात्रता परीक्षेस (Qualifier Exam) कोण पात्र ठरतील – ज्या उमेदवारांना पात्रतेसाठी सर्व चार कोर्सेसमध्ये असाईन्मेंट्ससाठी नेमून दिलेले किमान सरासरी गुण मिळतील अशा उमेदवारांच्या प्रत्येक कोर्ससाठी पहिल्या ३ असाईन्मेंट्स स्कोअरमधील बेस्ट ऑफ २ सरासरी स्कोअरनुसार उमेदवारांना पात्रता परीक्षेस ( Qualifier Exam) साठी पात्र ठरतील.

प्रत्येक कोर्ससाठी असाईन्मेंट्स स्कोअरचे नेमून दिलेले सरासरी किमान अशाप्रकारे – (१) खुला गट – ४० टक्के गुण, (२) अजा/अज/दिव्यांग – ३० टक्के गुण, (३) इमाव/ईडब्ल्यूएस – ३५ टक्के गुण.

Qualifier Exam उत्तीर्ण होण्यासाठीचे निकष –

जे उमेदवार Qualifier Exam ला बसण्यास पात्र ठरतील फक्त त्यांनाच हॉल तिकीट पाठविण्यात येईल.

उमेदवाराने प्रत्यक्षात हजर राहून ४ आठवड्यांच्या कोर्स वर्कच्या शेवटास ४ तास कालावधीची चारही कोर्सेसची Qualifier Exam द्यावयाची आहे.

Qualifier Exam उत्तीर्ण करण्यासाठी नेमून दिलेले सरासरी Qualifier Exam स्कोअर (खुला गट – ५० टक्के, अजा/अज/दिव्यांग – ४० टक्के, इमाव/ईडब्ल्यूएस – ४५ टक्के) आणि प्रत्येक कोर्ससाठी नेमून दिलेले सरासरी Qualifier Exam स्कोअर (खुला गट – ४० टक्के, अजा/अज/दिव्यांग – ३० टक्के, इमाव/ ईडब्ल्यूएस – ३५ टक्के).

जे उमेदवार Qualifier Exam उत्तीर्ण करतील तेच फाऊंडेशन लेव्हल कोर्ससाठी पात्र ठरतील. असे उमेदवार पहिल्या वर्षाच्या तीनपैकी कोणत्याही टर्मसाठी प्रवेश घेऊ शकतील. क्वालिफायर एक्झामचा निकाल पहिल्या वर्षाच्या ३ टर्म्ससाठी ग्राह्य धरला जाईल. ज्या उमेदवारांना क्वालिफायर एक्झाममध्ये (१) किमान ७० टक्के पेक्षा अधिक गुण मिळतील त्यांना ४ कोर्सेससाठी, (२) किमान ५० टक्के-७० टक्के गुण मिळतील त्यांना ३ कोर्सेसकरिता, (३) किमान पात्रतेचे गुण ते ५० टक्के गुण मिळतील त्यांना २ कोर्सेसकरिता प्रवेश घेता येईल.

या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर.

अर्जाचे शुल्क – अजा/अजचे उमेदवार जे दिव्यांग आहेत – रु. ७५०/-; अजा/अज/दिव्यांग उमेदवार – रु. १,५००/-; खुला प्रवर्ग/इमाव – रु. ३,०००/

-.उर्वरित भाग पुढील अंकात