सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाब नॅशनल बँक ( PNB), मानव संसाधन विभाग, मुख्यालय, नवी दिल्ली – १०२५ स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदांची भरती. (१) ऑफिसर क्रेडिट ( JMGS- I) (वेतन श्रेणी – ३६,००० – ६३,८४०) – एकूण १,००० पदे (अजा – १५२, अज – ७८, इमाव – २७०, ईडब्ल्यूएस – १००, खुला – ४००) (४८ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी (कॅटेगरी OC – १२, HI – १३, VI – १०, ID – १३ पदे) राखीव).

पात्रता – (दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी) पूर्णवेळ एमबीए किंवा मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदविका (फिनान्स स्पेशलायझेशनसह) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा CA/ CFA/ CMA.

वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०२४ रोजी) २१ ते २८ वर्षे.

(२) मॅनेजर फोरेक्स (MMG Scale II) (वेतन श्रेणी – ४८,१०० – ६९,८१०) – एकूण १५ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७).

पात्रता – पूर्ण वेळ एम्बीए किंवा मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदविका (फिनान्स/इंटरनॅशनल बिझनेस स्पेशलायझेशनसह) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

हेही वाचा >>> पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! AAI मध्ये ४९० पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या पात्रता निकष

अनुभव – ऑफिसर पदावरील संबंधित क्षेत्रातील कामाचा २ वर्षांचा अनुभव.

इष्ट पात्रता – FEDAI/ IIBF/ NIBM यांचेकडील Forex मधील सर्टिफिकेट कोर्स केला असल्यास प्राधान्य.

(३) मॅनेजर सायबर सिक्युरिटी (MMG Scale II) (वेतन श्रेणी – ४८,१०० – ६९,८१०) – एकूण ५ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ३).

पद क्र. २ व ३ साठी वयोमर्यादा – २५ ते ३५ वर्षे.

अनुभव – मॅनेजर सायबर सिक्युरिटी पदासाठी संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव.

(४) सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी (MMG Scale III) (वेतन श्रेणी – ६३,८४० – ७८,२३०) – एकूण ५ पदे (अज – १, इमाव – १, खुला – ३).

वयोमर्यादा – २७ ते ३८ वर्षे.

हेही वाचा >>> सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ‘या’ विभागात ४ हजार पदांसाठी बंपर भरती, लगेच करा अर्ज

पद क्र. ३ व ४ साठी पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदवी किंवा एम.सी.ए. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि पुढीलपैकी किमान १ सर्टिफिकेशन

( i) CCNA,

( ii) CCNA Security,

( iii) CCSE,

(iv) PCNSE.

सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी पदासाठी संबंधित कामाचा किमान ४ वर्षांचा अनुभव.

कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे.

निवड पद्धती – ऑनलाईन लेखी परीक्षा – पार्ट-१ – ( i) रिझनिंग – २५ प्रश्न, २५ गुण; ( ii) इंग्लिश लँग्वेज – २५ प्रश्न, २५ गुण; ( iii) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ५० प्रश्न, ५० गुण. पार्ट-२ – प्रोफेशनल नॉलेज – ५० प्रश्न, १०० गुण, एकूण १५० प्रश्न, २०० गुण, वेळ १२० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

इंटरह्यू – ५० गुणांसाठी.

परीक्षा केंद्र – मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/MMR/ नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर.

अर्जाचे शुल्क – अजा/अज/दिव्यांग – रु. ५०/- जीएसटी. एकूण रु. ५९. इतर कॅटेगरीसाठी रु. १,०००/- जीएसटी. एकूण रु. १,१८०/-.ऑनलाइन अर्ज www.pnbindia.in या संकेतस्थळावर दि. २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment in punjab national bank job opportunity in punjab national bank zws