SAIL Recruitment 2024 : सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती मोहिमेचे १०८ रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट आहे. द स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (SAIL) भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sail.co.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया १६ एप्रिलपासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ७ मे २०२४ असेल.

SAIL Recruitment 2024 : भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, पगार, अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती
RITES Recruitment 2024:
RITES Recruitment: परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार निवड; केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी
SECR Recruitment 2024 jobs at railway
SECR Recruitment 2024 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी मोठ्या संख्येने होणार भरती! अधिक माहिती पाहा
set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार

रिक्त पदे आणि पदसंख्या –

२७ एक्झिक्युटिव्ह व ८१ नॉन-एक्झिक्युटिव्ह कॅडरच्या १०८ रिक्त जागांसाठी ही भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा…IBPS Recruitment 2024: बँकेत काम करायचंय? आयबीपीएस अंतर्गत ‘या’ विविध पदांवर भरती सुरू; असा करा अर्ज

पगार –

  • कन्सल्टंट अर्थात सल्लागार – ८०,००० ते २,२०,००० रुपये.
  • मेडिकल ऑफिसर – ५०,००० ते १,६०,००० रुपये.
  • मॅनेजमेंट ट्रेनी, असिस्टंट मॅनेजर – ६०,००० ते १,८०,००० रुपये.
  • ऑपरेटर आणि टेक्निशियन ट्रेनी, Mining फोरमन, सुरक्षा रक्षक (Surveyor) – २६,६०० ते ३८,९२० रुपये.
  • मायनिंग मेट (Mining Mate), परिचर आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी, मायनिंग सरदार – २५,०७० ते ३५,०७० रुपये.

ठिकाण – झारखंड, बोकारो स्टील प्लांट

निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी यांच्याद्वारे पार पडेल. तर, अशा प्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.