UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल २०२२

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून वर्ष २०२२ चा राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल जाहीर करण्यात आला आहे. २०२२ या वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये २५ टक्क्यांनी तर महिलांवरील अत्याचारात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याबरोबरच आर्थिक गुन्ह्यांमध्ये ११ टक्क्यांनी, तर ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध गुन्ह्यांमध्ये ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Pointing out lack of coordination in development system Nitin Gadkari reprimanded officials
विकास यंत्रणातील असमन्वयाकडे लक्ष वेधत गडकरी यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Antar Singh Aryas appeal to youth says responsibility of youth to save tribals
आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी, युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन
Sharad Pawar, Sharad Pawar on Educational Expansion in Maharashtra, pune
राज्यातील शिक्षण विस्ताराकडे गांभीर्याने पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन आवश्यक- शरद पवार
Anil Deshmukh, Shakti Act,
महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायद्याला केंद्रामुळे विलंब? माजी गृहमंत्र्यांनी थेटच…
Free electricity, farmers, mahavitaran,
मोफत वीज योजना : नाव शेतकऱ्यांचे, लाभ महावितरणचा, वीज ग्राहक संघटना म्हणते..
Addiction, Abuse, Womens Commission, Akola,
“व्यसनाधीनतेतून शोषणासारख्या गैरकृत्यात वाढ,” महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा निष्कर्ष
Jitendra awhad marathi news
कळवा, मुंब्रा, दिव्यात एकाच कामावर दोनदा खर्च?; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी, आर्थिक आणि सामाजिक विकास-शाश्वत विकास, गरिबी आणि लोकसंख्याशास्त्र, तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील शासन धोरण आणि अंमलबजावणी या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

१ ) राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार, वर्ष २०२२ मध्ये एकूण ६५ हजार ८९३ सायबर गुन्हे दाखल झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यात २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये ही संख्या ५२ हजार ९७४ एवढी होती. याशिवाय सायबर गुन्ह्यांचा दर ( प्रती लोकसंख्येनुसार ) ४.८ आहे, जो २०२१ मध्ये ३.९ टक्के होता.

२) आर्थिक गुन्ह्यांमध्येही ११ टक्क्यांनी वाढ झाली असून वर्ष २०२२ मध्ये आर्थिक फसवणुकीचे १,९३,३८५ गुन्हे दाखल झाले आहेत. मागील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये ही संख्या १,७४,०१३ एवढी होती.

३) अनुसूचित जातीच्या लोकं पीडित असलेल्या गुन्ह्यांमध्येही १३.१ टक्क्यांनी वाढ झाली असून २०२२ या वर्षात एकूण ५७, ५८२ गुन्हे दाखल झाले आहे. २०२१ मध्ये या गुन्ह्यांची संख्या ५०,९०० इतकी होती. तसेच अनुसूचित जमातीच्या लोकं पीडित असलेल्या गुन्ह्यांमध्येही १४.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

४) वयोवृद्ध नागरिक पीडित असलेलेल्या गुन्ह्यांमध्येही ९ टक्क्यांनी वाढ झाली असून या गुन्ह्यांची संख्या २८, ५४५ इतकी आहे. जी गेल्या वर्षी २६,११० इतकी होती.

५) २०२२ या वर्षात महिला पीडित असलेल्या गुन्ह्यांमध्येही ४ टक्क्यांनी वाढ झाली असून ही संख्या ४,४५,२५६ इतकी आहे, जी २०२१ मध्ये ४,२८,२७८ इतकी होती. यापैकी ३१.४ टक्के प्रकरणं ही घरघुती हिंचाराची असून १९.२ टक्के प्रकरणं अपहरणांची, १८.७ टक्के प्रकरणं विनयभंगाची आणि ७.१ टक्के प्रकरणं ही बलात्काराची आहेत.

६) २०२२ मध्ये विदेशी नागरिक पीडित असलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून ही संख्या १९२ इतकी आहे, जी २०२१ मध्ये १५० इतकी होती. यामध्ये चोरीची ३४ तर बलात्काची २८ प्रकरणं आहेत. यापैकी ५६.८ टक्के पीडित हे आशियाई देशातील असून १८ टक्के पीडित आफ्रीकन देशातील आहेत.

२) जागतिक मलेरिया अहवाल

जागतिक पातळीवर मलेरिया रुग्णांची संख्या वाढती असली तरी भारतात मात्र मलेरियाचे रुग्ण आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांची संख्या घटताना दिसत आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील शासन धोरण या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारताने मलेरियाला कसं काबूत आणलं आहे? हवामान बदलाचा मलेरियाला आटोक्यात आणण्यात किती वाटा आहे? मलेरिया निर्मुलनासाठी आणखी कोणत्या उपाययोजनांची आवश्यकता आहे? आणि मलेरियासंदर्भात भारतापुढची आव्हानं काय आहेत? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालेल्या जागतिक मलेरिया अहवालानुसार, डासांच्या माध्यमातून होणाऱ्या मलेरियामुळे भारतात होणाऱ्या संसर्गाचं आणि मृत्यूचं प्रमाण कमी होत आहे. भारतात मलेरियाचे ३३.८ लाख रुग्ण असल्याचं हा अहवालात सांगण्यात आलं आहे. तसेच मलेरियामुळे भारतात ५५११ रुग्णांचा मृत्यू झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. मलेरियामुळे झालेल्या मृत्यूचं प्रमाणही गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी खाली आलं आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.