टेक्निकल क्षेत्रात काम करण्याची अनेक तरुणांची आवड असते. मात्र, यातून नोकरी मिळवण्यासाठी इंजिनिअरिंगची पदवी असणे आवश्यक असते. त्यामुळे टेक्निकलमधले ज्ञान, आवड असतानाही काही जण त्या दिशेने जात नाहीत. पण आता असे काही कोर्स आहेत, ज्यात तुम्ही इंजिनिअरिंगमधील पदवीधर नसलात तरी यातून चांगल्या पगाराची नोकर मिळवू शकता. दरम्यान, सायबर सिक्योरिटी, डेटा सायन्स आणि यूएक्स-यूआई डिझाइन्ससारख्या क्षेत्रात कुशल तरुणांची कमी दिसून येते. पण, असे काही कोर्सेस आहेत ज्यात तुम्ही कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटीमध्ये पदवी घेतल्यानंतर शिकू शकता. अशाच काही कोर्सेसबद्दल जाणून घेऊ…

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट

सॉफ्टवेअर डेव्हलपरचे काम कॉम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टमची ताकद वाढवणे आणि त्यातील तांत्रिक अडचणी दूर करणे हे असते. यात फूल स्टॉक डेव्हलपर, अँड्रॉइड डेव्हलपर, सिस्टम डेव्हलपर आणि फ्रंट अँड डेव्हलपर असे स्पेशलायझेशन कोर्सेस आहेत.

SECR Recruitment 2024 jobs at railway
SECR Recruitment 2024 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी मोठ्या संख्येने होणार भरती! अधिक माहिती पाहा
RITES Recruitment 2024:
RITES Recruitment: परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार निवड; केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
AAI JE 2024 registration begins for 490 Junior Executive
AAI JE 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये ४९० पदांसाठी होणार भरती, १ मेपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

बीएस्सी (गणित), बीसीए, कॉम्प्युटर सायन्स असलेले तरुण यात सहजपणे करियर करू शकतात. पण, यासाठी गणित विषयावर जबरदस्त पकड हवी. तसेच आयटी क्षेत्रातील ज्ञान असणे गरजेचे आहे.

मुख्य प्रोग्रामिंग, लॅग्वेज जावा स्क्रिप्ट, जावा, पायथन, सी- लॅग्वेज, रुबी, सी++, डाटा स्ट्रक्चर-एल्गोरिदम,डेटाबेस, ऑपरेटिंग सिस्टम, कोड स्ट्रक्चर, सॉफ्टवेअर टेस्टिंग असे कोर्सेस आहेत. यात महिन्याला किमान पगार ३५ हजारांपासून सुरुवात होतो.

वेब डेव्हलपर

वेब डेव्हलपर वेबसाइट डिझायनिंग, प्रोग्राम, डाटाबेस, डोमेन, होस्टिंग हे काम करतो. कोणतीही वेबसाइट तयार करण्यासाठी आणि त्याची सुरक्षित देखभाल करण्यासाठी वेब डेव्हलपरची गरज असते.

१२ वीनंतर तुम्ही ऑनलाइन कोर्सेस आणि व्यावहारिक अनुभवांच्या आधारे कॉम्प्युटर लॅग्वेज आणि इतर वेब डेव्हलपमेंटमध्ये प्राविण्यता मिळवू शकता. यात १ ते ६ महिन्यांपर्यंत डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत.

यात अनुभव आणि कौशल्याची गरज आहे. यातही महिना किमान २५ हजार रुपये पगार मिळू शकतो.

नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर

नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, नेटवर्कमधून जाणारा सर्व डेटा सुरळीत जातोय की नाही हे पाहण्याचे काम करतो, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्ससंबंधित क्षेत्रात बीएससी करून किंवा १२ वीनंतर डिप्लोमा सर्टिफिकेशन कोर्सेसच्या माध्यमातून यात करियर करू शकतात.

विशेष म्हणजे Comp TIA Network+ किंवा Cisco Certified Network Associate (CCNA) सारखे सर्टिफिकेट तुम्हाला या क्षेत्रात नोकरी मिळवताना फायदेशीर ठरु शकेल. पदवीनंतर तुम्ही आयटीएसएमसारख्या व्यावसायिक संस्थेचे सर्टिफिकेश फायदेशीर ठरु शकेल, या क्षेत्रात महिना ३० हजार रुपये पगार मिळू शकतो.

सायबर सिक्योरिटी ॲनालिस्ट

सायबर सिक्योरिटी एनालिस्ट हा कोणत्याही संस्थेतील कॉम्प्युटर सिस्टम, नेटवर्क आणि डेटा सुरक्षा उल्लंघन तसेच सायबर अटॅकपासून बचाव करते. यासाठी कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे CompTIA + Certified Information Systerms Security Professional (CISSP) सारखे सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुम्ही सायबर सिक्योरिटीमध्ये करियर करू शकता. यातही महिना २५ हजारांपर्यंत पगार मिळू शकतो.

इतर कोर्सेस
१) बिझनेस ॲनालिस्ट
२ डेटा ॲनालिस्ट