CIFE Mumbai Bharti 2024: शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी कशी शोधायची असा प्रश्न अनेकांना पडतो. यादरम्यान आपण बायोडेटा इतरांना पाठवून ठेवतो किंवा जाहिराती पाहत असतो. तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असाल तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई अंतर्गत भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्जासहित २१ मे २०२४ रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचं आहे.
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई अंतर्गत ‘यंग प्रोफेशनल-II’ पदाच्या भारतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे फिश जेनेटिक्स आणि ब्रीडिंग (Breeding) / फिश बायोटेक्नॉलॉजी / एक्वाटिक ॲनिमल हेल्थ मॅनेजमेंट / फिश पॅथॉलॉजी ५ मायक्रोबायोलॉजी / एक्वाकल्चरमधील स्पेशलायझेशनसह फिशरीज सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी असावी.
वयोमर्यदा : उमेदवाराचे वय २१ ते ४५ वर्षे असावे.
पत्ता : ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई.
मुलाखतीला जाताना कोणती कागदपत्रे बरोबर ठेवाल ?
बायोडेटा , पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, प्रमाणपत्र / मार्कशीट / अनुभव प्रमाणपत्राच्या स्व-प्रमाणित प्रतींचा एक संच उमेदवाराने बरोबर घेऊन जावे.
पगार : ४२,००० रुपये.
अधिकृत वेबसाईट –
https://www.cife.edu.in/
अधिक माहितीसाठी अधिसूचना एकदा वाचून घ्यावी.
नोकरीसंबंधी उमेदवाराला अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. अधिकृत वेबसाइट व अधिसूचनेची लिंक वर नमूद केलेली आहे.