१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी. ‘मल्टि टािस्कग (नॉन-टेक्निकल) स्टाफ’ या पदांच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन दि. १६, ३० एप्रिल/७ मे २०१७ रोजी परीक्षा घेणार आहे.

एकूण पदे ८,३०० (महाराष्ट्र – ९१५, गुजरात – ५६४, गोवा – ९, पश्चिम विभागासाठी एकूण १,४८८)

पात्रता – १० वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते २५ वष्रे. (उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९२ ते १ ऑगस्ट १९९९ दरम्यानचा असावा.)

  • कमाल वयोमर्यादा – इमाव – २८ वष्रे ; अजा/अज – ३० वष्रे; परित्यक्ता/विधवा महिला आणि विकलांग-खुलागट – ३५ वष्रे, इमाव ३८ वष्रे, अजा/अज – ४० वष्रे. वेतन – किमान रु. २१,८१०/- प्रतिमाह.
  • निवड पद्धती – लेखी परीक्षा (१) पेपर-१ (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप) ज्यात (१) सामान्य बुद्धिमत्ता व कारणे (२५ गुण), (२) न्यूमरिकल अ‍ॅप्टिटय़ूड (अंकगणित) (२५ गुण), (३) इंग्रजी (५० गुण) आणि (४) सामान्य जागृती (५० गुण) या विषयांवर आधारित प्रश्न एकूण १५० गुण कालावधी दोन तास. प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील. तांत्रिकदृष्टय़ा शक्य झाल्यास स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा मराठी, गुजराती, कोकणी, कन्नड इ. प्रादेशिक भाषांत घेण्याचा विचार करत आहे.
  • (२) पेपर – २ (वर्णनात्मक – फक्त पात्रता स्वरूपाची) मराठी, गुजराती इ. (घटनेच्या ८ व्या परिशिष्टात दिलेल्या) भाषांमध्ये लघुनिबंध/पत्रलेखन (५० गुण, कालावधी ३० मि). अंतिम निवड पेपर-१ च्या गुणवत्तेनुसार केली जाईल.
  • परीक्षा शुल्क – रु. १००/- (नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड किंवा एसबीआय चलनद्वारे) (महिला/अजा/अज/विकलांग यांना फी माफ आहे.) परीक्षेला जाताना उमेदवारांनी sscwr.net http://www.sscwr.net/
  • या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले ‘अ‍ॅडमिट कार्ड’ आणि पुढीलपकी एक फोटो असलेले ओळखपत्र जसे की, ड्रायिव्हग लायसन्स, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, महाविद्यालयाने जारी केलेले ओळखपत्र इ. सोबत आणावे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज http://ssconline.nic.in/ या संकेतस्थळावर दि. ३० जानेवारी २०१७ पर्यंत करावेत. (परीक्षा शुल्क एसबीआय बँकेमार्फत चलनाने भरावयाचे असल्यास चलन डाऊनलोड करण्याचा अंतिम

दि. २५ जानेवारी २०१७ आहे.) लेखी परीक्षेचा (पेपर-१)

अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे –

  • सामान्य बुद्धिमत्ता – सांकेतिक (नॉन-व्हर्बल) पद्धतीचे प्रश्न – या चाचणीत समानता आणि फरक, जागा व्हिज्युअलायजेशन, समस्या सोडविणे, विश्लेषण, निर्णय, दृश्य स्मृती, भेदभाव निरीक्षण, संबंध संकल्पना, आकृती वर्गीकरण, अंकगणितीय संख्या मालिका, सांकेतिक मालिका, गोषवारा कल्पना (अ‍ॅबस्ट्रक्ट आयडिया), चिन्हे आणि त्यांचा संबंध, अंकगणितीय मोजणी इ. विषयांवर आधारित प्रश्नांचा समावेश असेल.
  • इंग्रजी भाषा – लेखन क्षमता चाचणी, भाषा शब्दसंग्रह, व्याकरण, वाक्यरचना, समानार्थी शब्द/विरुद्धार्थी शब्द यांचा योग्य वापर यांवर आधारित प्रश्न.
  • सांख्यिकीय क्षमता (न्यूमरिकल अ‍ॅप्टिटय़ूड) – संख्या श्रेणी, पूर्णाक/दशांश अपूर्णाक/अपूर्णाक आणि त्यांचा संबंध, मूलभूत अंकगणितीय क्रिया, टक्केवारी, प्रमाण आणि हिस्सा, सरासरी, व्याज, नफा व तोटा, सवलत, टेबल आणि ग्राफ, क्षेत्रमिती, वेळ आणि अंतर, प्रमाण आणि वेळ, काळ आणि काम यावर आधारित प्रश्न.
  • सामान्य जागृती (अवेअरनेस) – चालू घडामोडी (नित्य निरीक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून.) भारत आणि शेजारील देश यांच्या संबंधित खेळ, इतिहास, संस्कृती, भूगोल, आíथक स्थिती, राज्यपद्धती आणि भारतीय संविधान यांवर आधारित प्रश्न.