महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागात साहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून संधी –

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी. दूरध्वनी क्र. ०२२-२२७९५००० अथवा २२६७०२१० वर संपर्क साधावा अथवा आयोगाच्या www.upsc.gov.in अथवा  https://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०१७.

श्रम साधनाच्या दुर्गापूर बडनेरा येथील कृषी विज्ञान केंद्रात अ‍ॅग्रोनॉमी विषयतज्ज्ञांसाठी संधी –

अर्जदार अ‍ॅग्रोनॉमी विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. वयोमर्यादा ३५ वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११ ते १७ नोव्हेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली श्रम साधना कृषी विज्ञान केंद्र, अमरावतीची जाहिरात पाहावी अथवा केंद्राच्या  http://kvkdurgapur.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज श्रम साधना, कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर- बडनेरा, अमरावती- ४४४७०१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१७.

इस्रोच्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रात टेक्निशियन्सच्या ६९ जागा –

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रताधारक आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा ३५ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ नोव्हेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली इस्रोच्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्राची जाहिरात पाहावी अथवा केंद्राच्या http://www.shar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर २०१७.

 

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया सव्‍‌र्हिसेस बोर्ड, मुंबई अंतर्गत संशोधन अधिकाऱ्यांच्या ६ जागा –

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा आरबीआयच्या www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर २०१७.

भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडमध्ये वैज्ञानिक साहाय्यकांच्या १४ जागा –

अर्जदारांनी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसह बीएस्सी. अथवा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल वा इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदविका पात्रता कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ नोव्हेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय नाभिकीय विद्युत निगमची जाहिरात पाहावी अथवा निगमच्या http://www.bhavini.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर मॅनेजर (ह्य़ुमन रिसोर्सेस), भारतीय नाभिकीय विद्युत निगम, प्रोजेक्ट स्टेशन बिल्डिंग, कल्पक्कम- ६०३१०२ (तामिळनाडू) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर २०१७.

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, मुंबई अंतर्गत प्रोजेक्ट असिस्टंटसाठी संधी –

अर्जदार बीएस्सी पदवीधर अथवा इंजिनीअरिंगचे पदविकाधारक असावेत. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.ची जाहिरात पाहावी अथवा एचपीसीएलच्या www.hindustanpetroleum.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०१७.