राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिायझर्स लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम), मुंबई बॉयलर ऑपरेटरच्या ग्रेड- ३ (ए-५) १० पदांची भरती. (सामान्य- ७, अजा- १, इमाव- २)

पात्रता- एसएस्सी परीक्षा उत्तीर्ण आणि शासनाद्वारे जारी करण्यात आलेले द्वितीय श्रेणीचे बॉयलर अटेंडंट कार्यक्षमता प्रमाणपत्र असायला हवे. किंवा एनसीव्हीटी प्रमाणपत्र चालेल परंतु डिप्लोमा इन बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र संचालक आणि परीक्षा मंडळाचे अध्यक्ष यांनी ‘हे प्रमाणपत्र राज्यामध्ये द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंट कार्यक्षमता प्रमाणपत्राच्या समतूल्य वैध आहे.’ असे  लिहून दिलेले असायला हवे. २ वर्षांचा अनुभव. ज्या उमेदवारांनी दि. २५ आणि २६ मे २०१७ रोजी बॉयलर ऑपरेटर ग्रेड- ३ (ए-५) या पदासाठी प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केला असेल त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

वयोमर्यादा- दि. १ एप्रिल २०१७ रोजी १८ ते ३० वष्रे (अजा/अज- ३५ वष्रे, इमाव- ३३ वष्रेपर्यंत).

निवड पद्धती- १०० गुणांची लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्नस्वरूपात, सामान्यज्ञान, इंग्रजी, बुद्धिचातुर्य, व्यावहारिक ज्ञान व बॉयलर या विषयाचे ज्ञान यावर आधारित असेल.

अर्ज प्रक्रिया शुल्क रु. १००/-

www.rcfltd.com या संकेतस्थळावरील जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज ‘साहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संपदा), रूम नं. ०६, तळमजला, राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिायझर्स लिमिटेड, प्रशासकीय भवन, चेंबूर, मुंबई- ४०००७४’ या पत्त्यावर दि. १० नोव्हेंबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

यूपीएससी (जाहिरात क्र. २०/२०१७) नॅशनल टेस्ट हाऊस, डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, कन्झ्युमर अफेअर्स, फूड आणि पब्लिक मंत्रालयामध्ये पुढील पदांची भरती.

१) सायंटिफिक ऑफिसर (केमिकल) – ९ पदे (अजा- १, इमाव- २, यूआर- ६).

पात्रता- एमएस्सी (केमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजी) किंवा केमिकल इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजी पदवी.

अनुभव- अ‍ॅनालिटिकल किंवा केमिकल लॅबोरेटरीमधील १ वर्षांचा अनुभव किंवा ओअर्स, मिनरल्स, मेटल्स, ऑइल अ‍ॅण्ड फ्यूएल, ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक प्रोडक्ट्स, पेंट, पॉलिमर मटेरियल अ‍ॅनालिसिस किंवा रिसर्च आणि डेव्हलपमेंट कामातील १ वर्षांचा अनुभव.

२) सायंटिफिक ऑफिसर (नॉन-डिस्ट्रक्टिव्ह)- ४ पदे (इमाव- १, यूआर- ३)

पात्रता- एमएस्सी (फिजिक्स) किंवा बीई (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ मेटॅलर्जी)

अनुभव- नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेिस्टग लॅबोरेटरी किंवा एक्स-रे डिप्रॅक्शन किंवा इन्व्हेस्टिगेशन वर्क ऑन फेल्युअर इंजिनीअरिंग मटेरियल बाय नॉन-डिस्ट्रक्टिव्ह अ‍ॅण्ड मेटॅलोग्राफिक मेथड्स ऑफ टेिस्टगमधील १ वर्षांचा अनुभव. फी – रु. २५/- (अजा/ अज/ विकलांग/ महिला यांना फी माफ).

वेतन – रु. ६५,१४८/- (दोन्ही पदांसाठी).

ऑनलाइन अर्ज http://www. upsconline.nic.in/ या संकेतस्थळावर दि. १६ नोव्हेंबर २०१७ पर्यंत करावेत.