राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालनालयअधिनस्थ महाराष्ट्र नगर परिषद सेवाअंतर्गत गट मधील एकूण १८८९ पदांची भरती.

(१) नगर परिषद अभियांत्रिकी सेवा –

(i) स्थापत्य अभियांत्रिकी – ३६७ पदे (श्रेणी अ – १९, श्रेणी ब – १७२, श्रेणी क – १७६)

पात्रता – बीई/बीटेक (सिव्हिल/सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट/सिव्हिल अँड एनव्हायरॉनमेंट/ स्ट्रक्चरल/कन्स्ट्रक्शन इंजिनीअर)

(ii) विद्युत अभियांत्रिकी – ६३ पदे (श्रेणी अ – ७, श्रेणी ब – १४, श्रेणी क – ४२)

पात्रता – बीई/बीटेक्/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड पॉवर/इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर/पॉवर सिस्टीम/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स.

(iii) संगणक अभियांत्रिकी – ८१ पदे (श्रेणी अ – ८, श्रेणी ब – ७, श्रेणी क – ६६)

पात्रता – बीई/बीटेक् (कॉम्प्युटर/कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी)

(iv) पाणी पुरवठा व जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी – ८४ पदे (श्रेणी अ – ७, श्रेणी ब – २०, श्रेणी क – ५७)

पात्रता – बीई/बीटेक् (मेकॅनिकल/एनव्हायरॉनमेंट/ऑटोमोबाइल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग)

(२) नगर परिषद प्रशासकीय व लेखा सेवा –

(i) लेखा परीक्षण व लेखा सेवा – लेखापाल/लेखापरीक्षक – ५२८ पदे (श्रेणी अ – ३१, श्रेणी ब – ७५, श्रेणी क – ४२२)

पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी.

(ii) नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा – कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी – ७६६ पदे (श्रेणी अ – ८१, श्रेणी ब – ३१६, श्रेणी क – ३६९)

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

(उपरोक्त पदांपकी प्रत्येक सेवेतील श्रेणी ‘क’ संवर्गातील पदांपकी २५% पदे ही नगर परिषद कर्मचाऱ्यांमधून (अभियांत्रिकी सेवेअंतर्गत पदांसाठी पदविकाधारक पात्र आहेत.) भरावयाची आहेत. नगर परिषद अभियांत्रिकी सेवेअंतर्गत श्रेणी ‘क’ च्या पदांसाठी नगर परिषद किंवा नगर पंचायतीतील कोणत्याही पदावर नियमित नेमणुकीने पदवीधारकाबाबत किमान ३ वर्षे व पदविकाधारकाबाबत किमान ५ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

प्रशासकीय व लेखासेवाअंतर्गत पदांसाठी इतर

अर्हता – एमएससीआयटी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी २१ ते ३८ वर्षेपर्यंत (मागासवर्गीय – ४३ वर्षेपर्यंत, दिव्यांग – ४५ वर्षेपर्यंत, नगर परिषद कर्मचारी

(फक्त श्रेणी ‘क’ अंतर्गत) – ४५ वर्षेपर्यंत)

निवड पद्धती – कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाइन टेस्ट – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न.

(i) पूर्वपरीक्षा – १०० प्रश्न /१०० गुण कालावधी १ तास ३० मिनिटे.

(ii) मुख्य परीक्षा – १५० प्रश्न/१५० गुण, कालावधी – दोन तास.

परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम  http://www.mahapariksha.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परीक्षा शुल्क – रु. ६००/- (मागासवर्ग – रु. ३००/-)

पूर्वपरीक्षेसाठी अर्ज वरील संकेतस्थळावर दि. २७ एप्रिल २०१८ (रात्री ११.५९ वाजे) पर्यंत करावेत. (हेल्प डेस्क दूरध्वनी क्र. १८००-३०००-७७६६ सोमवार ते शनिवारी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत).

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (जाहिरात क्र. सीओ/पी-आर/०३/२०१८) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज् (एनटीपीसी) पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ११३

(१) स्टेशन मास्टर – ५५ पदे (अजा – ४, अज – ४, इमाव – १५, खुला – २८)

(२) गुडस् गार्ड – ३७ पदे (अजा – ६, अज – ३, इमाव – १०, खुला – १८)

(३) सिनियर क्लर्क – १० पदे (अजा – ३, अज – २, खुला – १८)

(४) अकाउंट्स असिस्टंट – ११ पदे

(अज – १, इमाव – १, खुला – ९).

पात्रता – पद क्र. १ ते ३ साठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. पद क्र. ४ साठी बी.कॉम.

(पद क्र. ३ सिनियर क्लर्कसाठी बीबीए/एचआर किंवा एमबीए/एचआर पदवीधारकांस प्राधान्य दिले जाईल.)

वयोमर्यादा – दि. १ जुल २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे

(इमाव – ३६ वर्षे, अजा/अज – ३८  वर्षेपर्यंत).

निवड पद्धती – संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) १०० प्रश्न कालावधी ९० मिनिटे.

(१) कॉमन जनरल अवेअरनेस

(i) गणित, (ii) सामान्य बुद्धिमत्ता, (iii) सामान्य विज्ञान (एकूण ७०% प्रश्न)

(२) इंग्लिश (२०% प्रश्न)

(३) बेसिक कॉम्प्युटर नॉलेज (१०% प्रश्न)

प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/३ गुण वजा केले जातील.

परीक्षा शुल्क – रु. ५००/- (अजा/अज/माजी सनिक/महिला/अल्पसंख्याक/ईबीसी यांना

रु. २५०/- सीबीटीला बसणाऱ्या उमेदवारांना

रु. २५०/- (मधून बँकिंग चार्जेस वजा करता) परत केले जातील.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि अर्ज www.konkanrailway.com  या संकेतस्थळावर दि. १२ मे २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com