मुंबई उच्च न्यायालय आपली दुय्यम न्यायालये आणि राज्यभरातील जिल्हा न्यायालयात लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमालच्या एकूण ८,९२१ पदांची भरती.

१) लघुलेखक (नि.श्रे.) – १०१३ पदे. पात्रता – दि. १८ मार्च, २०१८ रोजी

(अ) दहावी उत्तीर्ण (पदवीधारकांस प्राधान्य दिले जाईल.)

(ब) १०० श.प्र.मि. इंग्रजी लघुलेखन आणि ४० श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन तसेच ८० श.प्र.मि. मराठी लघुलेखन आणि ३० श.प्र.मि. मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण.

(क) संगणकाचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र.

२) कनिष्ठ लिपिक – ४, ७३८ पदे.

पात्रता –

(अ) दहावी उत्तीर्ण,

(ब) ४० श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन आणि ३० श.प्र.मि. मराठी टंकलेखन शासकीय वाणिज्यिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,

(क) संगणकाचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र.

३) शिपाई/हमाल – ३,१७० पदे.

पात्रता – (अ) किमान सातवी उत्तीर्ण आणि चांगली शरीरयष्टी असावी. (सर्व पदांसाठी उमेदवारांना २८ मार्च, २००६ नंतर जन्मास आलेली दोनपेक्षा जास्त हयात मुले नसावी. अर्जासोबत तसा दाखला देणे आवश्यक.) वयोमर्यादा – दि. २८ मार्च, २०१८ रोजी १८ ते ३८ वष्रेपर्यंत (अजा/ अज/इमाव/विमाप्र – ४३ वष्रेपर्यंत, विकलांग – ४५ वष्रेपर्यंत)

निवड पद्धती – उमेदवारांची उच्च शैक्षणिक अर्हता आणि शैक्षणिक श्रेष्ठत्व यावर आधारित अल्प सूची (शॉर्ट लिस्ट) तयार केली जाईल. ज्यांची चाळणी परीक्षा, चाचणी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाईल.

(१) लघुलेखक पदांकरिता चाळणी परीक्षा घेण्यात येणार नाही. प्रत्येकी २० गुणांची इंग्रजी/मराठी लघुलेखनाची आणि टंकलेखनाची संगणकावर चाचणी परीक्षा द्यावी लागेल. तसेच २० गुणांची मुलाखत द्यावी लागेल.

(२) कनिष्ठ लिपिक (ज्युनियर क्लर्क) (अ) पदांसाठी चाळणी परीक्षा (सामान्यज्ञान चाचणी) ४० गुणांची (बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे २० प्रश्न.) ज्यात इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, चालू घडामोडी आणि संगणकीय ज्ञानावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. (ब) २० गुणांच्या मराठी टंकलेखन परीक्षेत उमेदवाराला संगणकावर १० मिनिटांत ३०० शब्द टंकलिखित करावे लागतील.

(क) २० गुणांच्या इंग्रजी टंकलेखन परीक्षेत उमेदवाराला १० मिनिटांत ४०० शब्द टंकलिखित करावे लागतील. (५ चुकांसाठी १ गुण कापण्यात येईल.) (क) मुलाखत २० गुणांसाठी.

(३) शिपाई/हमाल पदांसाठी (अ) चाळणी परीक्षा ३० गुणांची, १५ बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांची सामान्यज्ञान चाचणी (इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य आणि चालू घडामोडी). (ब) क्रियाशीलता व स्वच्छता चाचणीमध्ये उमेदवारांच्या हालचालीतील चपळाई व तत्परता तपासली जाईल.

(क) मुलाखत १० गुणांसाठी घेतली जाईल. (उमेदवारांनी मुलाखतीस येताना मूळ प्रमाणपत्रे साक्षांकित प्रतींसह तपासणीस आणावीत.)

शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई व लघुवाद न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवर फक्त हमाल हे पद आहे, तर इतर सर्व आस्थापनांवर शिपाई हे पद आहे.

शिपाई/हमाल पदासाठी उच्च अर्हता प्राप्त उमेदवारांनी सातवीचे गुणपत्रक नसल्यास ऑनलाइन अर्ज भरताना इ. सातवीकरिता काल्पनिकरीत्या ५०% गुणांची नोंद करावी. उमेदवाराने पद आणि जिल्ह्य़ाकरिता नमूद केलेला प्राधान्यक्रम बंधनकारक असेल.

ऑनलाइन अर्ज  https://bhc.gov.in/bhcrecruitment/ या संकेतस्थळावर दि. १० एप्रिल, २०१८ पर्यंत करावेत. या भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही.

संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) इंडियन इकॉनॉमिक सíव्हस अँड स्टॅटिस्टिकल सíव्हस एक्झामिनेशन, २०१८दि. २९ जून, २०१८ पासून घेणार आहे.

(१) इंडियन इकॉनॉमिक सíव्हस – १४ पदे.

पात्रता – इकॉनॉमिक्स/ अप्लाईड इकॉनॉमिक्स/बिझनेस इकॉनॉमिक्स/इकॉनॉमिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.

(२) इंडियन स्टॅटिस्टिकल सíव्हस – ३२ पदे.

पात्रता – स्टॅटिस्टिक्स/मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स/अ‍ॅप्लाईड स्टॅटिस्टिक्स यापकी एक विषयासह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट, २०१८ रोजी २१ ते ३० वष्रे (इमाव – ३३ वष्रे, अजा/अज – ३५ वष्रे, विकलांग – ४०/४३/४५ वष्रेपर्यंत)

परीक्षा शुल्क – रु. २००/-. (अजा/अज/महिला/विकलांग यांना फी माफ आहे.)

निवड पद्धती – लेखी परीक्षा – पेपर – १ जनरल इंग्लिश, पेपर – २ जनरल स्टडिज प्रत्येकी १०० गुण. पेपर – ३ ते ५ संबंधित विषयावर आधारित ४ पेपर प्रत्येकी २०० गुणांसाठी. सर्व पेपर्सना प्रत्येकी

३ तास कालावधी (स्टॅटिस्टिक्स- क  आणि स्टॅटिस्टिक्स-कक  पेपर जे ऑब्जेक्टिव्ह टाइप असतील. प्रत्येकी २ तास अवधी) बाकी सर्व पेपर्स वर्णनात्मक असतील. प्रत्येकी एकूण १,००० गुणांची लेखी परीक्षा आणि मुलाखत २०० गुणांची असेल. ऑनलाइन अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. १६ एप्रिल, २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com