तंत्र शिक्षणाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे व प्रसारामुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय सुविधेसाठी व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी व्यवसाय शिक्षण मंडळाची निर्मिती करण्यात आली.

उद्दिष्ट- वाढते औद्योगिकीकरण, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक आणि आर्थिक बदल यांचा विचार करता रोजगार व स्वयंरोजगार यांना चालना मिळण्याच्या दृष्टीने कुशल/अर्धकुशल स्वरूपाची व्यवसाय शिक्षणाची गरज निर्माण होत आहे. तंत्र व व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळातर्फे अल्प मुदतीचे दैनंदिन जीवनावश्यक अशा विषयाचे प्रशिक्षण देऊन स्वबळावर रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Fee waiver students
दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या किती विद्यार्थ्यांना शुल्कमाफी?
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

कार्यपद्धती – उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या नियंत्रणाखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील या मंडळाचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय असून सहा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालये व प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालयामार्फत मंडळाचे कामकाज चालते.

परीक्षा मंडळाचे कार्य

  • मंडळाकडे सोपविलेल्या निरनिराळ्या प्रमाणपत्र परीक्षा व व्यवसाय परीक्षा यासाठी अभ्यासक्रम ठरविणे व त्यानुसार परीक्षा घेणे.
  • परीक्षा घेण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करणे.
  • परीक्षेचे निकाल जाहीर करून अंतिम परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करणे.
  • मंडळाने ठरविलेले अभ्यासक्रम शिकविण्यासाठी इच्छुक संस्थांना मान्यता देणे.
  • विविध व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी पाठय़पुस्तके/संदर्भ पुस्तके/दृक्श्राव्य साधने ठरविणे, साधने व उपकरणे यांची यादी तयार करणे, अभ्यासक्रम शिकविण्यासाठी नेमावयाच्या शिक्षकांची किमान शैक्षणिक अर्हता, कार्यभार व अनुभव ठरविणे.
  • विविध व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे आवश्यकतेनुसार पाठय़क्रम तयार करणे, त्यात सुधारणा करणे आणि उपरोक्त प्रकरणी आवश्यक त्या शिफारशी करण्यासाठी अभ्यास मंडळे व आवश्यकतेनुसार उपसमित्या नेमून योग्य ती कार्यवाही करणे.