बेचिराख

‘सिलिंडरच्या स्फोटाच्या आगीमध्ये संपूर्ण वस्ती जळून बेचिराख झाली’, ‘भीषण वणव्यामधे जंगल बेचिराख झाले’. बेचिराख शब्द अशा अर्थी वापरला जातो की, सर्वाना वाटते, बेचिराख म्हणजे त्या वस्तूची, ठिकाणाची जळून राखरांगोळी होणे. अगदी एखादा वाडा जळला तरी आपण म्हणतो की तो जळून बेचिराख झाला, पण तसे नाही. मूळ अर्थ काही वेगळाच आहे. खरेतर मूळ शब्दही वेगळा आहे.  मूळ शब्द आहे ‘बेचिराग’. हा फारसी शब्द आहे. चिराग म्हणजे दिवा. बेचिराग या  शब्दाचा अर्थ आहे दीपहीन, ओसाड, उद्ध्वस्त, वस्तीरहित, उजाड. एखाद्या आपत्तीमुळे, संकटामुळे गावाचा असा काही विध्वंस झालेला असतो की, तिथे दिवा लावायलाही कोणी उरलेले नसते. त्या अर्थाने ते गाव बेचिराग झाले, असे म्हटले जाते. कालांतराने या शब्दातील ‘ग’ जाऊन तेथे ‘ख’ आला आणि बेचिराख शब्द रूढ झाला. तोही सरसकटपणे जळून राखरांगोळी होणे यापुरताच अर्थ गृहीत धरून भाषेत वापरला जाऊ  लागला.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Civil Law in Constitution is equal or same
नागरी कायदा… समान की एकच?
Loksatta kutuhal Development and importance of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचा विकास आणि महत्त्व
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

कर्णधार

कर्णधार म्हणजे नेता. चमूचा जो मुख्य असतो त्याला कर्णधार म्हणून संबोधतात.  शब्दश: अर्थ बघितला तर ‘कर्ण’ म्हणजे कान आणि ‘धार’ म्हणजे धारण करणारा. यानुसार अर्थ लावायचा झाला तर चमूचा नायक आपल्या संघ सहकाऱ्यांचे कान धरून थोडीच त्यांना खेळायला अथवा कामाला लावणार आहे? कर्णधार शब्दाचा इतका सीमित अर्थ नक्कीच नाही. ‘कर्ण’ या शब्दाचा अजून एक अर्थ आहे सुकाणू धरणारा. म्हणजेच नावेचा मुख्य नायक. जो संपूर्ण नावेचे नेतृत्व करतो. त्यावरून त्याला कर्णधार म्हटले जाते. इंग्रजीतदेखील जहाजावरच्या मुख्य नायकाला कॅप्टन म्हणतात ते याच अर्थामुळे. त्यामुळेच संघाचा सुकाणू जो मजबूतपणे सांभाळतो तो कर्णधार. मग कोणत्याही चमूच्या, समूहाच्या मुख्य व्यक्तीला कर्णधार म्हणणे उचितच म्हणायला हवे.