23 January 2018

News Flash

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम

राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण जनतेसाठी मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.

लोकसत्ता टीम | Updated: October 5, 2017 2:54 AM

मानसिक आजाराच्या समस्यांचे गांभीर्य आणि व्याप्ती विचारात घेता केंद्र शासनाने राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला आहे. सदर कार्यक्रम अंमलबजावणी महाराष्ट्रातसुद्धा चालू आहे, जेणेकरून सामान्य माणूस व ग्रामीण जनता यांना त्याचा लाभ व्हावा. सदर कार्यक्रमासाठी राज्याच्या आरोग्य संचालनालयात विशेष मानसिक आरोग्यकक्ष स्थापन करण्यात आला आहे.

उद्दिष्टे

  • राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण जनतेसाठी मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.
  • आरोग्य सेवेतील उचित अधिकाऱ्यांना कार्यक्षम अंमलबजावणीसाठी विविध कार्य आणि जबाबदाऱ्या निश्चित करणे.
  • मानसिक आरोग्य सेवा या सामान्यत: आरोग्य सेवा सुविधांचा अविभाज्य भाग मानून सदर कार्यक्रम पूर्तता करणे.
  • विविध सामाजिक विकास कार्यक्रमामध्ये मानसिक आरोग्य, जागरूकता व सोयी सुविधा यांची माहिती देणे.
  • मानसिक आरोग्य सेवा विकास व अंमलबजावणी यामध्ये जनतेला समाविष्ट करून घेणे.

ठळक वैशिष्टय़े

  • रुग्णालयात मानसिक रुग्ण भरती करताना मानसिक आरोग्य कायदा १९८७ ची अंमलबजावणी.
  • तपासणी, मनोविकारतज्ज्ञ परिचारिका यांच्याकडून मानसिक विकारांची नोंद, वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत शारीरिक तपासणी व शेवटी मानसोपचारतज्ज्ञाकडून संपूर्ण तपासणी व नंतर उपचार.
  • खाजगी मानसिक रुग्णालयाचे पंजीकरण
  • मानसिक आरोग्य कायद्यानुसार खाजगी मानसिक रुग्णालयांना पंजीकृत करणे बंधनकारक असून त्यांना परवाना पत्र दिले जाते. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम.

अधिक माहितीसाठी: https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/DiseaseContent.|aspx?CategoryDetailsID=zmNlJf19cVA=

First Published on October 5, 2017 2:54 am

Web Title: national mental health program mental health issue
  1. No Comments.