शिष्यवृत्तीचे लाभ

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
  • या योजनेंतर्गत मान्यताप्राप्त संस्थांकडील पदवी आणि पदव्युत्तर पातळीच्या व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासासाठी अडीच हजार अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत.
  • यामध्ये मुलींसाठी ३० टक्के शिष्यवृत्ती राखीव राहणार आहे. महिला उमेदवार उपलब्ध नसतील तर पुरुष उमेदवारांचा विचार करण्यात येतो.
  • ही शिष्यवृत्ती त्रमासिक पद्धतीवर देण्यात येणार आहे. यासाठी अगोदर अर्ज करावा लागेल.
  • उमेदवारांनी (nhfdc.nic.in) या संकेतस्थळावरून आगाऊ ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • शिष्यवृत्तीमध्ये शासकीय आणि संलग्न संस्थांच्या अभ्यासक्रम शुल्काच्या मर्यादेत ना-परतावा शुल्काचा परतावा देण्यात येईल.
  • देखभालभत्ता म्हणून एका शैक्षणिक वर्षांसाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी २५०० रुपये आणि पदव्युत्तरसाठी तीन हजार रुपये १० महिन्यांसाठी देण्यात येतात.
  • शिवाय पुस्तके/स्टेशनरी भत्ता म्हणून व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी सहा हजार तर पदव्युत्तरसाठी १० हजार रुपये एक वर्षांकरिता देण्यात येतात.
  • विद्यार्थ्यांना आयुष्यात एकदा औषधे व इतर साधनसुविधेसाठी अर्थसहाय्य करण्यात येते.
  • कोणत्याही माध्यमातून लाभार्थ्यांच्या पालक/नातेवाईक यांचे मासिक २५ हजार व वार्षिक तीन लाख उत्पन्न असू नये.
  • शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यर्थ्यांना अभ्यासक्रमासाठी अन्य कोणतीही शिष्यवृत्ती/भत्ता मिळणार नाही.

अर्ज कसा कराल?

  • शिष्यवृत्तीसाठी (nhfdc.nic.in) यावर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
  • ऑनलाइन भरलेल्या अर्जाची छापील प्रत संस्था प्रमुखाच्या शिफारशीसह राष्ट्रीय अपंग आर्थिक व विकास महामंडळ (एनएचएफडीसी), ३ रा मजला, पीएचडी हाऊस, ४/२, सिरी इन्स्टिटय़ुशनल क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली-११००१६ येथे पाठवावी.
  • उमेदवाराच्या अर्जाच्या हार्ड कॉपीशिवाय सॉफ्ट कॉपीचा विचार केला जाणार नाही.