27 September 2020

News Flash

अन्नसंकर – तोंडली

तोंडली या खास भारतीय भाजीत भरपूर प्रमाणात कबरेदके, प्रथिने, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे आहेत.

| June 20, 2015 12:09 pm

तोंडली या खास भारतीय भाजीत भरपूर प्रमाणात कबरेदके, प्रथिने, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे आहेत. इतर काही भाज्यांच्या तुलनेत तोंडल्यात पोटॅशियम, फॉस्फरस, आयर्न, झिंक आणि सेलेनियम जास्त आहेत, तोंडल्याच्या सेवनाने रक्तशुद्धी होते, पचन सुधारते, लिव्हरचे कार्य व्यवस्थित चालते. मूत्रमार्गाच्या संसर्गावर प्रभावी प्रतिजैविक म्हणून तोंडल्याचा अर्क वापरला जातो. मात्र पिकलेली तोंडली खाऊ  नयेत. तोंडलीभात, भरली तोंडली आदी या भाजीचे प्रकार प्रसिद्ध आहेत.
तोंडल्याचे रायते
साहित्य – पाव किलो कोवळी तोंडली, एक वाटी सायीचे दही, एक हिरवी आणि एक लाल सुकी मिरची, एक मोठा चमचा काजूचे तुकडे, १/२ चमचा लाल मोहरीची पावडर, अर्धी वाटी ओले खोबरे, चवीला मीठ, साखर, फोडणीसाठी १ मोठा चमचा तेल, मोहरी, हिंग, ७-८ कढीलिंबाची पाने.
कृती – तोंडली वाफवून घ्यावीत आणि बारीक चिरावी. खोबरे, मोहरीची पावडर, हिरवी मिरची आणि एक मोठा चमचा दही घालून बारीक वाटून घ्यावे. तेलाची फोडणी करून त्यात कढीलिंब, लाल मिरची घालावी. तोंडली, दही, वाटलेले खोबरे, फोडणी एकत्र करावे आणि त्यात फोडणी घालून कालवावे.
वसुंधरा पर्वते – vgparvate@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2015 12:09 pm

Web Title: baby watermelon little gourd coccinia grandis
Next Stories
1 दोडका (शिराळे)
2 कोनफळ
3 अ‍ॅव्होकॅडो
Just Now!
X