* दाढ दुखत असल्यास घरचे, साजूक तूप कापसावर लाऊन तो बोळा दाढेत ठेवावा. दाढ दुखायची थांबते.* डोळे आले असल्यास कापराची पुरचुंडी डोळ्याभोवती सतत फिरवावी. डोळ्यांचा दाह कमी होतो.* केस शांपूने धुतल्यावर ओल्या नारळाच्या दुधाने केस धुवावेत. त्याने केस मऊ राहतात व केसात कधीही कोंडा होत नाही.* पायाच्या बोटात चिखल्या झाल्यास आंघोळ करताना गरम पाण्याची धार (जेवढे सोसले तेवढे) त्यावर सोडावी. त्याने कीड मरते व चिखल्या कमी होतात. * पायात काटा गेल्यास त्यावर खोबरेल तेलाचा थेंब लावावा. काटा बाहेर येतो.* रोज कडुलिंबाची १०-१५ कोवळी पाने खाल्यास टॉन्सिल्स वाढत नाही.* डोळे चिकटत असल्यास ताकाच्या वर जे पाणी येते त्या पाण्याची घडी डोळय़ावर ठेवावी. उष्णता कमी होते.* तोंड आले असता खायच्या डिंकाचा खडा तोंडात चघळावा म्हणजे ते उतरते.सुनंदा घोलप -sunandaagholap@gmail.com