ch09गेल्या १५-२० वर्षांत सुबोध व काव्यमूल्य असलेल्या गज़्‍ाला पेश करणाऱ्या गज़्‍ालकारांत मुनव्वर राना हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मुनव्वरला ‘इमोशनल ब्लॅकमेिलग’चा शायर संबोधलं जातं.

उ र्दू मुशायऱ्याची परंपरा वलीदकनी (इ.स.१६६७ -१७०७) या शायराआधीची मानली जाते. मुशायऱ्यांत वाचली जाणारी गज़्‍ाल बहुधा विरोधाभास, शब्द चमत्कृतीवर आधारित, दादलेवा शैलीची असते. त्यात वाङ्मयीन मूल्य असलेली गज़्‍ाल सहसा वाखाणली जात नाही. त्वरित संप्रेषण होणं हे मुशायऱ्यांत श्रोत्यांना अपेक्षित असतं. याचमुळे गालिब, फैज, शहरयार यांच्यापेक्षा त्या त्या काळात जौक, जोश, फराजसारखे सुबोध शायर मुशायरे गाजवून गेले. पण गेल्या १५-२० वर्षांत सुबोध व काव्यमूल्य असलेल्या गज़्‍ाला पेश करणाऱ्या गज़्‍ालकारांत मुनव्वर राना हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
मुनव्वरला ‘इमोशनल ब्लॅकमेिलग’चा शायर संबोधलं जातं. त्याचे शेर वारंवार उद्धृतही केले जातात. त्याची शैली बघा, नातवात, मुलाला शोधणाऱ्या आजीच्या संदर्भात तो म्हणतो,
उछलते खेलते बचपन में बेटा ढूँढती होगी,
तभी तो देखकर पोते को दादी मुस्कुराती है

तभी जाकर माँबाप को कुछ चन पडम्ता है
कि जब ससुराल से घर आके बेटी मुस्कराती है
मांडव परतणीनंतर माहेरी आलेल्या मुलीच्या डोळय़ात आईवडिलांना मुलीचं सुखाचं हास्य पाहायचं असतं.
मुनव्वरचे शेर राजकारण, सत्ता, सांप्रदायिकता, जगत जीवन, पारतंत्र्य, सांस्कृतिक एकात्मता, साहित्य असे सर्वस्पर्शी आहेत, परंतु त्यांच्या गज़्‍ालांचा केंद्रिबदू प्रेम हाच आहे; अन् त्यातही आईचं प्रेम हे जास्त साकारताना दिसतं. माँ नावाचा एक शेरसंग्रहच त्याच्या नावावर आहे.
जब भी कश्ती मेरी सलाब में आ जाती है
माँ दुआ करती हुई ख़्वाब में आ जाती है
किंवा
यह ऐसा कर्ज है जो मं अदा कर ही नहीं सकता
मं जब तक घर न लौटू मेरी माँ सज्दे में रहती है
मुनव्वर राना १९५२ साली रायबरेलीतील एका जुन्या मोहल्यात जन्मले. त्यांचे पूर्वज तेथील औरंगजेबाने बांधलेल्या आलमगिरी मशीदचे इमाम होते. मुनव्वर राणा सांप्रदायिक एकात्मतेचा पुरस्कर्ता आहे. दोन देश व धर्मातील वैमनस्याच्या पाश्र्वभूमीवरील हे शेर पाहा,
खुले रखते है दरवाजे दिलों के रात दिन दोनों
मगर सरहद पे पहरेदारियाँ दोनों तरफ़ से है
धार्मिक नव्हे तर धर्माधाबद्दल जेव्हा ते सत्ताधीश होतात, तेव्हा शायर म्हणतो मतदारांनो-
फिरका परस्त लोग हुकूमत में आ गये
बिल्ली के मुँह में आपने चिडिम्या को दे दिया
धार्मिक विद्वेषातून उद्भवलेल्या दंगे व जाळपोळीच्या संदर्भात मुनव्वर व्यथित आहेत, परंतु
ये सच है नफ़रतों की आग ने सबकुछ जला डाला,
मगर उम्मीद की ठंडी हवायें रोज आती है
हा आश्वासक आशावाद त्यांच्या कविमनात नेहमी तेवत असतो. ते लहान मुलांना घडविताना पालकांना विनंती करतात-
इन्हे फिरका परस्ती मत सिखा देना कि ये बच्चे
ज़्‍ामीं से चूसकर तितली के टूटे पर उठाते है
अशा अबोध, निरागसांना सांप्रदायिकता शिकवू नका हे मुनव्वर राणा यांचं सांगणं साऱ्याच धर्मीयांसाठी आहे. मात्र राजकारणी वर्गाचे काय? राजकारण अन् साहित्य यांची मत्री मुनव्वरना विजोड वाटते. –
सियासत से अदब की दोस्ती बेमेल लगती है,
कभी देखा है पत्थर पे भी कोई बेल लगती है?
म्हणून हा शायर म्हणतो- कविता निदान बदनाम तर होऊ देत नाही.
शायरी कुछ भी हो रुसवा नहीं होने देती,
मं सियासत में चला जाऊँ तो नंगा हो जाऊँ
राजकारणावर कटु व्यंग करताना मुनव्वर उपहासाने म्हणतात,
बडम गहरा ताल्लुक़ है, सियासत से तबाही का,
कोई भी शहर जलता है तो दिल्ली मुस्कुराती है
विध्वंस अन् राजकारण एकमेकांशी संलग्न आहेत. त्यांचा एक भाबडा प्रश्न लक्षणीय आहे.
शरीफ़ इन्सान आख़िर क्यों इलेक्शन हार जाता है?
किताबों में तो ये लिक्खा था रावण हार जाता है
मुनव्वरचे राष्ट्रप्रेम वादातीत आहे ते प्रार्थना करतात-
वतन से दूर या रब वहां पे दम निकले
जहाँ से मुल्क की सरहद दिखाई देने लगे
एवढंच नव्हे तर-
चलो चलते है मिल-जुलकर वतन पर जान देते है
बहुत आसान है कमरे में वन्दे मातरम् कहना
या देशाच्या मातीचे गुणगान करताना ते म्हणतात-
फिर उसको मर के भी ख़ुद से जुदा होने नहीं देती,
ये मिट्टी जब किसी को अपना बेटा मान लेती है
मुनव्वर रानांचा रायबरेलीतील मोहल्ला एक संमिश्र संस्कृतीचं प्रतीक होता. ते म्हणतात, दोन-तीन वष्रे आजारी असलेले माझे वडील वारले तेव्हा लग्नसराईचा मोसम होता. माझ्या शेजारील बिगरमुस्लीम घरात लग्नाची धामधूम होती. मुलीचे लग्न होते, पण त्या घरच्यांनी मुलाकडील मंडळींना कळविले, ‘‘आमच्या दारात हे कार्य संपन्न होणे शक्य नाही, कारण आमच्या मोहल्ल्यातील अनवर चाचा वारलेत अन् त्यांची गणना आमच्या कुटुंबात होते.’’ मुलांकडील एकाने विचारले, ‘‘एक मुसलमान माणसाचा तुमच्या कुटुंबात अंतर्भाव कसा होईल?’’ त्यावर मुलीकडील लोक म्हणाले, ‘‘आमच्या घरातील साऱ्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्याच घरात झालेय. आम्ही िहदू असलो तर काय झालं? ‘र ’ रामातला त्यांनीच आम्हाला शिकवलाय.’’
तीन दिवसांनी मोहल्ल्यात वरात आली तेव्हा मुलाकडील मंडळी मुनव्वर यांच्या घरी भेटावयास आली. नवऱ्या मुलाने त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. गरीब व मध्यमवर्गीय त्या मोहल्ल्यातील विशाल हृदयाच्या लोकांबद्दल ते म्हणतात-
उन घरों में जहाँ मिट्टी के घडम्े रहते है,
क़द में छोटे ही मगर लोग बडम्े रहते है
जीवनाच्या विविध रूपरंगांचं चित्रण या गज़्‍ालात आलंय. जीवनानुभव कालपरत्वे भिन्न असतो अन् व्यक्तिसापेक्षही असतो, त्यामुळे शायर कधी म्हणतो,
ये सच है हम भी कल तक जिन्दगी पर नाज करते थे,
मगर अब जिन्दगी पटरी से उतरी रेल लगती है

जिन्दगी तू कब तलक दरबदर फिरायेगी हमें,
टूटा-फूटा ही सही घर-बार होना चाहिये

तुझे ऐ जिन्दगी अब कैदखाने में गुज़्‍ारना है,
तुझे मं इस लिए दुख दर्द का आदी बनाता हूँ
तर कधी म्हणतो-
शुक्रिया तेरा अदा करता हूँ जाते-जाते
ज़िन्दगी तुने बहुत रोज़्‍ा बचाया मुझको
अन् त्याच जीवनाचे आभार मानताना, जीवनाबद्दल त्याला हेवादेखील वाटतो.
हमें ऐ ज़िन्दगी तुझ पर हमेशा रश्क आता है,
मसायल में घिरी रहती है फिर भी मुस्कुराती है
जीवन समस्यांनी व्यापलेलं असूनही हसतमुख असतं. आता जीवनाचे ते हास्य सहर्ष आहे की उपहासात्मक आहे हे आपआपल्या अनुभूतीचा विषय आहे.
प्रेम हा उर्दूच नव्हे तर समग्र गज़्‍ालेचा मूलभूत पाया आहे. प्रेमाच्या संदर्भात अनुभवी, यशस्वी ज्येष्ठांचा सल्ला घेण्याची थोडी बहुत प्रथा आहे. मुनव्वर म्हणतात-
इश्क में राय बुजुर्गो की नहीं ली जाती
आग बुझते हुए चुल्हों से नहीं ली जाती
प्रिया व प्रियकर संवादालाच गज़्‍ाल म्हटलं जात असे त्या आदिम संदर्भातील आधुनिक शेर मुलाहिजा हो-
न रोक ले हमें रोता हुआ कोई चेहरा,
चले तो मुडम् के गली की तरफ़ नहीं देखा
किंचित हजल म्हणजे विडंबन काव्याच्या अंगाने शेर लिहिणारे मुनव्वर तितक्याच ताकदीने तरल शेरही लिहितात-
नक़ाब उलटे हुए जब भी चमन से वह गुज़्‍ारता है,
समझकर फूल उसके लब पे तितली बठ जाती है

गम से लक्ष्मण की तरह भाई का रिश्ता है मेरा,
मुझ को जंगल में अकेला नहीं रहने देता
मुनव्वर यांचे विचार अनेक विषयांवर मार्मिक टिप्पणी करतात. ते म्हणतात, मी अनवधानाने एकदा कुठे तरी सत्य बोलतो, अन् लाख प्रयत्न केले पण अद्याप तोंडातला कडवटपणा जात नाही. तसेच उच्चपदस्थ होण्याच्या संदर्भात त्यांचा शेर पाहा-
बुलंदी देर तक किस शख्स के हिस्से में रहती है
बहुत ऊंची इमारत हर घडी ख़तरे में रहती है
अन् त्याचमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर ते जाऊ इच्छित नाहीत.
मं शोहरत की बुलंदी पे जा नहीं सकता
जहाँ उरूज पे पहुंचो ज़्‍ावाल होता है
कारण शिखरावरून पतन निश्चित आहे. अनुभवाधिष्ठित हे निष्कर्ष कुणाला पटतील न पटतील, पण विचार करण्यास प्रवृत्त अवश्य करतात. आता गुलामी अन् स्वातंत्र्याबाबतचा हा परखड शेर ऐका-
गुलामीने अभी तक मुल्क का पीछा नहीं छोडा
हमें फिर क़ैद होना है, ये आजादी बताती है
अन् आता देशाच्या विद्यमान परिस्थितीचा साकल्याने विचार करून या वक्तव्यात काही तथ्थ आहे का ते बघा-
मुले अन् घराबाबत त्यांची धारणा किती संवेदनशील आहे-
अगर स्कूल में बच्चे हो, घर अच्छा नहीं लगता
परिन्दो के न होने से शजर अच्छा नहीं लगता
त्यांचे खुदाकडे मागणेही तसेच मोहक आहे.
कम-से-कम बच्चों के होठों की हँसी की ख़ातिर
ऐसी मिट्टी में मिलाना कि खिलौना हो जाऊँ
मुनव्वर राना यांचा पहिला गज़्‍ाल संग्रह
‘गज़्‍ालगाँव’ देवनागरीत प्रकाशित झाला तेव्हा उर्दू भाषिकांनी नापसंती व्यक्त केली. नंतर ‘मोर पांव’, ‘पीपल की छांव’, ‘माँ’, ‘सब उसके लिए’, बदन सराय’, ‘घर अकेला हो गया’ हे संग्रह िहदीत आले; तर उर्दूत ‘कहो जितने इलाही से’, ‘गर नक्शे का मकान, ‘नीम के फूल’, ‘घर अकेला हो गया’ हे संग्रह आले आहेत. ते म्हणतात,
गज़्‍ाल हम तेरे आशिक है, मगर इस पेट की खातिर
कलम किस पर उठाना था कलम किस पर उठाते है
गज़्‍ाल तो फूल से बच्चों की मीठी मुस्कुराहट है, असं म्हणताना कवीची स्थिती व्यंगात्मक शब्दात सांगतात,
अजब दुनिया है नाशायर यहाँ पर सर उठाते है,
जो शायर है वो महफिल में दरी चादर उठाते हैं
मुनव्वर राना, निदा फाजली, बशीर बद्र, इब्ने इंशा, मुहम्मद अलवी या उर्दू शायरांच्या बहुतांश रचना िहदी भाषेशी साम्य साधणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे त्या संप्रेषित होतात, चपखल भाष्य करतात. मुशायरे गाजविण्याची कला म्हणजे पेशकश यांना साधली आहे. मुशायऱ्याचे शेर व संग्रहात अंतर्भूत करण्याचे शेर ते वेगळे ठेवतात. हे कसब फार थोडय़ा मराठी गज़्‍ालकारांना अवगत आहे. वाचक/श्रोते यांच्या अंतरंगाचा ठाव घेणारे शेर लिहिणारे मुनव्वर राना जेव्हा बजावतात,
गज़्‍ाल में आपबीती को मं जगबीती बनाता हूँ
तेव्हा अविश्वासाचा प्रश्न उद्भवत नाही.

शब्दांचे अर्थ -फिरका परस्त – सांप्रदायिक प्रवृत्ती, बेमेल -बेजोड, जवाल – पतन, मसाईल -समस्या
डॉ. राम पंडित