पूर्वीच्या काळी भारतीय लोक चुलीतून तयार होणाऱ्या राखेने दात घासत असत. नंतर काही कंपन्यांचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश झाला आणि राखेने, कोळशाने दात घासणे दातांच्या आरोग्याला किती घातक आहे असे ते पटवून देऊ लागले. त्यांनी कॅल्शियम असणाऱ्या पावडर व पेस्ट विकायला आणल्या. सर्वानी त्याचा वापर सुरू केला. हळूहळू लोकांचे दातांचे आरोग्य सुधारण्याऐवजी खराबच होत गेले. मग सतत काही तरी नवीन देण्याच्या प्रयत्नात त्यांनी ‘टूथपेस्ट में नमक है? निंबू है?’ अशी विचारणा करत हळूहळू पेस्टमध्ये मीठ, लिंबू, निंबपत्र अशा वेगवेगळ्या आयुर्वेदिकव पारंपरिक गोष्टींचाच समावेश करून आपले मार्केट कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही लोकांचे दातांचे आरोग्य काही सुधारत नाही असे लक्षात आले.
एकाच घरामध्ये पारंपरिक पद्धतीने दात घासणाऱ्या आजोबांचे दात चांगले आहेत, तर गेली सलग २० वर्षे पेस्ट वापरणाऱ्या आधुनिक विचारांच्या मुलांचे दात खराब होऊ लागले आहेत. नातवांच्या दातांच्या आरोग्याबद्दल तर न बोलणेच चांगले, अशी परिस्थिती सध्या आली आहे. प्रत्येकाने रोज दोन दोन वेळा पेस्टने ब्रश करूनही लोकांमध्ये दातांचे आरोग्य खालावलेले आहे. असे का होत आहे याचा अभ्यास करून मग कंपनीने पुन्हा आपल्या पेस्टमध्ये थोडा बदल करत त्यात ‘चारकोल’ वापरून नवीन पेस्ट बाजारात आणली. हा चारकोल तुमच्या दातांमध्ये खोलवर लपून बसलेले किटाणू घालविण्यास सक्षम असून याने दातांचे आरोग्य वाढते असा दावा सुरू केला. मोफत मिळणारा कोळसा किंवा मीठ हजार रुपये किलो दराने आम्हालाच विकायला सुरुवात केली. जरा विचारपूर्वक या संपूर्ण घटनेकडे पाहा. हा चारकोल म्हणजेच कोळसा म्हणजेच राख. पण आतासुद्धा कोळशाने किंवा राखेने दात घासा म्हटलं तर कोणी घासणार नाही, मात्र चारकोलयुक्त पेस्टने घासा म्हटले की लगेच विश्वास ठेवून घासतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वीच्या काळी दातांचे, हिरडय़ांचे आरोग्य सुधारावे म्हणून दंतधावन केले जात होते. आजकाल फक्त मुलींनी आकर्षित व्हावे, मुखदरुगधी जावी व दात पांढरेशुभ्र स्वच्छ दिसावेत फक्त एवढय़ासाठीच दात घासले जातात. मग फेस येण्यासाठी व दात स्वच्छ होण्यासाठी त्यात सोडियम लॉरेल सल्फेट नावाचे रसायन मिसळले जाते.

मराठीतील सर्व आयुर्वेदाच्या स्मृतीतून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dental health
First published on: 30-04-2016 at 01:03 IST