एकदा दीपक माझ्याकडे आला. उत्साहानं नुसता निथळत होता. ‘‘सापडला, मार्ग सापडला!’’ तो म्हणाला. ‘‘मुलांशी बोललोय मी. त्यांना नाचायला शिकवीन. मग ते अभ्यास करतील. गणितं सोडवतील.’’ दीपक गंमत करतोय असं मला वाटलं, पण नाही. दीपक किती तरी वर्ष संस्थेत येत राहिला. कुठलीही अपेक्षा न करता मुलांना नृत्य शिकवत राहिला. मुलांच्या एरवीच्या शुष्क आयुष्यात त्यानं गंमत आणली. जणू संजीवनी दिली. पण.. दीपक हळूहळू रिमांड होममध्ये येण्याचं थांबला. पैसे कमावणं, जागा बघणं, यात नृत्याची गतीही मंदावली. नृत्य थांबलं. मुलांचा सहवास संपला आणि दीपक मनानं खचला..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परवा एका कार्यक्रमासाठी मुंबईत गेले. अनेक सहकारी भेटले. खूप गप्पा झाल्या. पंधरा-वीस वर्षांपूर्वीचे बंध अजूनही जुळून आहेत, हे जाणवून खूप बरं वाटलं, पण त्यातही एक हुरहुर मनात राहिली. त्या सगळ्या गोतावळ्यात दीपक नव्हता. दीपक अनंताच्या वाटेवर निघून गेला, याला काही र्वष झाली. काहीसा विस्मरणात गेला तो, असं वाटायला लागलं होतं. पण परवा सगळे एकत्र आलो आणि वाटलं की दीपकला आम्ही कुणीच विसरलो नाही, विसरणारही नाही.

मराठीतील सर्व आम्ही असू लाडके बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An excellent dancer deepak
First published on: 17-12-2016 at 01:45 IST