० घर घेण्यापूर्वी जाणून घ्या की हे घर आपल्या गरजा पूर्ण करणारे आहे का? त्यातील खोल्यांची संख्या किती आहे? हॉल, स्वयंपाकघर, शयनकक्ष, मुलांची खोली शौचालयासह आहे का? खोल्यांचा आकार कसा आहे? कितव्या मजल्यावर आहे, पाण्याची व विजेची व्यवस्था कशी आहे.
० घरात सूर्यप्रकाश येतो का, शुद्ध हवेसाठी क्रॉस व्हेंटिलेशन आहे का हे तपासून पाहा.
० बिल्डरकडून नवीनच घर घेणार असाल तर त्याला सांगून बांधकाम सुरू असताना हवे तसे बदल करू शकता. जर सोसायटीत घर घेणार असाल तर घरात आवश्यक असणाऱ्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, त्यासाठी किती जास्तीचा खर्च करावा लागणार याचा अंदाज घ्या.
० घर घेण्यापूर्वी आजूबाजूचा परिसर पाहून घ्या. आसपासचे वातावरण कसे आहे, सभोवती प्रदूषण आहे का? पार्कची सोय आहे का हे पाहून घ्या.
० घरापासून कार्यालय, मुलांच्या शाळा, रेल्वे स्टेशन, येथे जाण्यासाठी सोयीस्कर अशी वाहतुकीची सोय आहे का? मार्केट घराजवळ आहे का? या गोष्टी पाहून घ्या.
० घराचा ताबा घेताना खिडक्या, दारे, नळ, कडय़ा, फ्लश, रंग, टाइल्स किंवा फ्लोिरग व्यवस्थित आहे का हे तपासून पाहा.
० सोसायटीतील घर विकणाऱ्या सदस्याला सोसायटीकडून शेअर सर्टिफिकेट मिळते, ते सर्टिफिकेट मागून घ्या.
० सोसायटीत घर घ्यायचे असल्यास सोसायटीकडे एनओसीची मागणी करा. त्यामुळे घर विकणारा डिफॉल्टर आहे की नाही हे कळू शकेल. एनओसी आणि शेअर सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय पुढील व्यवहार करू नका.
० बिल्डरकडून घर घेणार असल्यास ते रेसिडेन्शीयल झोनमध्ये आहे का याची खात्री करून घ्या.
० जागेचा मालकी हक्क कोणाकडे आहे याची शहानिशा करून घ्या. बऱ्याचदा व्यवहार खोटी कागदपत्रे बनवून केला जातो, यासाठी सावधानता म्हणून सेल डीड पाहूनच पुढचे पाऊल उचलावे.
० डेव्हलपरकडून प्रॉपर्टी ट्रान्सफरची कागदपत्रे तपासून घ्यावीत.
० डेव्हलपरला तेथे बांधकाम करण्याची परवानगी मिळाली आहे का, याची माहिती करून घ्या.
० डेव्हलपरकडे सर्व क्लिअरन्स कागदपत्रांची मागणी करा. डेव्हलपरने नकार दिल्यास संबंधित विभागाकडून माहिती मिळवा. बांधकामाचा नकाशा मंजूर झाला की नाही याचीही माहिती करून घ्या.
० बांधकाम सुरू असताना सर्व विभागांकडून क्लिअरन्स आवश्यक असते. डेव्हलपर ती माहिती देत नसेल तर त्या ठिकाणी गुंतवणूक करू नये.
० ज्या ठिकाणी आपण गुंतवणूक करणार तेथे टाऊन प्लॅनिंगची परवानगी आहे की नाही हे कळणे महत्त्वाचे आहे.
० बांधकाम पूर्ण झाल्यावर डेव्हलपरकडे कंप्लिशन सर्टिफिकेट व ऑक्युपेन्सी सर्टिफिकेटची मागणी आवश्य करावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

unangare@gmail.com

मराठीतील सर्व करून बघावे असे काही बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home buying what are points
First published on: 12-12-2015 at 01:03 IST