‘मांसपाकनिष्पत्ति’ हे मांसाहारी पदार्थाच्या कृती देणारे पुस्तक लिहिण्याची आवश्यकता पार्वतीबाईंना त्यावेळी वाटली असावी आणि हिंदू समाजात उपवासाचे महत्त्व लक्षात घेता दुर्गाबाई भटांना ‘उपोषण पाकशास्त्र’ लिहावेसे वाटले असावे. ही दोन्ही पुस्तकं महत्त्वाची आहेत, कारण भारतीय खाद्य संस्कृतीच्या दोन टोकाच्या परंपरा म्हणजे मांसाहार आणि उपवास ही पुस्तकं पुढे नेताना दिसतात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात समाज सुधारणा, स्त्रीशिक्षण या क्षेत्रांत प्रारंभीच्या काळात पुरुषांनी स्त्रियांना मार्गदर्शन आणि मदत केली आहे. कित्येकदा पुरुषांकडून स्त्रियांनी प्रेरणा घेतली आहे. पाककृतींच्या पुस्तकांनाही हे लागू पडते. स्वयंपाक या शब्दातला स्वयम् हा भाग तसा फसवा आहे. स्वयंपाक हा स्त्रियांनी करायचा आणि म्हणून हे क्षेत्र स्त्रियांचं मानलं गेलं आहे. तरीही विरोधाभास असा की पूर्वीपासून भीम, नल यांसारखे पुरुष उत्तम बल्लवाचार्य म्हणून प्रसिद्ध आहेत. पहिली पाककलेची पुस्तकंही पुरुषांनी लिहिलेली आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस या पुस्तकांनी रुळवलेली वाट चोखाळत स्त्रिया पाककलेची पुस्तकं लिहू लागल्या.

मराठीतील सर्व सफर खाद्यग्रंथांची - बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Books about indian food culture
First published on: 08-04-2017 at 01:14 IST