लहान मुलं जेव्हा पहिल्यांदा शाळेत येऊ लागतात तेव्हा त्यांच्यासाठी ते अनोळखी जग असतं. या जगाशी मैत्री होणं सर्वस्वी त्यांच्या शिक्षिकेवर अवलंबून असतं. शिक्षिकेने आईच्या मायेनं त्यांना भावनिक सुरक्षा दिली की ते मूल तिथलं होऊन जातं. शून्य ते सहा वर्षांच्या वयाचा काळ. मानवी मेंदूची झपाटय़ाने वाढ होण्याची ही अत्यंत महत्त्वाची र्वष. त्या वर्षांमध्ये मुलाला आलेले अनुभव हे मुलाच्या पुढच्या आयुष्यात अत्यंत खोलवर परिणाम करणारे आणि त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविणारे असतात. त्यासाठी त्यांना ‘वळण’ लावण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे समृद्ध अनुभव देणं गरजेचं असते. मुलांची वाढ ही जाणीवपूर्वक, प्रयोगशील राहूनच करावी लागते तर ती मुलं विचाराने, ज्ञानाने समृद्ध होतात. असेच काही प्रयोग करत मुलांना कसं घडवता येईल हे आपल्या स्वानुभवाने सांगणारं शिक्षिका रती भोसेकर यांचं हे सदर दर पंधरा दिवसांनी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरस्वती मंदिर ट्रस्टच्या पूर्व प्राथमिक विभागात जवळजवळ पंधरा वर्षांपूर्वी, मी शिक्षिका या पदासाठी अर्ज करायला गेले तेव्हा मला लहान मुलांची आवड आहे या पलीकडे बालशिक्षण व त्याची शास्त्रशुद्ध पद्धत याची जरासुद्धा माहिती नव्हती. त्या अनुषंगाने एक शासनमान्य बालवाडी प्रशिक्षण चालू केलं होतं इतकंच! पण या विश्वातील व्यापकता आणि मोहकता खरोखरीच माहीत नव्हती. प्रशिक्षण घेऊन चारचौघींप्रमाणेच एक नर्सरी सुरू करायची आणि ती सुरू करण्यापूर्वी एखादं र्वष एखाद्या शाळेत शिकवायचं एवढाच साधा-सोपा विचार होता.

Web Title: School science projects
First published on: 09-01-2016 at 01:54 IST