सुतेजा दांडेकर

माझी आता चालू आहे एक्काहत्तरी. माझ्या सत्तरीच्या वाढदिवसाला मुलं, सुना, नातवंडं सर्व जमलेले. हॉल छान सजवलेला, सगळीकडे सुवासिक फुलांचे हार, फ्लॉवरपॉटमध्ये निशिगंधाची फुलं, त्यामुळे वातावरणनिर्मिती छान झालेली. मी सुरेखशी साडी नेसून हॉलमध्ये आले. मला वाटलं, सर्व जण टाळय़ा वाजवून माझं स्वागत करतील; पण बघते तर काय, सगळे जण आपापला मोबाइल घेऊन त्यामध्ये डोकं घालून बसलेली होती. मला काही कळेना. खुर्चीत बसले आणि नातवाला, अथर्वाला विचारलं, ‘‘अरे, काय चाललंय तुमचं मोबाइलमध्ये? माझ्या वाढदिवसाला जमला आहात ना? मग तुमच्या हातातलं डबडं बाजूला ठेवा

Can Spicy Food Cause Stomach Ulcers
तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात अल्सर होतो का? झणझणीत खायला आवडत असेल तर नक्की वाचा
a man do something crazy on traffic signal by watching video you can not control laughing
“दारू प्यायली का?” ट्रॅफिक सिग्नलवर व्यक्तीने असे काही केले की तुम्हालाही हसू आवरणार नाही, VIDEO होतोय व्हायरल
Health Benefits of Castor Oil
रोज एक चमचा एरंडेल तेलाच्या सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डाॅक्टरांकडून जाणून घ्या…
How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?

बघू! मी तुमच्यासाठी एवढे छान छान पदार्थ केले आहेत, तिकडे कुणाचं लक्षच नाही.’’ तो म्हणाला, ‘‘आजी, हे डबडं नाहीये! आताच मी या हॉलचा फोटो, तुझा फोटो, तू केलेल्या पदार्थाचा फोटो काढून सगळय़ांना पाठवला. तेच सगळे बघताहेत. त्याला  किती ‘लाइक्स’ आलेत बघ..’’

‘‘अरे, हो का? बघू बघू मी म्हातारी कशी दिसते ते..’’

‘‘आजी, तू कुठे म्हातारी आहेस! बघ फोटोत किती तरुण दिसतेयस.’’

मग मी त्याला म्हटलं, ‘‘अरे, ही तुमची फोटो काढण्याची किमया वगैरे ठीक आहे. पण या मोबाइलमुळे जवळची माणसं लांब गेली त्याचं काय?’’

त्यावर, ‘‘नाही. तसं होत नाही. उलट खूप लांबलांबची, अगदी परदेशातलीसुद्धा माणसं, नातेवाईक जवळ आले आहेत,’’ असं म्हणत त्यानं मला माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून मोबाइल फोन दिला.  मी आपलं म्हणत होते, ‘‘नको रे बाबा, मला त्यातलं काही कळत नाही.’’ ‘सोपं असतं’ म्हणत त्यानं मोबाइल कसा घ्यायचा, कसा करायचा हे शिकवलं. मग मात्र गंमतच वाटू लागली. व्यायाम करायचा असेल तर अ‍ॅप उघडायचं, मोबाइल समोर ठेवून व्यायाम करायचा.  घरबसल्या कुणाचंही प्रवचन, कीर्तन ऐकायला मिळू लागलं. वेगवेगळय़ा रोगांवर घरगुती औषधं काय ते कळू लागलं. विनोदांवर हसू लागले. हे सर्व कसं बघायचं हे अथर्वानं दाखवलं. आता मला बँकेतही जायला लागत नाही. सर्व कामं मोबाइलवरच. कधी आपल्या आयुष्यातल्या जुन्या गोष्टी कुणाला सांगायच्या असतील तर बोलून टाइप करायला माइक वापरता येऊ लागला. अथर्वानं शिकवलं की,‘‘ते मक्याचं कणीस स्क्रीनवर दिसतंय ना, ते दाबून धरायचं आणि तू बोलत राहा. म्हणजे तू जे बोलतेस ते टाइप होईल आणि तू ते इतरांना पाठवू शकतेस.’’ म्हणजे आता माझ्याशी बोलायला कुणाला वेळ नाही, अशी तक्रार करायला जागाच नाही! मनात आलं की स्क्रीनवरच्या कणसाकडे बोट गेलंच! ज्याला पाठवू त्याला वेळ झाल्यावर तो वाचू शकतो. किती सोपं! हे करण्यात वेळ छान जाऊ लागला.

मग नातू म्हणाला, आता तू हे सर्व गोष्टीरूप करून मासिकांना पाठवायला सुरुवात कर. तुझी सांगण्याची, लिहिण्याची विशिष्ट ढब आहे. त्याचा उपयोग करून तुझ्याच अनुभवाच्या कथा लिहायला सुरुवात कर.’’ ते करू लागले आणि दिवाळी अंकांसाठी कथा पाठवू लागले. पहिल्या वर्षीच पाच दिवाळी अंकांमध्ये माझ्या कथा छापून आल्या. नंतर आणखीही, असं करत पंचवीस दिवाळी अंकांतून कथा छापून आल्या. दिल खुश हो गया! त्यामुळे माझा वेळ छान जाऊ लागला. मला उत्साह वाटू लागला. मासिकामध्ये आपल्या कथेखाली आपलं नाव वाचणं, आपला मोबाइल नंबर वाचणं म्हणजे काय सुख असतं हे कळलं आणि मग ते व्यसनच लागलं. याच कथा कॉपी-पेस्ट करून मी मुलांना, नातवंडांना पाठवू लागले. त्यामुळे त्यांनाही माझ्या आयुष्यामध्ये काय काय घडलं, मी आयुष्यात काय काय केलं, हे सर्व समजलं. आता मी नातवंडांना ‘काय मोबाइल हातात घेऊन बसलात?’ असं म्हणून रागावत नाही. कारण माझ्या हातात तोच आला आहे!

आता फोटो काढायला शिकते आहे. मग ते फोटो स्टेटसला ठेवणं, इतरांना पाठवणं हे शिकणार. कधी कधी हात थरथरतो फोटो काढताना. मागेपुढे होतं, पण ठीक आहे. आपल्या मनात येईल तेव्हा, मनात येईल त्याचा फोटो काढता येतो हे काय कमी आहे! आता मला पाहिजे तेव्हा वेगवेगळय़ा वस्तू अ‍ॅपवरून खरेदी करता येतात, खाद्यपदार्थ मागवता येतात. घरबसल्या सर्व काही व्यवस्थित होऊ लागलं. फेसबुक उघडलं, जुने मित्रमैत्रिणी भेटू लागले. त्यांच्याशी संवाद करताना वेळ कसा जातो कळतच नाही. पूर्वी टीव्हीला ‘इडियट बॉक्स’ म्हणत असत; पण आता ज्येष्ठ नागरिकांचा टीव्ही व मोबाइल हा जवळचा मित्र झाला आहे. त्यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांची कातरवेळही व्यवस्थतिपणे पार पडते.. हा वेळही आनंदी झालाय, कारण आम्ही नवीन काही शिकलोय, शिकतोय..