जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव. खरं तर रोजचा दिवस आपला. प्रत्येक स्त्रीचा. तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या कसोटीचाही. केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचा आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वाचाही. कालच साजरा करण्यात आलेल्या या दिनानिमित्ताने काही नामवंत स्त्रिया सांगताहेत त्यांना जाणवलेला स्त्रीत्वाचा अर्थ, स्त्री म्हणून त्यांनी अनुभवलेला जगण्याचा अर्थ आणि सर्वच क्षेत्रातल्या आजच्या स्त्रियांच्या भरारीविषयी..
सर्व मुलाखती : पूजा सामंत