पल्लवी सावंत – response.lokprabha@expressindia.com

आपल्या सणांचा शेतीशी, निसर्गाशी खूप जवळचा संबंध आहे. साहजिकच त्या त्या काळातल्या सणांना करायचे पदार्थ आणि आहार यांचाही निकटचा संबंध आहे.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
How Did Get Name Tulsibaug To Pune Famous Market
Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

भारतातील सांस्कृतिक वैविध्याबद्दल नेहमी चर्चा होते. या वैविध्याबरोबरच भारतात सण आणि उत्सवांचेही विशेष महत्त्व आहे. त्याचसोबत आहारात बदल होत जातो. महाराष्ट्रात तर मराठी महिने आणि त्यानुसार साजरे केले जाणारे सण यांचे महत्त्व वेगळे सांगायला नको.

मराठी महिन्यानुसार चत्र महिना सुरू झाल्यापासूनच वेगवेगळ्या सणांची तयारी करायला सुरुवात होते. आपल्या शेतीप्रधान देशात सण आणि उत्सवाचे महत्त्व आरोग्य  आणि पर्यायाने आपल्या खाण्याच्या पद्धतींसोबतही जोडले गेले आहे!

सण आणि उत्सव म्हटले की उपवास आलेच. अगदी सोपे उदाहरण द्यायचे झाले तर श्रावण महिन्यामध्ये पाऊस खूप असतो आणि शेतीकाम देखील झालेले असते. त्यामुळे हलका आहार घेण्याकडे कल असतो. त्यामुळे कदाचित श्रावणात प्रत्येक वारागणिक उपवास केला जात असावा.

उपवासाच्या निमित्ताने अलीकडे फराळी मिसळ, चिवडा, खाकरा एवढेच काय बिस्किटेदेखील बाजारात उपलब्ध असतात. शिवाय उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी किंवा वडे आणि वेफर्स हे समीकरण तर अगदी पक्के झालेय. फळे किंवा राजगिऱ्याचे पदार्थ खाणे थोडे विस्मृतीत गेलेय. त्यामुळे आधी उपवासाच्या दिवशीच्या आहार- नियमनाबद्दल थोडे जाणून घेऊ.

उपवास करताना…

  • केवळ दूध पिऊन उपवास करू नये.
  • आहारात ताजे दही जरूर असावे.
  • ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी किमान तीन-चार फळे जरूर खावीत. शक्यतो ताजी फळे खावीत. फळांचे सलाड करून खाणार असाल तर ते आधी कापून ठेवणे टाळा.
  • फळांचे ज्यूस मात्र वज्र्य केलेलेच बरे!
  • राजगिरा आणि लाह्य यांचा आहारात समावेश करावा.
  •  िशगाडय़ाच्या पिठाचे थालीपीठ किंवा पोळी यांचा आहारात समावेश करावा.
  • बदाम, अक्रोड, काजू, मनुके यांचे किमान चार वेळा सेवन करावे.
  • दिवसाचे आठ-नऊ तास नोकरी करणाऱ्यांनी मात्र उपवास करताना काळजी घ्यावी. दिवसभर उपाशी राहून संध्याकाळी उपवास सोडणार असाल तर अ‍ॅसिडिटी, अपचन होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे फळे, सुकामेवा, ताक, िलबू सरबत, उकडलेले शेंगदाणे यांचा आहारात जरूर समावेश करावा.

सकाळी घरून निघताना किमान दोन खजूर आणि दोन फळे खाऊनच निघावे. यामुळे एक तर तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल आणि डोके दुखणे, थकवा येणे या समस्या जाणवणार नाहीत.

  • रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारखे विकार असतील त्यांनी उपवास न करणं उत्तम! तुमची औषधे आणि खाणे यांचा खूप जवळचा संबंध आहे. सतत उपाशी राहिल्याने ऊर्जेच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊन तुमचे आरोग्य बिघडू शकते. (एका दिवसाने काही होत नाही हा अट्टहास नकोच!)
  • वयस्क व्यक्तींनी अति झोप हा काहीच न खाल्ल्याचा परिणाम आहे असे गृहीत धरू नये.  तुमच्या आहाराचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे साठीनंतर उपवास  करण्याचा अट्टहास नकोच!
  • आणि हो, उपवास करताना पाणी प्यायला विसरू नका. भरपूर पाणी पिऊन शरीरातील आद्र्रता राखणे फार महत्त्वाचे आहे.

हे झाले उपवासांबद्दल! आता बघू आपल्या सणांमध्ये कोणकोणते आरोग्यदायी पदार्थ आपण खाऊ शकतो? श्रावण म्हणजे सणांची आणि उपवासाची रेलचेल! वेगवेगळ्या सणांदरम्यान वेगवगेळे पदार्थ करण्याची परंपरा महाराष्ट्रात खूप आधीपासूनच आहे, त्यातील काही मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

नागपंचमीच्या निमित्ताने माझ्या मत्रिणीकडे िदडे केले होते. मुख्य घटकद्रव्ये असणारा हा खाद्यपदार्थ नामशेष होत चालला आहे यावर आमचे बोलणे झाले. पुरणाचे िदडे म्हणजे गव्हाचे पीठ (मला एकदम ग्लूटेन ऐकू आले), चणाडाळीपासून केलेले पुरण, गूळ आणि तूप या मुख्य जिन्नसांपासून तयार केलेला हा पदार्थ आरोग्यदायी आहे (अरे बापरे पुन्हा गोड! असेही ऐकू आले.) प्रथिने, कबरेदके, लोह, उत्तम स्निग्ध पदार्थ यांचे मिश्रण असणारा हा पदार्थ पूर्वी आहाराचा विशेष भाग असे!

ठरावीक दिवसानिमित्ताने तयार केलेले पदार्थदेखील पोषक असू शकतात हा मुद्दा विसरून चालणार नाही. आठवडय़ातून कधी तरी पूर्णपणे साखरयुक्त गोड पदार्थ खाणाऱ्यांनी गुळापासून केलेले गोड पदार्थ खायला काहीच हरकत नाही.

श्रावणात मांसाहार वज्र्य करावा असे सांगितले जाते आणि त्यामुळे श्रावण सुरू होण्याआधी अनेक ठिकाणी दिवे-पूजनानंतर मांसाहाराची मेजवानी दिली जाते.

अलीकडे ‘कोण पाळते श्रावण वगरे?’ असे मत असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची नोंद अशी की, पावसाळ्यात माशांचा प्रजनन काळ असतो आणि या काळात त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे मासे खाणे कटाक्षाने टाळावे असे सांगितले जाते. शिवाय माशांच्या वाढीमध्ये आपला हस्तक्षेप होऊ नये हा देखील विचार यामागे आहेच. थोडक्यात सांगायचे तर श्रावणी आहाराला वैज्ञानिक आधार आहेच.

(त्यावरून आठवले, या दरम्यान व्हेगन आहार पद्धती अवलंबू पाहणाऱ्या अनेक व्यक्तींशी भेट झाली. तसाही श्रावणच आहे म्हणजे आपोआप वनस्पतीजन्य आहार घ्यायचा आहे, तर तुम्हीही व्हेगन होऊ शकता.)

मंगळागौर म्हणजे केवळ झिम्मा-फुगडय़ा असे मानले जात असले तरी मंगळागौर हा खरे तर अन्नपूर्णेचा सोहळा असतो. मंगळागौरीचे पूजन करताना विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची नवविवाहितेला ओळख करून दिली जाते. तसेच पूजेनंतर शांतपणे जेवण करण्याची आणि त्यानंतर वेगवेगळे खेळ खेळण्याीच प्रथा आहे. नवविवाहितेवर एकाग्रता, संयम, विचार आणि आचारांची देवाणघेवाण हे संस्कार करण्यासाठी हा उत्तम सोहळा आहे.

लहानपणापासून मला कुतूहल वाटलेय ते त्यातील खेळांचे! वेगवेगळे व्यायामप्रकार बेमालूमपणे मिसळत किती सुंदर खेळ तयार केलेत आपल्या पूर्वजांनी!

योग शिकवणाऱ्या योगिनींची वेगळ्या स्तरावरील लवचीकता पाहूनच थकणाऱ्या आजच्या पिढीतील महिलांनी हे खेळ शिकायलाच हवेत असा आग्रह करावासा वाटतो.

श्रावण पौर्णिमेला येणारा जिव्हाळ्याचा सण म्हणजेच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन ! खोबरे आणि त्यापासून केले जाणारे विविध पदार्थ याबद्दल वेगळे काय सांगावे! गेली अनेक वष्रे वेगवेगळ्या संशोधनामुळे चच्रेत राहिलेला नारळ, नारळाचे तेल, नारळपाणी, खोबरे, ओले खोबरे, सुके खोबरे हे महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग मानले जातात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून सागराला शांत होण्याची प्रार्थना केली जाते आणि नंतरच मासेमारीला सुरुवात केली जाते. विशेषत: कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमा जल्लोषात साजरी केली जाते.

आजच्या काळात कोल्ड प्रेस नारळ तेल, ओले खोबरे, शहाळे यांचे महत्त्व पाश्चात्त्य देशांनीही मान्य  केलेले आहे. सध्या एमसीटी ऑइल (उत्तम प्रकारचे) म्हणून नारळाच्या तेलाची महती सर्वदूर पसरते आहे. आपणही रोजच्या आहारात एखादा भाग नारळ किंवा नारळाचे पदार्थ वापरू शकतोच.

त्यांनतर ‘गोिवदाऽऽऽ  गोिवदाऽऽऽ गोिवदाऽऽऽ’ करत जल्लोष सुरू होतो दहीहंडीचा! खरे तर बाळकृष्णाला दही आणि लोण्याच्या आवडीपायी हंडीतील लोणी चोरण्याची खोड होती. हा खरं तर बळकट हाडे तसंच ताकदीसाठी उत्तम आहार! त्यानिमित्ताने एकीचे बळ सांगणारा हा खेळ उत्साहाने साजरा केला जातो.

त्यानंतर येते आपल्या सगळ्यांचे लाडके दैवत गणपती! भाद्रपद महिन्यातदेखील पाऊस खूप पडतो आणि हलका आहार घेणेच हितावह असते. गणपतीला आवडणारे मोदक म्हणजे पचनाला हलका असणारा गोड पदार्थ! आता ते कसे काय? मोदक तयार करताना तांदळाचे पीठ गरम पाण्यात घालून उकड काढून घेतली जाते. या पद्धतीमध्ये तांदळातील मुख्य मूलद्रव्ये अबाधित राहातात. सारणात गूळ, खोबरे, तूप आणि वेलची असते. हे स्निग्ध पदार्थ लोह, पोटॅशिअम आणि िझक यांचे उत्तम मिश्रण आहे. काही महिन्यांपूर्वी मोदकांमधील प्रथिनांवरून समाजमाध्यमांमधील तज्ज्ञांनी वेगवेगळी मते व्यक्त केली. एक ग्रॅम वेलचीमध्ये असणाऱ्या एक ग्रॅम प्रथिनांवरून ही चर्चा सुरू झाली होती.

मोदक करताना अनेकदा हळदीचे पान वापरले जाते. यामुळे मोदक पचायला हलके होतातच तसेच त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सदेखील कमी होतो. मात्र अनियंत्रित मधुमेह असणाऱ्यांनी गोड पदार्थ खाणे टाळावे या नियमाला मोदकदेखील अपवाद नाही.

गणपतीला आपण नेहमी दूर्वा वाहतो. आयुर्वेदामध्ये दूर्वाचा रस हा रक्तशुद्धीकरण आणि रक्तातील शर्करेवर नियंत्रण राखण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो.

पूर्वीच्या काळी अश्विन महिन्यात घरात धान्य भरले जायचे. घरातील स्त्री निरोगी राहावी यासाठी प्रार्थना केली जायची. नवरात्रातील नऊ दिवस वेगवेगळ्या धान्यांचे सेवन केले जाते. खरे तर या दरम्यान ऋतुबदलाची सुरुवात होते आणि म्हणून धान्यांचे सेवन करण्यास प्राधान्य दिले जाते.

दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात गोड पदार्थ खाण्याची तर भारतातील काही भागांत हरभऱ्याची उसळ, लापशी खाण्याची प्रथा आहे. हवामानातील बदलानुसार धान्यांबरोबरच प्रथिने जास्त असणाऱ्या कडधान्यांचा समावेश करून शरीराला जास्तीत जास्त ऊर्जा मिळवून देणारे पदार्थ खाल्ले जावेत हा यामागचा हेतू!

यानंतर सगळ्याच घरांमध्ये लगबग असते ती आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सणाची अर्थात दिवाळीची! दिवाळीच्या फराळाचे महत्त्व (इथे तुम्हाला वाचायचे नसले तरी) खूप आहे.

  • भाजणीची चकली – प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ.
  • शंकरपाळे : साखर, गहू – केवळ कबरेदके.
  • चिवडा – शेंगदाणे, चणे, कढीपत्ता, पोहे, मिरची – फराळासाठी उत्तम पदार्थ.
  • लाडू : सकाळच्या नाश्त्याची उत्तम सोय!
  • करंज्या : खोबरे, गहू, साखर, तेल : स्निग्ध पदार्थाचे मिश्रण असलेला गोड पदार्थ.

दिवाळीमध्ये थंडीची चाहूल लागते. कमी तापमानात खूप भूक लागते. या अतिरिक्त भुकेला नियंत्रणात ठेवण्यासाठी हा फराळाचा घाट! पूर्वीच्या शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठीचे चीटमील किंवा मधले खाणे! तसेच शेजार- पाजाऱ्यांशी अन्नधान्यांची देवाणघेवाण व्हावी म्हणून मोठय़ा प्रमाणात फराळ तयार केला जाई. अलीकडे मात्र फराळ चापूनचोपून फस्त केला जातो आणि आता तर बाजारात सगळेच महिने सगळाच फराळ उपलब्ध असतो.

एक गोष्ट मात्र सगळेच कबूल करतील की दिवाळीत घरी केलेली ताजी चकली आणि बाजारात मिळणारी डाएट चकली यांच्या चवीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे वर्षांतील सगळे महिने फराळ करण्यापेक्षा ऋतुमानानुसार फराळ करणे नेहमीच चांगले!

आपले सण आणि उत्सव वेगवेगळ्या ऋतूंनुसार साजरे केले जातात. आपल्या पूर्वजांनी छान व्यावहारिक, सामाजिक, वैचारिक सांगड घालत एक समतोल खाद्यसंस्कृती तयार केली आहे. आपणही ती खाद्यसंस्कृती जोपासायला काय  हरकत आहे?

अलीकडे आपण पाश्चात्त्य पदार्थाची देवाणघेवाण सहजी करतो. आपल्याकडे घेतल्या जाणाऱ्या पिकांचा, धान्यांचा, फळांचा उत्सव या उत्सवांच्या निमित्ताने का साजरा करू नये?

आपल्या सण आणि उत्सवातील आहार पद्धतींत मद्यधुंद उत्सवाचा उल्लेख आढळत नाही. प्रत्येक विशेष पदार्थाचा भर हा कबरेदके, प्रथिने, सुकामेवा, स्निग्ध पदार्थ यांवर जास्त आहे. प्रमाणात खाल्ले तर उत्सवाचा उत्साह वाढेल यात अजिबातच शंका नाही.

आजच्या  शुगरफ्री, फॅटफ्री, ग्लूटेनफ्री, सोयाफ्री, डेअरीफ्री खाद्यबाजारात उत्तम आरोग्याचा ध्यास घेत गिल्ट फ्री आहारनियमन करणे इतके कठीण आहे का?